Posts

Showing posts from April, 2021

संपादकीय

Image
एप्रिल २०२१ अंक २ मैत्र संपादक मंडळ २०२१   वरदा वैद्य  विदुला कोल्हटकर  रोहित कोल्हटकर  कपिल धाकड  मधुर पुरोहित    बाममं कार्यकारिणी २०२१  अध्यक्ष   रोहित कोल्हटकर  उपाध्यक्ष  ऋद्धी आठवले वाडदेकर    उपाध्यक्ष- विपणन  समीर अहिरराव पाटील  चिटणीस  मधुर पुरोहित  खजिनदार  केतन बर्डे  सह-खजिनदार  रवी महाजन नमस्कार मंडळी,

छान

Image
सौ. श्रीया दीक्षित-नाचरे, पुणे भारतीय विद्या पारंगत, मोडी लिपी वाचक-शिक्षक व अभ्यासक shreeyanachare@gmail.com सदर लेख ऑक्टोबर २०२० मध्ये महाराष्ट्र टाईम्समध्ये प्रकाशित झाला होता. छान म्हणजे काय? हा काय प्रश्न झाला? प्रश्नाचं उत्तर सोपं आहे! छान म्हणजे छान, मस्त, उत्तम इ. हो ना? छान हा शब्द आपण एखादी गोष्ट कशी चांगली आहे हे सांगण्यासाठी वापरतो. पण मग त्यात सांगण्यासारखं किंवा लिहिण्यासारखं काय आहे?

कपडे पाहावे शिवून

Image
मुग्धा मुळे दिवसा सॉफ़्टवेअर डेव्हलपर आणि रात्री फ़ॅशन डिझायनर. मायन दिनदर्शिकेप्रमाणे २०१२ ह्या वर्षी जग संपेल असे भाकीत होते. पण २०२० ह्या वर्षाने खरोखरीच तसे होईल की काय ह्याची जाणीव करून दिली. लोक एकांत मिळायला हिमालयात जातात किंवा इकडे अमेरिकेत जंगलात राहतात, पण २०२० ने एकांत घरातच आणून ठेवला. कोरोना नामक सूक्ष्मजीवाने जगभर भल्याभल्या बलवान लोकांनाच काय, पण बलाढ्य राष्ट्रांनादेखील जेरीस आणले. उगाच नाही म्हणत Powerful things come in small packages.

मुंबई विमानतळ

Image
गजानन सबनीस बाल्टिमोर परिसरात राहणारे बहुतेक मराठी रहिवासी मुंबईच्या नवीन विमानतळावर उतरून घरी गेले असतील. मुंबईच्या विमानतळाचा इतिहास त्यापैकी किती जणांना माहीत असेल असा विचार करून माझ्या अनुभवांतून त्याबद्दल काही लिहावे ह्या हेतूने हा लेख लिहिला आहे.

आचार्य प्रल्हाद केशव अत्रे

Image
प्रविणा आनिखिंडी मराठी कला मंडळ व बाममं दरम्यान होणाऱ्या साहित्याची देवाणघेवाण उपक्रमाअंतर्गत हा लेख हितगुज अंकाच्या होळी २०२० अंकातून घेतला आहे. प्रल्हाद केशव अत्रे ऊर्फ आचार्य अत्रे हे मराठीतील नावाजलेले लेखक, कवी, नाटककार, संपादक, पत्रकार, मराठी व हिंदी चित्रपट निर्माते, शिक्षणतज्ज्ञ, राजकारणी व वक्ते होते. ते महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी उभ्या राहिलेल्या संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीतील प्रमुख नेते होते. आचार्य अत्र्यांच्या घणाघाती भाषणांमुळेच संयुक्त महाराष्ट्राची चळवळ विजयी झाली असे मानले जाते. त्यांचे ठाकरे यांच्याशी असलेले वादही फार चर्चेत होते.

मदत

Image
पद्मा लोटके दररोज संध्याकाळी चालायला जायची सवय मला स्वस्थ बसू देईना. त्या दिवशी थोडा उशीरच झाला होता. नऊ वाजून गेले होते. विचार केला की थोडेसेच का होईना पण चालून येऊ म्हणून बाहेर पडले. 

