Posts

Showing posts from October, 2022

संपादकीय

Image
ऑक्टोबर २०२२ अंक ४ मैत्र संपादक मंडळ २०२ २   वरदा वैद्य  विदुला कोल्हटकर  रोहित कोल्हटकर  कपिल धाकड  मधुर पुरोहित    बाममं कार्यकारिणी २०२ २   अध्यक्ष   मोनिका देशपांडे  उपाध्यक्ष  रुचिरा महाजन     उपाध्यक्ष- विपणन  शिल्पा बेंगेरी   चिटणीस  स्मितेश लोकरे  खजिनदार  दीपान्विता काळेले  सह-खजिनदार  रमा गंधे नमस्कार मंडळी,

राष्ट्रगीत : माझे विचार

Image
शारदा ग. सबनीस २०२२ च्या ऑगस्ट महिन्यात बृहन्महाराष्ट्र मंडळाच्या अधिवेशनाला गेलो होतो. दर दोन वर्षांनी ह्या अधिवेशनाला जाण्यासाठी आम्ही आतूर असतो. मराठी माणसे एकत्र येण्याचा आणि भेटण्याचा आनंद, उत्तम खाणे आणि उत्तम गुणांचे प्रदर्शन असलेला हा एक सोहळाच असतो. हे सर्व अनुभवत असताना एक गोष्ट मात्र मनाला खटकते.

केल्याने देशाटन

Image
संजीव दहिवदकर सदर लेख ‘इंडियाआशा’च्या ‘अभिनीत’पत्रिकेमध्ये पूर्वी प्रकाशित झाला होता. हा लेख सध्या चाळीशी ओलांडलेल्या भारतीय मध्यमवर्गाबाबत आहे. ‘केल्याने देशाटन, पंडित-मैत्री, सभेत संचार; शास्त्र-ग्रंथ-विलोकन, मनुजा येतसे चातुर्य फार” असे आपणा सर्वांना ठाऊक आहेच. ह्याचा आधार घेऊन आजकाल मध्यमवर्गीयांमध्ये परदेशवारी करण्याचे प्रमाण अतिशय वाढले आहे. आर्थिक कुवतीनुसार ते नेपाळ, थायलंड, दुबई, सिंगापूर, युरोप किंवा अमेरिका वा तत्सम इतर देश निवडतात.

आठवणीतला वाढदिवस

Image
डॉ. जयश्री कुलकर्णी- खेरा भारतात नेत्ररोग तज्ज्ञ आणि सार्वजनिक आरोग्यतज्ज्ञ म्हणून शासनात उच्च पदावर काम केले. वेगवेगळ्या पुरस्कारांनी सन्मानित. सध्या साइक्सविल, मेरीलँड येथे वास्तव्य. भटकंती, लिखाण, वाचन, संगीत, नृत्य, हेल्दी कुकिंगची आवड. मी औरंगाबाद महापालिकेत आरोग्य अधिकारी म्हणून काम करीत होते. एके वर्षी पैठणला महापूर आला होता. मी दर वाढदिवसाची सुरवात औरंगाबादच्या वरद गणेश मंदिरातील गणपतीच्या अभिषेकाने करत असे.

सर्व्हिसिंग

Image
वरदा वैद्य मूळ तेलगू कथालेखक- डॉ. रवि कोप्परपु ‘गैरेज’ ह्या शीर्षकाखाली मूळ तेलुगू कथा मेरीलँड तेलुगू असोसिएशनच्या (TAM) ‘पत्रिके’मध्ये २०१९ मध्ये प्रकाशित झाली होती. “अरे कार सुरू केली की तो कार मेन्टेनन्सचा दिवा ऑन दिसायला लागलाय. सर्व्हिसिंग करून आणशील का प्लीज? पुढच्या आठवड्यात रमेश आणि त्याच्या बायकोला न्यू जर्सीला आणायला जायचंय त्याच्या आत सर्व्हिसिंग करायला लागेल.” माझी बायको म्हणाली.

आम्ही जातो आपुल्या गावा

Image
निलेश मालवणकर सदर कथा 'माझी वहिनी' मासिकाच्या सप्टेंबर २०१५च्या अंकात प्रकाशित झाली होती. “आबा प्लीज.. थांबा.. नका ना सोडून जाऊ आम्हाला. आम्हाला हवे आहात तुम्ही.” अतुलने काकुळतीने आबांना विनवलं.

हळदीकुंकू

Image
भाग्यश्री साने मैत्रिणींनो, गौरी गणपती, नवरात्रीची गडबड आता संपली असेल.सणासुदीच्या दिवसांमध्ये आपल्या मैत्रिणी, कोणाची आई, कोणाच्या सासूबाई हळदीकुंकवासाठी घरी आल्या की किती आनंद होतो ना आपल्याला! सगळ्याजणी नटून थटून, सुंदर भरजरी साड्या नेसून, छान साजेसे दागिने घालून एकमेकींकडे जातो, एकमेकींना हळदीकुंकू लावतो, प्रेमाने दिलेलं छोटं-मोठं वाण घेतो, एकमेकींनी केलेल्या चविष्ट पदार्थांचं कौतुक करतो, मैत्रिणीनं केलेल्या सगळ्या सजावटीची आणि तिच्या सौंदर्यदृष्टीची स्तुती करतो. एवढंच नाही तर, नवरात्रीमध्ये आपल्या दक्षिण भारतीय मैत्रिणींच्या घरच्या गोलूलादेखील हौसेनं जातो. त्यांच्या परंपरेचं कौतुक करत या वर्षी कोणत्या बाहुल्या नवीन घेतल्या असं कुतूहलानं विचारतो. संक्रांत, चैत्रगौरी, सत्यनारायण पूजा, महालक्ष्मी, गोलू अशा वेगवेगळ्या समारंभांच्या निमित्ताने होणारं हे हळदीकुंकू आपल्या सामाजिक आयुष्याचा एक अविभाज्य घटक झाला आहे हे नक्की!

