Posts

Showing posts from 2021

संपादकीय

Image
ऑक्टोबर २०२१ अंक ४ मैत्र संपादक मंडळ २०२१   वरदा वैद्य  विदुला कोल्हटकर  रोहित कोल्हटकर  कपिल धाकड  मधुर पुरोहित    बाममं कार्यकारिणी २०२१  अध्यक्ष   रोहित कोल्हटकर  उपाध्यक्ष  ऋद्धी आठवले वाडदेकर    उपाध्यक्ष- विपणन  समीर अहिरराव पाटील  चिटणीस  मधुर पुरोहित  खजिनदार  केतन बर्डे  सह-खजिनदार  रवी महाजन नमस्कार मंडळी, आली दिवाळी मंगलदायी, आनंद झाला घरोघरी!

आमचे विठ्ठल मंदिर

Image
शर्मिली सिन्नरकर-कुलकर्णी उठा पांडुरंगा आता दर्शन द्या सकळा | झाला अरुणोदय सरली निद्रेची वेळा || या माझ्या आजी, आई आणि दोन्ही काकूंच्या सुमधुर आवाजाने माझ्यावर संस्कार होतच मी लहानाची मोठी झाले, याला कारण माझ्या माहेरचे (आमचे) नारायण पेठ, पुणे येथील खाजगी विठ्ठल मंदिर. ह्या विठ्ठल मंदिरातील माझ्या आई-वडिलांची ७वी पिढी.

ग्राम - गाव

Image
सौ. श्रीया दीक्षित-नाचरे, पुणे भारतीय विद्या पारंगत, मोडी लिपी वाचक-शिक्षक व अभ्यासक shreeyanachare@gmail.com ग्राम म्हणजे गाव. ग्राम हा संस्कृत शब्द आहे. वैदिक काळातील ग्राम या शब्दाचा अर्थ 'काही काळ वास्तव्याचे ठिकाण' असा आहे. म्हणजे ग्राम या शब्दाचा अर्थ आपण आज ज्याअर्थाने गाव हा शब्द वापरतो त्यापेक्षा खूपच वेगळा आहे असं दिसतं.

मला आवडलेली मिरासदारी

Image
संजीव कुलकर्णी संजीव कुलकर्णी पुण्याचे रहिवासी आहेत. त्यांनी सूक्ष्मजीवशास्त्रात एम एससी , मास्टर्स इन मार्केटिंग मॅनेजमेंट, व मार्केटिंग विषयात पीएचडी केलेले असून ते बिझनेस मॅनेजमेंट विषयाचे प्राध्यापक आहेत. सध्या मराठी विषय घेऊन पीएचडी करत आहेत. त्यांची अनुदिनी इथे वाचता येईल - www.sanjopraav.wordpress.comसंपर्कांसाठी दूरध्वनी क्रमांक +९१ ९८२३१७९५९७. सदर लेख त्यांच्या अनुदिनीवर पूर्वी प्रकाशित झाला होता. प्रसिद्ध लेखक द. मा. मिरासदार ह्यांचे २ ऑक्टोबर २०२१ रोजी दुःखद निधन झाले. त्यांच्या स्मृतीस अभिवादन म्हणून हा लेख इथे पुनर्प्रकाशित करत आहोत. द. मा. मिरासदार हे मराठीतले आघाडीचे विनोदी लेखक. लोकप्रियता हा यशस्वी होण्याचा निकष लावायचा झाला तर अगदी यशस्वी लेखक.

माझे व्हीगन प्रयोग

Image
मुग्धा मुळे दिवसा सॉफ़्टवेअर डेव्हलपर आणि रात्री फ़ॅशन डिझायनर. पँडेमिकमुळे मला फेसबुक आणि इन्स्टा बघायला बराच वेळ मिळायला लागला. फेसबुकवर योगा, एरोबिक्स, झुंबा इत्यादी करून चवळीच्या शेंगा झालेल्या बायका फोटो टाकू लागल्या. निरनिराळ्या डाएटचे पेव फुटले. मग मला पण वाटले की आपण पण थोडे वजन घटवूया.

