Posts

Showing posts from October, 2020

संपादकीय

Image
गेल्या काही वर्षांत जग झपाट्याने बदलले. पत्र पाठवण्याचा काळ कधीच मागे पडला. केवळ घरी असताना फोनवर संभाषण हे देखील इतिहासजमा झाले. आता यत्र तत्र सर्वत्र सगळ्यांकडे फोन असतात आणि वाटेल तेव्हा वाटेल तिथून फोनवर बोलता येते.

पाठलाग

Image
निलेश मालवणकर बराच वेळ आम्हा दोघांपैकी कुणीही एकसुद्धा शब्द बोललं नाही. दोघंही शांत, चिडीचूप. पण मग मलाच राहवेना. विचारू की नको असा विचार मी करत होतो. कारण निर्णय मनाविरुद्ध गेला तर मी ते कसं पचवणार याची भीती वाटत होती.

अकस्मात

Image
रोहित कोल्हटकर “अग मनिषला फोन केलास का?” गेल्या चार दिवसांत दहा वेळा तरी विभावरीने मनालीला हा प्रश्न केला असेल. मनिषला फोन केलास का? त्याचा काही फोन आला का? त्याची तब्येत कशी आहे? ह्या प्रश्नांचा तिने भडिमार केला होता, आणि मनिष मात्र गेले आठवडाभर फोनला उत्तर देत नव्हता.  

रघु

Image
श्री. बाळकृष्ण पाडळकर बाळकृष्ण माधव पाडळकर यांचे शालेय व महाविद्यालयीन शिक्षण अनुक्रमे गंगापूर व औरंगाबाद येथे झाले. महाविद्यालयात शिकत असतांना स्वातंत्र्यसैनिक व जेष्ठ सामाजिक नेते कै. गोविंदभाई श्रॉफ यांच्या श्री. सरस्वती भुवन शिक्षण संस्थेत सेवा करण्याचा योग आला. त्यामुळे भाईजींचे सामाजिक कार्य फार जवळून पाहायला मिळाले. वाणिज्य शाखेची पदवी घेतल्यानंतर व मुंबईच्या डावर कॉलेज ऑफ कॉमर्स मधून बिझिनेस मॅनेजमेंटची पदविका प्राप्त केल्यानंतर महाराष्ट्र शासनात दीर्घकाळ सेवा बजावली. याचवेळी दै. लोकमत, दै. अजिंठा, दै. प्रजावाणी आणि नंतर दै. मराठवाडा, दै. सकाळ व दै. लोकसत्तेत भरपूर स्फुट लिखाण केले. शासकीय सेवेतून सेवानिवृत्ती घेतल्यानंतर पाडळकरांनी ‘किशोर संगणकविश्व’ या मासिकाच्या संपादकाची जबाबदारी स्वीकारली. मुलांना लवकरात लवकर संगणकाची ओळख करून देणाऱ्या या संस्थेकरता महाराष्ट्रभर किशोर संगणकविश्व मासिकाचा प्रचार व ‘सॉफ्ट किड्स संगणक केंद्र’ या संगणकाची ओळख करून देणाऱ्या केंद्राची स्थापना महाराष्ट्रात अनेक ठिकाणी केली. प्रसिद्ध संगणकतज्ज्ञ डॉ. विजय भटकर यांनी या संस्थेच्या कार्याचे कौतुक

मी पाहिलेला हिमालय

Image
श्रीमती चित्रा धाकड “हिमालयावरूनी वाहत असे ती धन्या,  म्हणे ही आल्यावरती पुरती हिमाद्री कन्या || बाजूला खडक असोनी उंच भारी,  वाहे त्यामधुनी ती देवी शुद्ध नारी ||” इ.स.१९७० च्या दशकात माझे आजोबा या पंक्ती गुणगुणत असत व मला ते खूप आवडायचे. आजोबा मुख्याध्यापक असल्याचा आम्हाला अभिमान होता. मी तेव्हा ८-९ वर्षांची असेन, माझा हात धरून शाळेत नेणे व ऊन लागू नये म्हणून डोक्यावर छत्री धरणे अशी खूप काळजी ते घ्यायचे. अशा आजोबांची नात आजोबांचा वारसा का म्हणून नाही पुढे नेणार? त्यांच्यामुळेच ही प्रेरणा मला मिळत आहे. लेखणी जरी माझ्या हातात असली तरी विचार त्यांचे आहेत. त्यांच्या विचारांशिवाय माझे लेखन निरस वाटेल, लेखनाला ओलावाच राहणार नाही. त्यांच्या विचाराने मला स्फूर्ती येते. माझ्या नकळत जे विचार डोक्यात येतात, ते या लेखणीद्वारे प्रकट होतात अशा आजोबांना मी नमस्कार करते व असेच प्रेमळ आजी-आजोबा सगळ्यांना लाभो हीच प्रार्थना देवाला करते.  ममी भाग्यवान आहे कारण सानेगुरूजींची कर्मभूमी असलेल्या अंमळनेर तालुक्यात मी जन्मले व लहानाची मोठी झाले, शिक्षण घेतले. तिथल्या प्रत्येक गोष्टींना विचारांचा, प्र

