Posts

Showing posts from April, 2020

संपादकीय

Image
नमस्कार मंडळी, २०२० ह्या वर्षातील 'मैत्र' चा दुसरा अंक आपल्यासमोर आणताना संपादक मंडळाला अतिशय आनंद होत आहे. दरवर्षी प्रमाणे बाल्टिमोर मराठी मंडळाच्या ह्या वर्षीच्या कार्यक्रमांची सुरुवात संक्रांतीच्या बहारदार कार्यक्रमाने झाली. संक्रांतीनंतर सगळ्यांना वेध लागतात ते वसंत ऋतूच्या आगमनाचे आणि मराठी मंडळाच्या होळी आणि पाडवा ह्या संयुक्तपणे आयोजित केलेल्या कार्यक्रमाचे. ह्यावर्षी मंडळाने ‘व्हाईट लिली अँड नाइट रायडर’ ह्या गाजलेल्या नाटकाचा प्रयोग आयोजित केला होता, पण घडले मात्र वेगळेच. जगभर पसरू लागलेल्या करोना विषाणूचा प्रादुर्भाव एव्हाना अमेरिकेमध्ये येऊन धडकला होता. त्याचा प्रसार हळूहळू वाढू लागल्याने, अमेरिकेमधील सार्वजनिक समारंभ रद्द होऊ लागले होते. ह्याचमुळे बाल्टिमोर मराठी मंडळाने योग्य वेळी निर्णय घेऊन ह्या नाटकाचा प्रयोग रद्द केला. ह्यामुळे लोकांची जरी निराशा झाली असली तरी मंडळाला खात्री आहे कि विषाणूचा प्रादुर्भाव कमी झाल्यावर आणि सध्याची विस्कळीत स्थिती मार्गस्थ झाल्यावर मंडळ आणि कार्यकर्ते जोमाने कामाला लागून तुमच्यासमोर नवनवीन कार्यक्रम आणतील.  तसे म्हटले तर ह्या प्रादुर

एक घटना

Image
संध्या गंधे सगळेजण मला विसराळू म्हणतात. "अशी कशी गं तू इतकी महत्त्वाची गोष्ट विसरलीस?" असे अनेक वेळा ऐकावे लागते. घरच्यांनी आणि मैत्रिणींनी थकून अखेर माझा हा विसराळूपणा स्वीकारलाआहे. माझ्या ह्या विसराळूपणामुळे मी माझा लाखमोलाचा मुलगा काही काळाकरता गमावला होता ही अनेक वर्षांपूर्वीची घटना माझ्या मनाच्या कोपऱ्यात मी दडवून ठेवली आहे. त्या घटनेची आठवण जरी झाली तरी मन शहारते. त्याकाळी आम्ही इंदोरला वल्लभनगर येथे राहात होतो. माझ्या धाकट्या दिरांचे लग्न १५ दिवसांवर आले होते, म्हणून माझ्या सासूबाईंनी आम्हा सर्वांना चंद्रलोक येथे राहाण्यास बोलावले होते. पूर्वी लग्नासाठी १५ दिवस आधीपासून पाहुणे यायला सुरुवात होत असे. माझ्या मिस्टरांची फिरतीची नोकरी असल्याने मी व दोन्ही मुले  चंद्रलोक येथे राहाण्यास गेलो. मे महिन्याचे दिवस होते, बाहेर रणरणते ऊन होते. चंद्रलोक सोसायटी तशी गावापासून दूर होती. सकाळचे ११ वाजले होते. माझ्या सासूबाईंनी मला बऱ्याच कामांची यादी दिली होती. घरात सगळी मुलं दंगा करत होती. दीड वर्षाचा अनिरुद्धपण तिथेच रमला होताम्हणून साडी बदलून, पर्स उचलून मी सटकण्याच्या बेतात होते