प्रभा

Image
विदुला कोल्हटकर 'दादासाहेब गायकवाड दवाखान्यात दाखल’ ‘प्रकृती गंभीर तरी स्थिर डॉक्टरांनी दिला निर्वाळा’ ‘पुढील ४८ तास महत्त्वाचे’

देस-परदेस

Image
बाळकृष्ण पाडळकर सध्या वास्तव्य ट्रॉय, मिशिगन येथे. त्यांनी भाषांतरित केलेल्या ‘ओवीस्वरूप श्रीमद्भगवद्गीते’चा विडिओ युट्युबवर उपलब्ध आहे- www.youtube.com/channel/UCKDIFeXQt1KAEhZfuvR6OcQ सुवर्णपुरी हे गोदावरी नदीच्या काठी वसलेले एक लहान गाव. सुवर्णपुरीची लोकसंख्या केवळ चार हजार. गावात मुख्यत्वे करून ब्राह्मण समाज असल्यामुळे वर्षभर धार्मिक विधी चालत. गोदावरीच्या काठावर एक अतिप्राचीन असे शंकराचे मंदिर असल्यामुळे गावात नेहमी भाविकांची वर्दळ असायची. धार्मिक विधींसोबत श्राद्ध, अस्थिविसर्जन, अंत्यसंस्कार यासारखी क्रियाकर्मे करण्यासाठी लांबून लोक इथे येत.

गणपती बाप्पा

Image
अथर्व बेंगेरी ग्रेड: ४, शाळा: North Chevy Chase ES गणपती बाप्पा

चूल वर पिझ्झा

Image
सुनील खाडिलकर मराठी कला मंडळ व बाममं दरम्यान होणाऱ्या साहित्याची देवाणघेवाण उपक्रमाअंतर्गत हा लेख हितगुजच्या होळी २०२१ अंकातून घेतला आहे. आजकाल करोनामुळे सर्वच गोष्टी व्हर्चुअल चालू आहेत. मध्ये मला थोडा ताप आला होता म्हणून डॉक्टरांना कॉल केला तर रिसेप्शनने व्हर्चुअल अपॉइंटमेंट घ्यायला सांगितले. वेबसाइट वर जाणे म्हणजे मोठं आव्हान होतं. हल्ली लॉग इन करणे जास्तच अवघड झाले आहे.

"एक अगम्य लालसा आणि पाच डॉलर्स"

Image
मिलिंद पदकी न्यू जर्सीस्थित औषध-वैज्ञानिक. आता मेडिकल लेखक. २०१७ मध्ये मराठी काव्यसंग्रह "बदकनामा " प्रसिद्ध (ग्रंथाली, मुंबई). मराठी आणि इंग्रजीतून वैज्ञानिक आणि ललित लेखन. सध्या प्रामुख्याने ‘कोव्हिड’विषयक लेखनावर भर. सूर्याचे ऊन्ह वाढत चालले होते. मॉल चमकत होता.

जरा विसावू या वळणावर - भाग १

Image
डॉ. जयश्री कुलकर्णी- खेरा भारतात नेत्ररोग तज्ज्ञ आणि सार्वजनिक आरोग्यतज्ज्ञ म्हणून शासनात उच्च पदावर काम केले. वेगवेगळ्या पुरस्कारांनी सन्मानित. सध्या साइक्सविल, मेरीलँड येथे वास्तव्य. भटकंती, लिखाण, वाचन, संगीत, नृत्य, हेल्दी कुकिंगची आवड. ४०, ५०, ६० वर्षे ही अत्यंत महत्त्वाची वर्षे आहेत! आपल्याकडे चाळीशीला खूप महत्त्व दिले आहे. चाळीशीत खरे आयुष्य सुरू होते असेही म्हणतात.

