Posts

Showing posts from January, 2022

संपादकीय

Image
जानेवारी २०२२ अंक १ मैत्र संपादक मंडळ २०२ २   वरदा वैद्य  विदुला कोल्हटकर  रोहित कोल्हटकर  कपिल धाकड  मधुर पुरोहित    बाममं कार्यकारिणी २०२ २   अध्यक्ष   मोनिका देशपांडे  उपाध्यक्ष  रुचिरा महाजन     उपाध्यक्ष- विपणन  मुग्धा मुळे   चिटणीस  स्मितेश लोकरे  खजिनदार  दीपान्विता काळेले  सह-खजिनदार  रमा गंधे नमस्कार मंडळी, गेल्या दोन कोविडग्रस्त वर्षांमध्ये आपले घरात असण्याचे प्रमाण वाढले तसा आपला स्क्रिनटाईमही खूप वाढला आहे. टीव्ही, नेटफ्लिक्स, प्राईम वगैरेंवर नवनव्या मालिका, चित्रपट वगैरे पाहण्याचे प्रमाण वाढले आहे. बसल्याबसल्या आपल्या मोबाईलशी चाळा करण्याचे, संगणकासमोर बसण्याचे प्रमाण वाढले आहे.

डेस्टिनेशन वेडिंग - जोशी मंगल कार्यालय

Image
विदुला कोल्हटकर नाट्यछटा: सध्याची सामाजिक स्थिती बघता आणखी अनेक वर्षांनी पारंपरिक लग्न ही जुनी/कालबाह्य कल्पना असेल. प्रत्यक्ष भेटी दुर्मिळ होतील आणि नेहमीच्या भेटीगाठी ई-भेटी किंवा मेटफॉर्ममधल्या/ मेटावर्समधल्या मेटाभेटी असतील. हे अजून अनेक दशकांनंतर पुण्यात राहणाऱ्या एका आईचं मनोगत .

रिकामे घरटे

Image
अरुंधती सरपटवारी नेहमी प्रमाणे मी कॅाम्प्युटरवर काम करत होते. काम करता करता मधून मधून खिडकीबाहेर डोकावण्याची सवय झाली होती.

दिवाळीचा फराळ आणि आठवणी

Image
पद्मा लोटके ऑक्टोबर महिना आला आणि थंडी पडायला लागली की दिवाळीच्या आठवणी दाटून येतात. कोजागरी पौर्णिमेनंतर येणाऱ्या एकादशीला आकाशदिवा लावला की दिवाळीची लगबग सुरु व्हायची. कॅनडाला आल्यावर सुरुवातीला बरीच वर्षं फराळ स्वतः घरीच बनवायचे.

जिममध्ये जावेच लागेल!

Image
मिलिंद पदकी न्यू जर्सीस्थित औषध-वैज्ञानिक. आता मेडिकल लेखक. २०१७ मध्ये मराठी काव्यसंग्रह "बदकनामा " प्रसिद्ध (ग्रंथाली, मुंबई). मराठी आणि इंग्रजीतून वैज्ञानिक आणि ललित लेखन. सध्या प्रामुख्याने ‘कोव्हिड’विषयक लेखनावर भर.  जिममध्ये जावेच लागेल!

जरा विसावू या वळणावर - भाग २

Image
डॉ. जयश्री कुलकर्णी- खेरा भारतात नेत्ररोग तज्ज्ञ आणि सार्वजनिक आरोग्यतज्ज्ञ म्हणून शासनात उच्च पदावर काम केले. वेगवेगळ्या पुरस्कारांनी सन्मानित. सध्या साइक्सविल, मेरीलँड येथे वास्तव्य. भटकंती, लिखाण, वाचन, संगीत, नृत्य, हेल्दी कुकिंगची आवड. Life is what is happening while you are busy making other plans! वय वाढणे हे नैसर्गिक आहे. परंतु ते अनैसर्गिक पद्धतीने जगल्यास अकाली प्रौढत्व येते.

हेचि फूल होय मम तपाला

Image
वरदा वैद्य सहा-सात वर्षांपूर्वीची गोष्ट. नोकरीनिमित्ताने पेन्सिल्वेनियातून मेरीलँडमध्ये राहायला येण्याचं नक्की झालं आणि आम्ही मेरीलँडात घर शोधण्याच्या मोहिमेला सुरुवात केली.

