Posts

Showing posts from July, 2021

संपादकीय

Image
जुलै २०२१ अंक ३ मैत्र संपादक मंडळ २०२१   वरदा वैद्य  विदुला कोल्हटकर  रोहित कोल्हटकर  कपिल धाकड  मधुर पुरोहित    बाममं कार्यकारिणी २०२१  अध्यक्ष   रोहित कोल्हटकर  उपाध्यक्ष  ऋद्धी आठवले वाडदेकर    उपाध्यक्ष- विपणन  समीर अहिरराव पाटील  चिटणीस  मधुर पुरोहित  खजिनदार  केतन बर्डे  सह-खजिनदार  रवी महाजन नमस्कार मंडळी,

स्क्रीन आणि फॅशन

Image
विदुला कोल्हटकर "क्काय!" ढॅण ढॅण ढॅण कॅमेरा पुन्हा पुन्हा तिच्या चेहऱ्यावर जात होता. जसं काही पहिल्यांदा ती “क्काय” म्हणाली तेव्हा तुम्ही फोनकडे बघत असाल, तर 'इकडे लक्ष द्या' म्हणून मोठा आवाज आणि हा बघा रिटेक.

किमची

Image
मल्हार मंदसौरवाले यावर्षी माझ्या उन्हाळी प्रकल्पासाठी कोरियन किमची बनवायचं ठरवलं. त्याआधी या पदार्थाबद्दल मी सिनेमात आणि यूट्यूब व्हिडीओवर पाहिल होतं. किमची आणि ती पण व्हेजिटेरियन किमची करून बघूया अशी इच्छा खूप दिवसांपासून होती.

संगीतप्रेमी- केदार सुळे

Image
पूनम दिघे सुळे शेक्सपिअरने म्हटलंच आहे, "There is nothing in the world so much like prayer as music is." खरंच, संगीतासारखे प्रार्थनेचे दुसरे स्वरूप नाही! अशाच एका संगीत कलोपासकाची ओळख आज आपण करून घेणार आहोत.

फळंबिळं आणि संपवासंपवी

Image
वरदा वैद्य आमच्या वाड्यात मी लहानाची मोठी झाले. मात्र ‘वाडा’ म्हटल्यावर जे स्वरूप डोळ्यासमोर येतं, त्यापेक्षा आमचा हा शहरी वाडा वेगळा होता. आमचा वाडा तिमजली. वाड्याच्या दर्शनी बाजूंना दुकानं होती.

पँडेमिक

Image
अथर्व बेंगेरी ग्रेड: ४, शाळा: North Chevy Chase ES Everyone is at home So no one is visiting Rome

केसर

Image
चक्रपाणि चिटणीस लेखकाविषयी - चक्रपाणि चिटणीस, कुपर्टिनो, कॅलिफोर्नियास्थित सॉफ्टवेअर अभियंता, हौशी लेखक, कवी, खवय्या, आठ वर्षांचा बाबा आणि आणखी काही काही. सन २००५ पासून मनोगत, मायबोली, मिसळपाव इ. मराठी संकेतस्थळांवर नियमित वावर आणि लेखन. मनोगत आणि मिसळपावच्या दिवाळी अंकांसाठी लेखन. बरेचसे ब्लॉग आणि ‘मैं और मेरी तनहाई’ या फेसबुक पेजच्या माध्यमातून वैयक्तिक लेखन. लेखनाव्यतिरिक्त अभिनय, नाट्यसंहिता लेखन आणि नाट्यदिग्दर्शनाची आवड आणि त्याच्याशी संबंधित सॅन फ्रान्सिस्को बे एरियात चालणाऱ्या उलाढालींमध्ये सक्रीय सहभाग. सध्या या सगळ्यांच्या जोडीला संगणकशास्त्रातील डॉक्टरेटसाठी सॅन्टा क्लॅरा विद्यापीठात धडपड चालू. ह्या कथेमागील उपक्रमाबद्दल थोडेसे ‘Monologue’ हा सॅन फ्रान्सिस्को- बे एरियातील हौशी लेखकूंनी हाती घेतलेला प्रकल्प आहे. सुधीर धर्माधिकारी यांच्या कल्पनेतून तो आकारास आला आणि त्यांच्याच पुढाकाराने २०२० साली याची सुरुवात झाली.

गृहलक्ष्मी

Image
श्रीमती चित्रा धाकड Elkridge MD "स्वधर्मासी जागली, पतीपुढे ती स्वर्गा गेली। सतधर्माची पूर्ती केली, नारी धर्म हा !!" जीवन हे एक कोडे आहे. जग एक रंगभूमी आहे. त्यात आपण वेगवेगळी पात्रे आहोत.

लक्षणीय महेश्वर

Image
नीलिमा कुलकर्णी रेस्टन, व्हर्जिनिया मराठी कला मंडळ व बाममं दरम्यान होणाऱ्या साहित्याची देवाणघेवाण उपक्रमाअंतर्गत हा लेख हितगुजच्या मे२०२१मध्ये प्रकाशित झालेल्या भटकंती अंकातून घेतला आहे काही ठिकाणं अशी असतात की तेथील वास्तूच्या भिंती, आणि भोवतालचा परिसर इतिहासाची पानं उलगडू लागतात. शाळेत असतांना इतिहासाच्या वर्गात वाचलेलं जग अचानक जिवंत होऊन आपल्या पुढ्यात येतं. इंदौरच्या (मध्य प्रदेश) जवळचे महेश्वर हे यातलंच एक गाव !

गाईड

Image
बाळकृष्ण पाडळकर ट्रॉय -मिशिगन परतवाडा सातपुड्याच्या कुशीत विसावलेले एक गाव. ना शहर ना खेडे. आजूबाजूच्या निसर्गसौंदर्याने नटलेले, शांत, निरामय आयुष्य जगणाऱ्यांचे गाव. गावाच्या पूर्वेकडून पश्चिमेकडे वाहणाऱ्या सपन आणि बिच्चन या लहान नद्या परतवाड्याच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी एकमेकींमध्ये स्पर्धा करताना दिसतात. त्यांची चंद्रभागेच्या जाऊन मिळण्याची अधीरता सहज लक्षात येते.

अमेरिकेतील अरण्य-मृत्यू

Image
मिलिंद पदकी न्यू जर्सीस्थित औषध-वैज्ञानिक. आता मेडिकल लेखक. २०१७ मध्ये मराठी काव्यसंग्रह "बदकनामा " प्रसिद्ध (ग्रंथाली, मुंबई). मराठी आणि इंग्रजीतून वैज्ञानिक आणि ललित लेखन. सध्या प्रामुख्याने ‘कोव्हिड’विषयक लेखनावर भर. तऱ्हेतऱ्हेचे मृत्यू शोधायचे झाले तर बर्फाळ वारा शांतपणे झोपलेल्या खडकांवर पसरताना दिसतो, काही झाडांना वाकवीत चिरनिद्रेत मग्न कवट्यांमधले स्वप्न जागवीत.