भेटी लागी जीवा

Image
               दीपा अनिल नातू २०२० चे वर्ष कोरोनामुळे सगळ्यांनाच वाईट गेले होते. पण त्यातल्या त्यात वर्ष सरता सरता म्हणजे २९ डिसेंबर २०२० रोजी आमच्या पहिल्या वहिल्या नातवंडाच्या आगमनाची गोड वार्ता आम्हाला कळली आणि मन आनंदून गेले. हल्ली लगेच फोटो काढतात त्यामुळे आणि व्हिडिओ कॅालमुळे आम्हाला त्याला लगेच बघता आले.

मनातला गणपती

Image
भाग्यश्री साने गणपती आणि गौरींचे दिवस म्हणजे आठवणींचा खजिना आणि प्रसन्न, मंगलमय दिवसांची सुरुवात. मराठी सणांमध्ये अतिशय महत्त्वाचे स्थान असलेला गणेशोत्सव लहान, थोर अश्या सगळ्यांनाच आपलासा वाटतो. माझ्या माहेरी एकत्र कुटुंब पद्धती. आमच्याकडे गणपती बसवण्याची प्रथा नव्हती, परंतु गौराई अतिशय थाटामाटात साजरी व्हायची.

उकडीचे मोदक

Image
सविता शिंदे नमस्कार मंडळी! मैत्रच्या अंकामध्ये मला पाककृती शेअर करण्याची संधी दिल्याबद्दल, सर्वप्रथम, मैत्रचे खूप खूप आभार. आज मी आपल्याला गणपती बाप्पाच्या आवडत्या मोदकांची पाककृती सांगणार आहे.

संपादकीय

Image
जुलै २०२१ अंक ३ मैत्र संपादक मंडळ २०२१   वरदा वैद्य  विदुला कोल्हटकर  रोहित कोल्हटकर  कपिल धाकड  मधुर पुरोहित    बाममं कार्यकारिणी २०२१  अध्यक्ष   रोहित कोल्हटकर  उपाध्यक्ष  ऋद्धी आठवले वाडदेकर    उपाध्यक्ष- विपणन  समीर अहिरराव पाटील  चिटणीस  मधुर पुरोहित  खजिनदार  केतन बर्डे  सह-खजिनदार  रवी महाजन नमस्कार मंडळी,

स्क्रीन आणि फॅशन

Image
विदुला कोल्हटकर "क्काय!" ढॅण ढॅण ढॅण कॅमेरा पुन्हा पुन्हा तिच्या चेहऱ्यावर जात होता. जसं काही पहिल्यांदा ती “क्काय” म्हणाली तेव्हा तुम्ही फोनकडे बघत असाल, तर 'इकडे लक्ष द्या' म्हणून मोठा आवाज आणि हा बघा रिटेक.

किमची

Image
मल्हार मंदसौरवाले यावर्षी माझ्या उन्हाळी प्रकल्पासाठी कोरियन किमची बनवायचं ठरवलं. त्याआधी या पदार्थाबद्दल मी सिनेमात आणि यूट्यूब व्हिडीओवर पाहिल होतं. किमची आणि ती पण व्हेजिटेरियन किमची करून बघूया अशी इच्छा खूप दिवसांपासून होती.

संगीतप्रेमी- केदार सुळे

Image
पूनम दिघे सुळे शेक्सपिअरने म्हटलंच आहे, "There is nothing in the world so much like prayer as music is." खरंच, संगीतासारखे प्रार्थनेचे दुसरे स्वरूप नाही! अशाच एका संगीत कलोपासकाची ओळख आज आपण करून घेणार आहोत.

फळंबिळं आणि संपवासंपवी

Image
वरदा वैद्य आमच्या वाड्यात मी लहानाची मोठी झाले. मात्र ‘वाडा’ म्हटल्यावर जे स्वरूप डोळ्यासमोर येतं, त्यापेक्षा आमचा हा शहरी वाडा वेगळा होता. आमचा वाडा तिमजली. वाड्याच्या दर्शनी बाजूंना दुकानं होती.