स्वातंत्र्य

Image
योगेश सावंत राहणार डोंबिवली. अर्थशास्त्रात पदवीधर, सध्या खासगी कंपनीमध्ये काम करतात, कविता वाचण्याचा आणि लिहिण्याचा छंद. मला जेव्हा जाग आली तेव्हा मी शासकीय रुग्णालयात एका खाटेवर होतो. माझ्या अंगात रुग्णाचा गणवेश होता. हाताला प्लॅस्टर होतं. अंगावर पुष्कळ ठिकाणी छोट्या छोट्या जखमा होत्या. बाजूच्या खाटेवर धोंड्या अजूनही बेशुद्धावस्थेत पडला होता. त्याच्या डोक्याला जास्त मार लागला होता. तिथे टाकेही पडले होते. त्याच्याही अंगावर ठिकठिकाणी जखमा होत्या. आमच्या खोलीबाहेर दोन पोलीस पहारा देत उभे होते.

मधुमेह-पूर्व स्थिती

Image
मिलिंद पदकी न्यू जर्सीस्थित औषध-वैज्ञानिक. आता मेडिकल लेखक. २०१७ मध्ये मराठी काव्यसंग्रह "बदकनामा " प्रसिद्ध (ग्रंथाली, मुंबई). मराठी आणि इंग्रजीतून वैज्ञानिक आणि ललित लेखन. सध्या प्रामुख्याने ‘कोव्हिड’विषयक लेखनावर भर. मधुमेह-पूर्व स्थिती (Prediabetes) म्हणजे रक्तातील साखरेचे (ग्लुकोजचे) प्रमाण वाढलेले असणे, पण इतकेही नाही की ज्याला मधुमेह म्हणता येईल. सुमारे ८.८ कोटी अमेरिकनांमध्ये ही स्थिती आढळते.

वस्तूंचे बंड

Image
मिलिंद पदकी न्यू जर्सीस्थित औषध-वैज्ञानिक. आता मेडिकल लेखक. २०१७ मध्ये मराठी काव्यसंग्रह "बदकनामा " प्रसिद्ध (ग्रंथाली, मुंबई). मराठी आणि इंग्रजीतून वैज्ञानिक आणि ललित लेखन.   वस्तूंचे बंड

भाषाविचार - अवघड जागची भाषा

Image
मेघना भुस्कुटे मी व्यवसायानं भाषांतरकार आहे. भाषा, व्याकरण, प्रमाणलेखन, चित्रपट, नाटक हे माझे रसविषय. सुमारे पंधरा वर्षांपासून मराठी ब्लॉगिंग करते. काही मासिकांतून साहित्यविषयक सदर लिहिते. काही ऑनलाईन नियतकालिकांकरता संपादन करते. माझ्या शाळेतल्या मैत्रिणीनं सांगितलेला एक किस्सा आठवतो. आम्ही मराठी माध्यमाच्या शाळेत होतो. साहजिक कॉलेजमध्ये गेल्यावर इंग्रजीशी जुळवून घ्यावं लागलं. घेतलं.

चित्रसाहित्य

Image
मंडळी, ह्या वर्षी ‘चित्रसाहित्य’ हे नवे सदर आपण सुरु केले आहे. जुलै २०२२ च्या अंकात शेजारची चार छायाचित्रे दिली होती. त्यातील एका वा जास्त चित्रांवरून सुचलेले विचारसाहित्य तुम्ही आम्हाला लिहून कळवायचे होते. ह्या नव्या सदाराला तुम्ही प्रतिसाद दिलात, त्याबद्दल तुमचे अनेक आभार.

चित्रसाहित्य - फक्त विक्रेते की उद्याचे उद्योजक?

Image
बन्सरी मोडक "ओ ताई, वांगी घ्या की!" भाज्यांनी भरलेली पिशवी घेऊन जाताना शेजारून आवाज आला. वळून बघितलं तर एक विशीतला तरुण मुलगा मला सांगत होता. मी काही दिवस भारतात जाऊन राहिले तेंव्हाची ही गोष्ट. आता पिशवी भरून भाज्या घेतल्यावर, अजून कशाला वांगी पाहिजेत? मी मानेनंच त्या मुलाला नाही म्हटलं आणि चालू लागले. "अहो घ्या ना!" तो मुलगा. हे मला नवीन होतं!

चित्रसाहित्य - माझे पहिले दुकान

Image
राघव महाजन नमस्कार, मी वेदांश पटेल. मार्च १२, २०१३ च्या दिवशी मी माझं पहिलं दुकान चालू केलं. माझ्या दुकानाचं नाव ‘पटेल बाजार’ ठरवलं. त्या दिवशी मला खूप चांगलं वाटलं, कारण आता माझं एक दुकान आहे आणि मी पैसे कमवू शकतो.

हवा

Image
योगेश सावंत राहणार डोंबिवली. अर्थशास्त्रात पदवीधर, सध्या खासगी कंपनीमध्ये काम करतात, कविता वाचण्याचा आणि लिहिण्याचा छंद. हवा

नुब्रा व्हॅली, लडाख

Image
प्रिया जोशी मी प्रिया जोशी, राहणार क्लार्क्सबर्ग, मेरीलँड. मूळची ठाणे/मुंबईची. २०१६पासून या भागात आहोत. मी एक सामान्य आनंदी व्यक्ती आहे. मी नेहमीच आणि सर्व मार्गांनी निराशावादी विचार आशावादी विचारांमध्ये बदलण्याचा प्रयत्न करते.