वैकुंठ

Image
(अनुवादित कथा) मूळ लेखक: रवि कोप्परपु अनुवाद: वरदा वैद्य डॉ. रवि कोप्परपु यांनी लिहिलेल्या “वैकुंठम” ह्या मूळ तेलुगू कथेच्या त्यांनीच केलेल्या इंग्रजी अनुवादावरून हा मराठी अनुवाद केला आहे. मूळ तेलुगू कथा प्रतिलिपी संकेतस्थळावर प्रकाशित झाली आहे. ही कथा ‘मैत्र’च्या ऑक्टोबर २०१९ अंकात प्रकाशित झालेल्या ‘पाताळ’ ह्या कथेचा पुढचा भाग आहे. पाताळ कथा कृपया इथे वाचावी -  ‘मैत्र’ ऑक्टोबर २०१९ चंद्रयान-१ हा भारताने चंद्रावर पाठवलेला पहिला उपग्रह. २००८ च्या ऑक्टोबरात इस्रोने हा उपग्रह चंद्राच्या पृष्ठभागाची चाचणी करण्याकरता पाठवला. मात्र २००९ च्या ऑगस्ट महिन्यात तो बंद पडून काम करेनासा झाला. घातक प्रारणांपासून उपग्रहाचे रक्षण व्हावे म्हणून त्यावर संरक्षक कवच चढवलेले होते. हे कवच निकामी झाल्यामुळे हा उपग्रह वेळेआधीच नादुरुस्त झाला. अंतराळात कोणकोणत्या प्रारणांशी उपग्रहाची टक्कर होऊ शकते हे लक्षात घेऊन खरे तर हे कवच तयार केले होते. तरीही हे संरक्षक कवच निकामी का झाले असावे हा प्रश्न काही काळ अनुत्तरित राहिला. ह्या उपग्रहांसाठीच्या इस्रोने गोळा केलेल्या दूरमिती (टेलिमेट्री) नोंदींचा अभ्

एका बागेची गोष्ट

Image
आरती - राणे वाळवेकर शब्दांकन: अभिजित वाळवेकर   असे पाहुणे येती ... तुम्ही म्हणाल की बागेच्या गोष्टीमध्ये पाहुणे कुठून आले? आणि ते पण कोरोनाच्या काळात? आता तर पाहुणे अजिबातच अपेक्षित नाहीत. घराची बेल वाजली तर घाबरायला होतं. कोण आलं असेल? आणि का बरं आलं असेल? जे कोणी आलं असेल त्यांनी मास्क घातला असेल का?आणि अगदी अशा संभ्रमात आमच्याकडे एक पाहुणा आला. तर त्याचं असं झालं की शुक्रवार संध्याकाळ होती. सकाळपासून मी आणि माझा नवरा अभिजित दोघेही ऑफिसच्या कामात व्यग्र होतो. मुलं नेहमीप्रमाणे युट्युबमध्ये व्यग्र होती. मी अभिजितला अंगणातलं गवत कापायची आठवण करून दिली. नेहमीप्रमाणे कामं उद्यावर टाकणाऱ्या नवऱ्याने होकार देताच मला पण बरं वाटलं. अभिजित बाहेर गेला आणि थोड्या वेळात मला त्याची हाक ऐकू आली. तो मला आणि मुलांना बोलवत होता, जरा घाईतच बोलावत होता. आम्ही सगळेजण बाहेर आलो आणि बघतो तर काय, आमच्या अंगणात साधारण थाळीच्या आकाराचं, पिवळं आणि तपकिरी रंगाचं एक इवलुसं कासव आलं होतं . छानशी नक्षी होती त्याच्या टणक पाठीवर. चौकोनी नक्षी आणि प्रत्येक चौकोनात अजून छानशी नक्षी. जणू काही कोणीतरी कोरीव काम केलं