पँडेमिक

Image
अथर्व बेंगेरी ग्रेड: ४, शाळा: North Chevy Chase ES Everyone is at home So no one is visiting Rome

केसर

Image
चक्रपाणि चिटणीस लेखकाविषयी - चक्रपाणि चिटणीस, कुपर्टिनो, कॅलिफोर्नियास्थित सॉफ्टवेअर अभियंता, हौशी लेखक, कवी, खवय्या, आठ वर्षांचा बाबा आणि आणखी काही काही. सन २००५ पासून मनोगत, मायबोली, मिसळपाव इ. मराठी संकेतस्थळांवर नियमित वावर आणि लेखन. मनोगत आणि मिसळपावच्या दिवाळी अंकांसाठी लेखन. बरेचसे ब्लॉग आणि ‘मैं और मेरी तनहाई’ या फेसबुक पेजच्या माध्यमातून वैयक्तिक लेखन. लेखनाव्यतिरिक्त अभिनय, नाट्यसंहिता लेखन आणि नाट्यदिग्दर्शनाची आवड आणि त्याच्याशी संबंधित सॅन फ्रान्सिस्को बे एरियात चालणाऱ्या उलाढालींमध्ये सक्रीय सहभाग. सध्या या सगळ्यांच्या जोडीला संगणकशास्त्रातील डॉक्टरेटसाठी सॅन्टा क्लॅरा विद्यापीठात धडपड चालू. ह्या कथेमागील उपक्रमाबद्दल थोडेसे ‘Monologue’ हा सॅन फ्रान्सिस्को- बे एरियातील हौशी लेखकूंनी हाती घेतलेला प्रकल्प आहे. सुधीर धर्माधिकारी यांच्या कल्पनेतून तो आकारास आला आणि त्यांच्याच पुढाकाराने २०२० साली याची सुरुवात झाली.

गृहलक्ष्मी

Image
श्रीमती चित्रा धाकड Elkridge MD "स्वधर्मासी जागली, पतीपुढे ती स्वर्गा गेली। सतधर्माची पूर्ती केली, नारी धर्म हा !!" जीवन हे एक कोडे आहे. जग एक रंगभूमी आहे. त्यात आपण वेगवेगळी पात्रे आहोत.

लक्षणीय महेश्वर

Image
नीलिमा कुलकर्णी रेस्टन, व्हर्जिनिया मराठी कला मंडळ व बाममं दरम्यान होणाऱ्या साहित्याची देवाणघेवाण उपक्रमाअंतर्गत हा लेख हितगुजच्या मे२०२१मध्ये प्रकाशित झालेल्या भटकंती अंकातून घेतला आहे काही ठिकाणं अशी असतात की तेथील वास्तूच्या भिंती, आणि भोवतालचा परिसर इतिहासाची पानं उलगडू लागतात. शाळेत असतांना इतिहासाच्या वर्गात वाचलेलं जग अचानक जिवंत होऊन आपल्या पुढ्यात येतं. इंदौरच्या (मध्य प्रदेश) जवळचे महेश्वर हे यातलंच एक गाव !

गाईड

Image
बाळकृष्ण पाडळकर ट्रॉय -मिशिगन परतवाडा सातपुड्याच्या कुशीत विसावलेले एक गाव. ना शहर ना खेडे. आजूबाजूच्या निसर्गसौंदर्याने नटलेले, शांत, निरामय आयुष्य जगणाऱ्यांचे गाव. गावाच्या पूर्वेकडून पश्चिमेकडे वाहणाऱ्या सपन आणि बिच्चन या लहान नद्या परतवाड्याच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी एकमेकींमध्ये स्पर्धा करताना दिसतात. त्यांची चंद्रभागेच्या जाऊन मिळण्याची अधीरता सहज लक्षात येते.

अमेरिकेतील अरण्य-मृत्यू

Image
मिलिंद पदकी न्यू जर्सीस्थित औषध-वैज्ञानिक. आता मेडिकल लेखक. २०१७ मध्ये मराठी काव्यसंग्रह "बदकनामा " प्रसिद्ध (ग्रंथाली, मुंबई). मराठी आणि इंग्रजीतून वैज्ञानिक आणि ललित लेखन. सध्या प्रामुख्याने ‘कोव्हिड’विषयक लेखनावर भर. तऱ्हेतऱ्हेचे मृत्यू शोधायचे झाले तर बर्फाळ वारा शांतपणे झोपलेल्या खडकांवर पसरताना दिसतो, काही झाडांना वाकवीत चिरनिद्रेत मग्न कवट्यांमधले स्वप्न जागवीत.