स्मरणाचे व्रत

Image
विदुला कोल्हटकर यंदा बऱ्याच वर्षांनी आई-बाबा जूनमध्ये तिच्याकडे आले होते. एका शनिवारी सकाळी नेहेमीप्रमाणे तिचं लॅपटॉपवर काहीतरी चालू होत तेव्हा अचानक आईचा प्रश्न आला "साबुदाणा आहे का ग? या गुरुवारी माझा उपवास आहे.” ती: "श्रावण तर अजून लांब आहे आता हा कसला उपास?” आई: "वटपौर्णिमेचा” ती हसली. त्या हसण्याचा अर्थ ओळखून आई म्हणाली "अग सावित्रीच्या बुद्धिमत्तेची, चातुर्याची आठवण म्हणून हा उपवास.” ती: "हो हो!” आई: "हे सात जन्म, तोच नवरा, हे सगळं तुमच्या सिनेमामुळे आलेलं आहे. सावित्रीच्या कथेत हे असलं काही नाही. हा निव्वळ फिल्मीपणा. पूर्वीच्या बायकांकडे दुसरं काय होत? म्हणून सावित्रीची, तिच्या हुशारीची आठवण यासाठी हा उपवास. स्मरण ठेवणं महत्वाचं.” ती: "बरं. साबुदाणा आहे कपाटात. दाणे मात्र भाजावे लागतील.” वा! या गुरुवारी आईच्या हातची खिचडी मिळणार तर! मनातल्या मनात ती खूष झाली. सत्यवानाचा एक वर्षांनी मृत्यू होणार आहे हे माहीत असतानासुद्धा एकदा मनाने ज्याला पती मानलं त्याच्याशीच लग्न करणार असं निग्रहाने सांगणारी, त्याच्या मृत्यूवेळी स्वतःच्या हुशारीने यमाकडून सत्य

सरीवर सरी

Image
रोहिणी गोरे, न्यू जर्सी पाऊस! झिमझिमणारा, वादळवाऱ्यांसोबत येणारा, शिंतोडे उडवणारा, मुसळधार कोसळणारा, कसाही आवडतो मला. पाऊस हा शब्द पण मला खूप आवडतो! पूर्वी पुण्याला पडणारा वळवाचा पाऊस आठवतोय मला. उन्हाची तलखी होत असतानाच दुरून कुठून तरी पावसाचे आगमन होणार हे जाणवायला लागायचे. रखरखीत ऊन गायब होऊन अंधारायचे. मातीचा सुगंध यायचा. आभाळात एकमेकांना बोलावल्यासारखे ढग जमा व्हायचे. काळे निळे ढग! उजेडाचा पूर्ण अंधार व्हायचा. गार वारे सुरू व्हायचे. एखादीच वीज लख्खकन चमकायची. अंधारात आम्ही दोघी बहिणी पायरीवर बसून राहायचो. शिंतोडे पडायला सुरवात व्हायची पण काही वेळा पाऊस रुसून निघून जायचा. असेच वातावरण काही वेळ राहायचे. पण काही वेळा मात्र अगदी आमच्या मनासारखे व्हायचे! काळेकुट्ट ढग जमा होऊन टपटप थेंब पडायला सुरवात व्हायची. थेंबांनी अंगण भरून जायचे. क्षणार्धात विजांचा लखलखाट व ढगांचा गडगडाट यांचा धिंगाणा आणि पाऊस. पावसाच्या धारा जोरदार कोसळायच्या. पायरीवर उभे राहून आम्ही दोघी बहिणी हे दृश्य पाहण्यात मग्न होऊन जायचो. पावसाच्या सरींचे पागोळीत रूपांतर व्हायचे. अशा पावसात ओलेचिंब भिजल्यावर खूप बरे

