Posts

Showing posts from January, 2021

संपादकीय

Image
जानेवारी २०२१ अंक १ मैत्र संपादक मंडळ २०२१   वरदा वैद्य  विदुला कोल्हटकर  रोहित कोल्हटकर  कपिल धाकड  मधुर पुरोहित    बाममं कार्यकारिणी २०२१  अध्यक्ष   रोहित कोल्हटकर  उपाध्यक्ष  ऋद्धी आठवले वाडदेकर    उपाध्यक्ष- विपणन  समीर अहिरराव पाटील  चिटणीस  मधुर पुरोहित  खजिनदार  केतन बर्डे  सह-खजिनदार  रवी महाजन सध्या हिवाळा आणि त्यात करोना. त्यामुळे ‘हेमंती तर नुरली हिरवळ, शिशिर करी ह्या शरीरा दुर्बल’ अशी स्थिती झाली आहे. मात्र, सूर्याने उत्तरायणास सुरुवात केली आहे. मकरवृत्ताच्या भोज्याला शिवून सूर्य कर्केकडे चालू पडला आहे. ‘पुन्हा वसंती डोलणाऱ्या पर्णकेतूंची’ अपेक्षा मनाला उभारी देणारी आहे.

पुनर्जन्म

Image
अरुंधती सरपटवारी "आई पुनर्जन्म म्हणजे काय?" मी स्वयंपाकघरात रवा भाजण्यात मग्न असताना हा अनपेक्षित प्रश्न कानांवर पडला. रॉकीच्या मागे पळतापळता माझ्या आठ वर्षाच्या मुलाने- अमितने- हा प्रश्न मला पुनःपुन्हा विचारला.

बिनासाखरेचे व्हीगन तीळलाडू

Image
सुनंदा काकडे व्हीगन, नैसर्गिक शर्करायुक्त, पौष्टिक तीळलाडू. संक्रांतीला उपयुक्त.

शुभोसाठी प्रसाद

Image
धनंजय वैद्य “सतीश! विनूला घेऊन जा तुझ्याबरोबर शुभोजितच्या घरी,” आई दादाला म्हणाली. दादानी नेहमीसारखं खाडकन् “नको येऊस रे !” म्हटलं नाही.

साधू संत येति घरा, तोचि दिवाळी दसरा!

Image
श्रीमती चित्रा धाकड आपल्या पूर्वजांनी किती छान विचार दिले आहेत आपल्याला! म्हणूनच जुने ते सोने आहे. सोन्याची शुद्धता करायलासुद्धा त्याला प्रखर अग्नीतून जावे लागते. दिवाळी हा सण मोठा आहे पण त्यामागची भावना, ते विचार, नात्यातील संबंध, जिव्हाळा, त्या पाच दिवसातील ती पवित्र पूजा, त्यामागचा हेतू, ती दिव्यता, ती परंपरा आपल्या ऋषींनी आपल्याला समजावली व आपल्या पूर्वजांनी ती टिकवून ठेवली.

पौराणिक कथा : भाग १ - पुराणांची माहिती

Image
अवंती करंदीकर भारतीय प्राचीन साहित्यामध्ये वेद, उपनिषदे आणि पुराणे ह्यांचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. ते कळण्यासाठी आपल्याला 'श्रुती' आणि 'स्मृती' म्हणजे काय हे समजून घ्यावे लागेल. परंपरेनुसार अनंत काळापासून ऐकण्याचे व सूचित करण्याचे साधन म्हणजे 'श्रुती' तर साहित्यिकांनी लिहिलेले किंवा आठवून लिहिलेले ते 'स्मृती'.

मुंबईची रिक्षा-टॅक्सी - एक अनुभव

Image
शारदा सबनीस मुंबईची रिक्षा-टॅक्सी - एक अनुभव रिक्षा ही मुंबईच्या उपनगरांची गरज आहे. त्यांना परवाने कसे मिळतात, वार्षिक किती रिक्षाना कायद्यानुसार परवाने दिले जातात, का दिले जातात, एवढया परवान्यांची गरज आहे का? इत्यादी प्रश्न ह्या लेखाच्या मर्यादेबाहेर आहेत. २००८ च्या मोजणीप्रमाणे मुंबई महानगरपालिका विभागामध्ये (MMR) २४६,४५८ काळ्या-पिवळ्या मीटर असलेल्या रिक्षा धावतात. तसेच साधारण ५८,००० काळ्या-पिवळ्या टॅक्सी आहेत. (संदर्भ: Public transport in Mumbai, From Wikipedia).