तिघं

Image
मूळ तेलुगू कथा - रवी कोप्परपु अनुवाद - वरदा वैद्य प्रतिलिपी संकेतस्थळावरील ‘1K स्टोरी चॅलेंज’ स्पर्धेमध्ये मूळ कथा बक्षिसपात्र ठरली. मूळ कथा सर्वप्रथम मेरीलँड तेलुगू संघाच्या पत्रिकेमध्ये प्रकाशित झाली होती. परवा माझी बायको म्हणाली, “पुढच्या शनिवारी आपल्याला मिश्राकडे जायचं आहे. पॉटलक आहे. आपल्याला काहीतरी न्यावं लागणार आहे. कोणता पदार्थ नेऊ या?” मला स्वयंपाकातलं फार काही कळतं म्हणून तिने मला हा प्रश्न विचारला नव्हता तर ह्याप्रश्नामागचं कारण वेगळंच होतं. मी मूळचा दक्षिण भारतीय आणि आम्ही एका उत्तर भारतीयांच्या घरी जाणार होतो. खाण्यापिण्याच्या बाबतीत मी जरा चोखंदळ, बायकोच्या भाषेत खाण्यापिण्याचे नखरे असणारा, असल्यामुळे तिथे इतरांनी आणलेले पदार्थ मला आवडले असतेच वा मी ते खाऊ शकलो असतोच असं नाही. मग अशा वेळी माझ्या बायकोने केलेला माझ्या आवडीचा पदार्थ बरोबर असला की मला पार्टीत उपाशी राहण्याची वेळ येत नाही. तर हे ते कारण.

गतधवा

Image
डॉ. वैजयंती गोविंद असोलकर नागपूर नागपूरला एका महाविद्यालयात भौतिकशास्त्राच्या प्राध्यापिका आणि विभागप्रमुख आहेत. त्यांनी मराठी, हिंदी, व इंग्रजी भाषांमध्ये विज्ञानविषयक व इतरही विपुल लेखन केले आहे. 'द हितवाद' ह्या वर्तमानपत्रातील ‘ट्विंकल स्टार’ ह्या पुरवणीत 'फिजिक्स कॉर्नर' हे त्यांचे सदर जवळपास अडीच वर्षे फार लोकप्रिय होते. प्रवास, फोटोग्राफी (प्रकाशचित्रण), वाचन, संगीत, आणि सिनेमा हे त्यांच्या आवडीचे इतर विषय आहेत ती दुरून दिसली, तेव्हा अचानक लक्षात आलं की तिच्याकडे समाचाराला जायचं राहूनच गेलं. फार ओळख नव्हती पण वाटेत भेट झाली तर दोन मिनिटं थांबून थोडं बोलणं व्हावं इतपत माहिती होती. तिच्या हातात नेहमीसारख्या दोन मोठ्या कापडी पिशव्या होत्या आणि ती झपाझप चालत माझ्या दिशेनंच येऊ लागली. मी थांबलेच मग

हंटिंग लॉज

Image
बाळकृष्ण पाडळकर ७३ टाकोमा भुलेवाड ट्रॉय मिशिगन बाहेर सूर्य आग ओकत होता . वाऱ्याची झुळूक तेवढी अधून मधून उन्हाची तीव्रता कमी करीत होती . पण क्षणभरच . दुसऱ्याच क्षणी गर्मीत पुन्हा वाढ होत होती . सूर्य माथ्यावर आल्यापासून पार पश्चिमेकडच्या टेकड्यांच्या मागे गेल्याशिवाय हे थांबणार नव्हते .

पुरणपोळी

Image
शारदा ग. सबनीस होळी आली की पुरणपोळीची आठवण येते. लहान असताना आईला पुरणपोळी करताना पहात असे. तिच्या त्या पुरीसारख्या फुगणाऱ्या पोळ्या पाहून मजा वाटे आणि मला अशी करता येईल का असा प्रश्न मनात येत असे. शाळेत जायला लागल्यानंतर पुरणाने भरून पिठाचा गोळा करण्याचे काम माझे असे. पुरण मऊसूत झाले की पोळ्या छान होतात हे वाक्य कायम ऐकत आले आहे.

अमित गोडसेंनी काढलेली छायाचित्रे

Image
वॉशिंग्टन डीसीतील चेरी ब्लॉसम उत्सव (२०१८) अमित गोडसे छायाचित्रकार