The Moment – तो क्षण

Image
अपर्णा वाईकर   विवेकानंद मंचातर्फे आयोजित केलेल्या सत्कार समारंभाला आलेल्या लोकांनी संगम सभागृह  तुडुंब  भरले होते. सर्व उपस्थितांचे स्वागत करून झाल्यावर निवेदक म्हणाले, “ आणि आता मी श्री.संतोष राठी व सौ. बापटताई ह्यांना मंचावर आमंत्रित करतो. आपण राठीसाहेबांना श्री सुपर मार्केटचे मालक म्हणून ओळखतो , पण आज मी त्यांची एक वेगळीच ओळख करून देणार आहे. गेल्या महिन्यात पुण्यात आलेल्या पुराच्यावेळी ह्यांनी एका महिलेला आणि छोट्या मुलीला पाण्यात वाहून जाणाऱ्या गाडीतून वाचवले. ज्यांचा जीव संतोषदादांनी वाचवला त्या म्हणजे बापटताई! त्या प्रसंगाबद्दल बोलण्यासाठी मी बापटताईंना बोलवतो. ” “ नमस्कार माझं नाव संध्या बापट .  २५ सप्टेंबर हा दिवस मी कधीही विसरणार नाही. जीवन आणि मरण ह्यात किती कमी अंतर असतं हे मला त्या दिवशी कळलं. काळ आला होता पण वेळ आली नव्हती आणि ती वेळ आली नाही त्याला कारण संतोषदादा! मला तो दिवस काल घडल्यासारखा आठवतो. मी आणि माझी छोटी मुलगी गाडीतून घरी निघालो होतो. अचानक पाण्याचा लोंढा आला आणि मला माझी गाडी कंट्रोल करणं अवघड झालं होतं. त्या लोंढयाबरोबर माझी गाडी वाहून रस्त्याच्या कडेच्या कठ

ॲक्शन मुव्ही

Image
निलेश मालवणकर अँड धीस इयर्स फिल्म फेयर ॲवार्ड फॉर बेस्ट डायरेक्टर फॉर ॲक्शन मुव्ही गोज टू... अवर डिअर मिस्टर मंगेश कदम... टाळ्यांचा जोरदार कडकडाट झाला. स्पॉटलाईट मंगेशच्या दिशेने वळला. कॅमेर्यांचे फ्लॅश चमकू लागले. उपस्थित सारे फिल्मी जगत एका सुरात मनापासून टाळ्यांचा कडकडाट करत होते. आणि का नाही करणार, त्यांच्या समोर होता, मराठी चित्रपट सृष्टीचा नवीन तारणहार, साऱ्यांचा लाडका एकमेवाद्वितीय मंगेश कदम. "येस्स..." हाच तो क्षण होता ज्याची गेली वीस वर्षे मंगेशने आतुरतेने चातकासारखी वाट पाहीली होती. हा क्षण येणार याची मंगेशला पुरेपूर खात्री होती आणि आज तो प्रत्यक्षात उतरला होता. निवेदिकेने पुन्हा अनाउन्स केले, " मंगेश, प्लीज कलेक्ट युवर ॲवार्ड." मंगेश खुर्चीतून उठला. फिल्मी जगतातले किती तरी दिग्गज त्याच्याकडे पाहून हात हलवत होते. मंगेशने प्रत्युत्तरादाखल हात उंचावून त्याचा स्वीकार केला. निवेदिकेने मंगेशला हलकेसे आलिंगन देऊन त्याचे स्वागत केले. चित्रपट सृष्टीतले एक बुजुर्ग ॲवार्ड घेऊन उभे होते. मंगेश त्यांच्या पाया पडला. पुन्हा एकदा टाळ्यांचा जोरदार कडकडाट झाला. मंगेशने ॲ

विश्व मराठी एकांकिका स्पर्धेत कलाब्रेशनचे नेत्रदीपक यश

Image
रोटरी क्लब ऑफ पुणे हेरीटेज या संस्थेने आयोजित केलेल्या विश्व मराठी एकांकिका स्पर्धेमध्ये बाल्टिमोरच्या ‘कलाब्रेशन’ ह्या नाट्यसंस्थेने पदकांची लयलूट केली. ह्या स्पर्धेत जगभरातून सतरा देशांमधील मराठी नाट्यसंघांनी भाग घेतला होता. अशा अटीतटीच्या स्पर्धेत कलाब्रेशनच्या चमूने तब्बल सहा बक्षिसांवर आपले नाव कोरले. कलाब्रेशनच्या वतीने पुणे येथे प्रेरणा मोहोड यांनी बक्षिसे स्वीकारली.  ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले, महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष मिलिंद जोशी, प्रांतपाल पंकज शहा, श्रीकांत कानेटकर, महेश ओझा, मधुमिता बर्वे आणि विनिता पिंपळखरे ह्या नामवंतांच्या उपस्थितीत पारितोषिक सोहळा संपन्न झाला. स्पर्धेचे परीक्षण दिग्दर्शक आदित्य इंगळे, अभिषेक केळकर आणि पौर्णिमा मनोहर ह्यांनी केले. विक्रम गोखले ह्यांनी मराठी नाटकासाठी महत्वाचे योगदान दिल्याबद्दल स्पर्धेत सहभागी झालेल्या स्पर्धकांचे आणि रोटरी क्लब हेरीटेजचे कौतुक केले. परदेशात राहूनही आपले मराठी बांधव नाटकांद्वारे आपली संस्कृती, साहित्य जोपासत असल्याबद्दल मिलिंद जोशी ह्यांनी  स्पर्धकांचे कौतुक केले . अविनाश ओगले आणि लीना गोगटे ह्यांनी आपल