अति तेथे माती?...छे हो....अति तेथे प्रगती!

Image
मधुर पुरोहित गेल्या उन्हाळ्यातल्या शनिवारची दुपार होती. छान जेवण झालं होतं. शतपावली झाली आणि म्हटलं आता जरा पडी टाकावी.

सिद्दी (ला) जोहार

Image
बाळकृष्ण पाडळकर सध्या वास्तव्य ट्रॉय, मिशिगन येथे. डिसेंबर, २०२१मध्ये नाशिक येथे पार पडलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनामध्ये श्री. पाडळकरांच्या 'कथेकरी या पुस्तकाचे विमोचन श्री. पृथ्वीराज तौर यांच्या हस्ते झाले. हे पुस्तक नाशिकच्या सुप्रसिद्ध दिशोत्तमा प्रकाशन यांनी प्रकाशित केले. यापूर्वी प्रकाशित झालेल्या त्यांच्या 'कथनी' या कथा संग्रहाबरोबर 'कथेकरी' ग्रंथ विक्रीस उपलब्ध होता. वाचकांनी दोन्ही ग्रंथांना पसंती दर्शवून त्यांच्या प्रति विकत घेतल्या. सीताराम सिद्दी त्याच्या कॉलेजच्या मित्रांबरोबर सहलीला आला होता. त्याच्या सोबत त्याच्या वर्गातले दहा-बारा मित्र आणि एक प्राध्यापकही होते.

कोविड विषाणू : नवा ‘ओमायक्रॉन’ व्हेरियंट

Image
मिलिंद पदकी न्यू जर्सीस्थित औषध-वैज्ञानिक. आता मेडिकल लेखक. २०१७ मध्ये मराठी काव्यसंग्रह "बदकनामा " प्रसिद्ध (ग्रंथाली, मुंबई). मराठी आणि इंग्रजीतून वैज्ञानिक आणि ललित लेखन. सध्या प्रामुख्याने ‘कोव्हिड’विषयक लेखनावर भर. कोविड-१९ हा रोग निर्माण करणारा सार्स-कोव्ह-२ विषाणू (व्हायरस) हा एक आरएनए जातीचा विषाणू आहे.

त्रिकाल

Image
रवींद्र जोगळेकर,पुणे आकाशगंगा, सूर्यमाला, ग्रह, नक्षत्र, तारे - अखिल विश्वाचा हा अतिप्रचंड महापसारा. त्यातील फक्त आपल्या पृथ्वीवर मानवाचे अस्तित्व सिद्ध झाले आहे. स्थूलपणे सजीव, निर्जीव अशी विभागणी.

संध्या का सकाळ?

Image
अरुंधती सरपटवारी संध्या का सकाळ?

एक शाही आजार

Image
अमोघ वैद्य, पुणे M.A. - संस्कृत , इंडोलॉजी आत्तापर्यंत लिहिलेले ललित लेख मासिक, वर्तमानपत्र यांत प्रसिद्ध झाले आहेत. नाटक या क्षेत्रात लिहिणे , दिग्दर्शन आणि अभिनय इ काम करत आहेत . अभिनय आणि लेखनाची बक्षिसे. समिधा या माहिती लघुपटाचे लेखन .सोनी मराठीवरील 'सावित्री ज्योती' या सीरिअल मध्ये अभिनय. Youtube वरील 'मराठी किडा' या चॅनल वर लेखन, दिग्दर्शन हे काम तसेच लेखक हे सध्या खादाड किडा या चॅनल द्वारे सूत्रसंचालन (anchor) करत आहेत. दोन दिवस झाले मला झोप नव्हती. नुसता गादीवर पडून होतो. या दोन दिवसात मी फक्त ताकावरच होतो. त्याचं कारणही तसंच होतं म्हणा. मला एक आजार झाला होता - 'ऍसिडिटी'.

भाषाविचार – शाब्दिक कोडे

'ण' ह्या अक्षराने संपणारे तीन अक्षरी शब्द ओळखा

नवे सदर - चित्रसाहित्य

Image
शाळेत असताना इयत्ता चौथी आणि सातवीच्या शिष्यवृत्ती परीक्षांना तुम्ही बसला होता का? त्यावेळी भाषा, गणित आणि बुद्धिमत्ता चाचणी अशा तीन भागांत ह्या परीक्षा होत असत.