संपादकीय

Image
एप्रिल २०२१ अंक २ मैत्र संपादक मंडळ २०२१   वरदा वैद्य  विदुला कोल्हटकर  रोहित कोल्हटकर  कपिल धाकड  मधुर पुरोहित    बाममं कार्यकारिणी २०२१  अध्यक्ष   रोहित कोल्हटकर  उपाध्यक्ष  ऋद्धी आठवले वाडदेकर    उपाध्यक्ष- विपणन  समीर अहिरराव पाटील  चिटणीस  मधुर पुरोहित  खजिनदार  केतन बर्डे  सह-खजिनदार  रवी महाजन नमस्कार मंडळी,

छान

Image
सौ. श्रीया दीक्षित-नाचरे, पुणे भारतीय विद्या पारंगत, मोडी लिपी वाचक-शिक्षक व अभ्यासक shreeyanachare@gmail.com सदर लेख ऑक्टोबर २०२० मध्ये महाराष्ट्र टाईम्समध्ये प्रकाशित झाला होता. छान म्हणजे काय? हा काय प्रश्न झाला? प्रश्नाचं उत्तर सोपं आहे! छान म्हणजे छान, मस्त, उत्तम इ. हो ना? छान हा शब्द आपण एखादी गोष्ट कशी चांगली आहे हे सांगण्यासाठी वापरतो. पण मग त्यात सांगण्यासारखं किंवा लिहिण्यासारखं काय आहे?

कपडे पाहावे शिवून

Image
मुग्धा मुळे दिवसा सॉफ़्टवेअर डेव्हलपर आणि रात्री फ़ॅशन डिझायनर. मायन दिनदर्शिकेप्रमाणे २०१२ ह्या वर्षी जग संपेल असे भाकीत होते. पण २०२० ह्या वर्षाने खरोखरीच तसे होईल की काय ह्याची जाणीव करून दिली. लोक एकांत मिळायला हिमालयात जातात किंवा इकडे अमेरिकेत जंगलात राहतात, पण २०२० ने एकांत घरातच आणून ठेवला. कोरोना नामक सूक्ष्मजीवाने जगभर भल्याभल्या बलवान लोकांनाच काय, पण बलाढ्य राष्ट्रांनादेखील जेरीस आणले. उगाच नाही म्हणत Powerful things come in small packages.

मुंबई विमानतळ

Image
गजानन सबनीस बाल्टिमोर परिसरात राहणारे बहुतेक मराठी रहिवासी मुंबईच्या नवीन विमानतळावर उतरून घरी गेले असतील. मुंबईच्या विमानतळाचा इतिहास त्यापैकी किती जणांना माहीत असेल असा विचार करून माझ्या अनुभवांतून त्याबद्दल काही लिहावे ह्या हेतूने हा लेख लिहिला आहे.

आचार्य प्रल्हाद केशव अत्रे

Image
प्रविणा आनिखिंडी मराठी कला मंडळ व बाममं दरम्यान होणाऱ्या साहित्याची देवाणघेवाण उपक्रमाअंतर्गत हा लेख हितगुज अंकाच्या होळी २०२० अंकातून घेतला आहे. प्रल्हाद केशव अत्रे ऊर्फ आचार्य अत्रे हे मराठीतील नावाजलेले लेखक, कवी, नाटककार, संपादक, पत्रकार, मराठी व हिंदी चित्रपट निर्माते, शिक्षणतज्ज्ञ, राजकारणी व वक्ते होते. ते महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी उभ्या राहिलेल्या संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीतील प्रमुख नेते होते. आचार्य अत्र्यांच्या घणाघाती भाषणांमुळेच संयुक्त महाराष्ट्राची चळवळ विजयी झाली असे मानले जाते. त्यांचे ठाकरे यांच्याशी असलेले वादही फार चर्चेत होते.