मुंबई एक स्वप्ननगरी

Image
Inset Photo of Gateway of India, by Ameya Deshmukh 'मुंबई, बम्बई, बॉम्बे','The City that Never Sleeps', 'Financial Capital of India', 'भारताचं न्यूयॉर्क' ! असं काय आहे खास मुंबईच्या पाण्यात? यामागे दडलाय तो मुंबईचा बहुसांस्कृतिक इतिहास, ज्यातून मुंबईसारख़े सुंदर रंगीबेरंगी फूल उमलले. येथील माणसे जणु या फुलाच्या अनेक पाकळ्या. काळानुसार एकेक पाकळी उमलत गेली आणि प्रत्येक पाकळीत त्यांच्या भाषेचा, चविष्ट खाण्याचा, रीती-परंपरांचा अर्क मिसळत गेला. असे अनेक पदर असलेले फूल म्हणजेच मुंबई. इतिहास म्हटलं की एखादा पुणेकर, कोल्हापूरकर अर्ध्या झोपेतदेखील साम्राज्य, युद्ध वगैरे घडाघडा ऐकवू शकतो, पण मुंबईचा इतिहास पण तितकाच जुना आहे, बरं का!! मुंबईच्या लोकल ट्रेनचा प्रवास मुंबई-बाहेरच्या माणसाला ज्वालामुखीच्या उद्रेकासारखा वाटत असला तरी मुंबईची निर्मितीच ज्वालामुखीच्या उद्रेकातून झाली असल्याने आम्हाला त्याचे फार काही वाटत नाही. मुंबईची सात बेटे म्हणजे Isle of Bombay, परळ, माझगाव, माहीम, कुलाबा, वरळी आणि Old Woman's Island. आमच्या व्यापार-परंपरेची रेखा थेट अगद

येवा कोकण आपलोच असा!

Image
छायाचित्र संदर्भ: http://divcomkonkan.gov.in/Document/ en/page/MapGallery.aspx कोकण म्हटलं की समुद्रकिनाऱ्याशी समांतर सह्याद्री पर्वतरांगेची गुंफण, त्यामुळे अनेक नागमोडी वळणांचे उंचसखल घाटरस्ते, नयनरम्य अशी हिरवी दाट झाडी व शेती हे दृश्य डोळ्यांसमोर येते. पहाटेचं धुकं, त्यामधून रास्ता कापणारी, माडा-झावळ्यांचा अडसर दूर करून पडणारी सूर्याची कोवळी किरणं, त्यामुळे उजळणारी लाल कौलारू घरं, आणि त्याबरोबर पक्ष्यांचा किलबिलाट, कोकिळेची तान, काकड आरत्या आपल्या कानात फेर धरू लागतात. असा हा कोकण भाग म्हणजे या भूतलावरील स्वर्गच आहे. महाराष्ट्राची राजधानी मुंबई ही या कोकण पट्ट्यातच आहे. हा प्रदेश महाराष्ट्र, गोवा आणि कर्नाटक या तीन राज्यांच्या सीमावर्ती भागात येतो. भारताला ७२० कि.मी. (४५० मैल) लांबीचा समुद्रकिनारा असणारी कोकण किनारपट्टी लाभली आहे. किनाऱ्याला समांतर असलेली सह्याद्री डोंगररांग यांच्या मधल्या भागात असलेली ही कोकणपट्टी अपार निसर्गसौंदर्याने नटलेली आहे. माडांच्या रांगा, आंबे, सुपारी, केळीच्या बागा, फणस, काजू, कोकमाची झाडे आणि डोंगरउतारांवर केलेली भातशेती यांनी कोकणाची जमीन संपन