प्रतिबिंब

Image
अरुंधती सरपटवारी प्रतिबिंब

झटापट ते झटपट

Image
वरदा वैद्य फार फार म्हणजे सात वर्षांपूर्वीची गोष्ट. दिवाळीत लाडू करायला जमले नव्हते, म्हणून थँक्सगिव्हिंगच्या सुट्टीत बेसनाचे लाडू करण्याची दुर्बुद्धी मला सुचली. कढईत दोन कप बेसन थोड्या तुपावर भाजायला घेतले.

दिवाळीचे लाडू

Image
मुग्धा मुळे दिवाळीचे लाडू  दिवाळी म्हटली की फराळ आलाच. दिवाळी लाडवांशिवाय पूर्णच होऊ शकत नाही. मी दरवर्षी बेसनाचे लाडू करते. म्हटलं तर सोपे, म्हटलं तर तारेवरची कसरत. ह्या वर्षीचे वैशिष्ट्य म्हणजे मी दिवाळीआधी १५ दिवसांपासून व्हीगन झाले. आरोग्य, पर्यावरण जपणे ही त्यामागची कारणे. असो.

पुस्तकांचं गाव

Image
बाळकृष्ण पाडळकर ट्रॉय, मिशिगन bmpadalkar@gmail.com ....पळती झाडे पाहू या ! मामाच्या गावाला जाऊ या !!

सनी साईड अप

Image
चक्रपाणि चिटणीस कुपर्टिनो, कॅलिफोर्नियास्थित सॉफ्टवेअर अभियंता, हौशी लेखक, कवी, खवय्या, आठ वर्षांचा बाबा आणि आणखी काही काही. सन २००५ पासून मनोगत, मायबोली, मिसळपाव इ. मराठी संकेतस्थळांवर नियमित वावर आणि लेखन. मनोगत आणि मिसळपावच्या दिवाळी अंकांसाठी लेखन. बरेचसे ब्लॉग आणि ‘मैं और मेरी तनहाई’ या फेसबुक पेजच्या माध्यमातून वैयक्तिक लेखन. लेखनाव्यतिरिक्त अभिनय, नाट्यसंहिता लेखन आणि नाट्यदिग्दर्शनाची आवड आणि त्याच्याशी संबंधित सॅन फ्रान्सिस्को बे एरियात चालणाऱ्या उलाढालींमध्ये सक्रीय सहभाग. सध्या या सगळ्यांच्या जोडीला संगणकशास्त्रातील डॉक्टरेटसाठी सॅन्टाक्लॅरा विद्यापीठात धडपड चालू. शनिवार नि रविवार सकाळी कितीही उशीरा उठायचं ठरवलं, तरी शक्य होतंच असं नाही. मुळात, उशीरापर्यंत लोळत पडणे ही शिकरण नि मटार उसळीच्या पुढच्या लेव्हलची चैन आहे, हे आमच्यासारख्यांना कधी कळणार हा प्रश्नच आहे.

जागतं घर

Image
श्वेता चक्रदेव परवा घरी कुणीतरी राहायला आलं होतं आणि मी उठायच्या आधी ते लोक उठून गप्पा मारत बसले होते. मला बोलणं स्पष्ट ऐकू येत नव्हतं आणि ते गरजेचंही नव्हतं. ती घरातली जाग मात्र घड्याळाचे काटे गरगर मागे फिरवावे तशी कित्येक वर्षं मागे घेऊन गेली.

नवीन वर्षाचे स्वागत करीत असतांना.....

Image
शरद पांडुरंग काळे निवृत्त वैज्ञानिक भाभा अणुसंशोधन केंद्र sharadkale@gmail.com नववर्षाचे स्वागत करण्याच्या विविध रीती जगातील वेगवेगळ्या देशांमध्ये प्रचलित आहेत. आपण आपल्या नवीन वर्षाचे स्वागत करतांना गुढ्या उभारतो, तोरणे बांधतो, मिष्टान्नाचे भोजन करतो आणि नवीन वर्षाच्या शुभेच्छा देतो. आपले नवीन वर्ष जरी गुढी पाडव्याला सुरू होत असले, तरी व्यावहारिकदृष्ट्या जगात सर्वत्र १ जानेवारी हा दिवस नववर्ष दिन म्हणून साजरा होतो.

संक्रांती आणि उत्तरायण

Image
अभिजित अधिकारी परिचय