स्वप्ना औटे यांनी काढलेली छायाचित्रे

Image
शरद ऋतूतील मेरीलँड स्वप्ना औटे छायाचित्रकार

अमेरिकन व्हिसाचे अनुभव

Image
डॉ. गजानन सबनीस सबनीस काका 'लेख्य-प्रमाणक' (नोटरी) आहेत. तुम्हाला तुमची कागदपत्रे नोटराईज करायची असतील तर तुम्ही त्यांच्याशी संपर्क साधू शकता. सध्याच्या काळात अमेरिकेत राहाण्यासाठी लागणारे ग्रीन कार्ड मिळवण्यासाठी खटपटी लटपटी पुष्कळच चालू आहेत. मग काही जण नाते दाखवून/शोधून व्हिसा मिळवण्याच्या मागे असतात, तर काही अमेरिकन नागरिकाशी लग्न करून. हे काही नवीन नाही, गेल्या पन्नास-साठ वर्षांपासून अशा प्रकारचे प्रयत्न सुरू आहेत. पण त्यावेळेस भारतीय समाज आणि त्यातून मराठी समाज खूपच लहान होता त्यामुळे व्हिसा प्रकरण पटकन संपूनपण जायचे. अमेरिकन व्हिसाबद्दलचा इतिहास पुष्कळांना माहीत व्हावा म्हणून आणि व्हिसा प्रक्रियेतून गेलेल्या आमच्यासारख्या इतर लोकांच्या आठवणींना उजाळा द्यावा म्हणून हा लेख लिहिण्याचा उहापोह केला आहे. अमेरिकन व्हिसाबद्दल लिहायचे तर पुष्कळच लिहिता येण्यासारखे आहे. प्रत्येकाचा अनुभव त्या त्या परीने वेगळा आहे. असे अनुभव आणि विचार लिहून काढले तर एक छानशी मालिका तयार होईल आणि हे अनुभव वाचून वाचकांना पण त्याबद्दल पुष्कळ माहिती मिळेल असा एक विचार डोक्यात आला. हा विचा

पुस्तक परीक्षण: विद्या मोमीन

Image
पुस्तक परीक्षण: विद्या मोमीन “कवडसे स्रीजीवनाचे “ लेखिका: नीलिमा कुलकर्णी प्रकाशक: ग्रंथाली प्रकाशन २०१७ पृष्ठे: ३०६ बाममं आणि मराठी कला मंडळाच्या संयुक्त विद्यमाने सुरू केलेल्या साहित्याची देवाणघेवाण उपक्रमांतर्गत ‘हितगुज’च्या २०२० दिवाळी अंकात प्रकाशित होणारे पुस्तक परीक्षण. ‘कवडसे स्त्रीजीवनाचे’ही नीलिमा कुलकर्णी ह्यांची कादंबरी. जोपर्यंत स्त्रीचे अस्तित्व आहे तोपर्यंत तिची कथा, व्यथा आणि गाथा चालूच राहणार. कारण स्त्रीची मनोधारणाच अशी आहे की ती आजतागायत कुणालाही पूर्णपणे समजलेली नाही. अगदी स्त्रियांना सुद्धा!! तशीच काळानुसार, जगाबरोबर ती स्वतःला कशी साचेबद्ध करते हेही एक गूढ कुणी पूर्ण उलगडू शकलेले नाही. १०० वर्षांच्या कालावधीतील अशा विविध स्त्रियांची ही मनोगाथा नीलिमा कुलकर्णींनी आपल्या कादंबरीत चित्रित केली आहे. स्वतःच्या कुटुंबामधील आणि थोडी काल्पनिक पात्रे घालून लिहिलेली ही आत्मकहाणी अगदी प्रामाणिक आहे. लेखिकेच्या हृदयाला स्पर्श करून गेलेल्या व्यक्तींचे हे जवळून पाहिलेले अनुभव व थोडे आत्मचरित्राचे मिश्रण असलेली ही कादंबरी वाचतांना त्यांची मानसिक घालमेल, जिव्हाळा आणि मनाला

बाल विभाग-मराठी लिहा-वाचायला शिकणाऱ्या मुलांसाठी प्रश्नसंच

Image
अपर्णा वाईकर खाली दिलेली चित्रे ओळखून दिलेल्या यादीतून त्यांची नावे त्या चित्राखाली लिहा. आकाशकंदील, पणती, रांगोळी, दिवाळी-किल्ला, चकली, लाडू, चिवडा, फुलबाज्या, कडबोळी , शेव, करंजी, शंकरपाळी  

कलाकार ओळख - सौ. योगिनी (स्नेहा) दहिवदकर

Image
सौ. योगिनी (स्नेहा) दहिवदकर बाल्टिमोर परिसरांत राहणाऱ्या मराठी समाजामध्ये चित्रकारी, लेखन, अभिनय, हस्तकला, गायन, वादन आणि इतर अनेक कलाक्षेत्रांमध्ये वावर असणारे अनेक गुणी कलाकार आहेत. ह्या अंकामध्ये चित्रकारी करणाऱ्या योगिनी दहिवदकरची एक कलाकार म्हणून ओळख करून घेऊ. दर अंकातून एक वा दोन कलाकारांची ओळख करून देणारचा मानस आहे. तुमच्यातील कलागुण लोकांसमोर आणण्याची ही संधी तुम्ही घेऊ इच्छित असाल तर आम्हाला Editor@BaltimoreMarathiMandal.org ह्या पत्त्यावर संपर्क करा. ‘फर्स्ट कम फर्स्ट सर्व्ह’ तत्वावर कलाकारांची माहिती पुढील अंकांमध्ये प्रसिद्ध होईल. Blessings! – May heavenly light bless upon you & may your life be full of colors and fragrance. ‘मैत्र’च्या मित्र आणि मैत्रिणींनो, नमस्कार! तुम्हा सर्वांना ह्या अंकाच्या मुखपृष्ठावरील जलरंगातील चित्र ‘Blessings!’ आवडले असेल अशी आशा करते.