Posts

Showing posts from August, 2020

संपादकीय

Image
नमस्कार मंडळी, म्हणता म्हणता हे वर्ष निम्म्याहून अधिक सरलेही! जुलै महिन्याची सुरुवात झाल्यावर आम्हाला मैत्रचा पुढील अंक प्रकाशित करण्याचे वेध लागले. २०२० ह्या वर्षातील 'मैत्र'चा हा तिसरा अंक आपल्या हाती देताना आम्हाला आनंद होत आहे.

हरवले ते गवसले तेव्हा

Image
‘हरवले ते गवसले का? गवसले ते हरवले का?’ हे पी. सावळाराम यांनी लिहिलेलं आणि गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांनी गायलेलं गाणं स्वतःशीच गुणगुणत मी गाडी चालवत घरी येत होतो. एखादी गोष्ट अनपेक्षितरित्या मिळाली तर त्याचा आनंद जास्त होतो.

स्लॅंग

Image
मराठी लेखाला इंग्रजी शीर्षक दिलं की लेखाला उगाच भारदस्तपणा आल्यासारखं वाटतं. प्रत्यक्षात लेख कसा का असेना! मागे ’लिमिटेड माणूसकी’ नावाचा मराठी सिनेमा आला होता. तेव्हापासूनच इंग्रजी शीर्षकाची कल्पना माझ्या डोक्यात घोळ घालत होती. ‘स्लॅंग’ म्हणजेच बोली भाषेतील शब्द/वाक्प्रचार, जे लिहिण्यात शक्यतो येत नाहीत पण रोजच्या भाषेत सर्रास वापरले जातात. पण हाच अर्थ कळायला मला अमेरिकेत यावं लागलं. त्याचं असं झालं की माझा जन्म पुण्यातला! शाळेत घालायची वेळ आली तेव्हा ‘मुक्तांगण’ ह्या इंग्रजी माध्यमाच्या शाळेत घालायचं की ‘न्यू इंग्लीश स्कूल’ ह्या मराठी माध्यमाच्या शाळेत घालायचं हा गहन प्रश्न माझ्या आई-बाबांना पडला होता. माझ्या आयुष्यातला विरोधाभास हा तेव्हा पासूनचाच. शेवटी मोठा भाऊ मराठी शाळेत जातो मग ह्याला कशाला इंग्लिशमध्ये घालायचं म्हणून किंवा आई-बाबा माझ्यासारखेच इंग्रजी नावाचे चाहते असतील म्हणून म्हणा शेवटी मराठी शाळेत गेलो. तेव्हा मला असं वाटायचं की सगळं जग मराठीतंच बोलतं.  आता मराठी शाळेत कोण अमराठी माणूस आपल्या मुलांना पाठवणार? क्वचित एखादा बलदावा, बोलद्रा असे मारवाडी असायचे किंवा एखाददुसरा शह

छायाचित्र

Image

व्हर्च्युअल शाळेचे इ-विद्यार्थी

Image
व्हर्च्युअल शाळेचे इ-विद्यार्थी कोरोनावर रुसा हसा मुलांनो हसा || तुम्हा बोलवी गूगल मीटिंग मित्रांशी करा तुम्ही चॅटिंग झूम नि वेबेक्स – कॅमेऱ्यासमोर, खुशाल जाऊन बसा ||१ || धैर्य राखणे धर्म आपुला विलग राहुनी मजा करूया स्वयंशक्तीचा कौशल्यांचा, मनी उमटू दे ठसा ||२|| पँडॅमिकचा विसरा गुंता लॉकडाऊनच्या नकोत चिंता नव्या युगाची नवी धाडसे, तुम्ही घेतला वसा ||३|| उमाकांत काणेकरांच्या “प्रकाशतले तारे तुम्ही” कवितेवर आधारित बालकविता रुचिरा महाजन:

हरवलेले सोवळे

Image
१४ मार्चपासून सुरु झालेली देशभरातील टाळेबंदी २० मार्चनंतर अधिक कडक झाली होती. प्रत्येकजण घरकैदी झाला होता. आयुष्यात नंदकिशोरने असले जगणे कधी अनुभवले नव्हते वा कुणी जगल्याचे ऐकलेदेखील नव्हते. घरकोंडी सुरु व्हायच्याआधीचा भरलेला किराणा आता २७ एप्रिलपर्यंत पुरला होता. दूध वगैरे नाशिवंत जिन्नस तर कधीच संपले होते पण आता डाळी-साळीदेखील संपायला आल्या होत्या. पुण्यातल्या मध्यमवर्गीय, ३ वा ४ खोल्यांच्या फ्लॅट संस्कृतीत रहाणारा नंदकिशोर किती सामान गोळा करुन ठेवू शकणार होता? तेही उंदीर आणि घुशींपासून वाचवायचे कसे? डब्यांमधील धान्य सुरक्षित पण पोती कशी सांभाळणार? पौड रस्त्यावरील स्वामी रेसिडेन्सीमधील सातव्या मजल्यावर पूर्वेकडील ४ खोल्यांच्या फ्लॅटमध्ये नंदकिशोर, त्याची पत्नी मालती, अकरा वर्षांचा मुलगा वेदान्त आणि आठ वर्षांची रेणुका राहात होते. अत्यावश्यक सेवेशी निगडित दुकाने आजकाल फक्त दुपारी बारा ते सायंकाळी आठपर्यंत उघडी असत. त्यातही मोजक्याच लोकांना एकावेळी आत सोडत होते; बाकीच्यांनी बाहेर रांग लावा! खूप गर्दीत अडकू नये म्हणून नंदकिशोर साडेअकरालाच बाहेर पडला होता. सोमवार असूनदेखील रस्त्यावर काहीच

अद्भुत विषाणू आणि ऑनलाइन शाळा

Image
तुम्हाला कधी असं वाटलं का की अचानक ऑनलाइन शाळा सुरू होणार? मला तर असं कधीच वाटलं नाही आणि विचारही केला नाही!! नवीन विषाणू जगामध्ये कुठून आणि कसा आला? ही खरंच आश्चर्याची गोष्ट आहे. या प्रश्नाच्या एकाच भागाचं उत्तर माहीती आहे. हा विषाणू चीनमधून सुरू झाला. कसा सुरू झाला, ते अजुनही माहीत नाही. काही लोक म्हणतात की एका प्राण्यामुळे हा विषाणू सुरू झाला. कोरोनाचा आजार पसरू लागला. सगळ्यांच्या सुरक्षिततेसाठी सगळ्या शाळा बंद झाल्या, आणि लोक घरून काम करायला लागले. काही दुकानं बंद झाली आणि काही दुकानांची वेळ कमी झाली. शाळा बंद झाल्यानंतर, मी कधीतरी पत्त्यांचे खेळ खेळले, पुस्तकं वाचली, बोर्ड गेम्स खेळले आणि वेगवेगळे पझल्स सोडवले. वेळ मिळेल तेव्हा मी माझ्या नातेवाईक आणि मित्रमैत्रिणींबरोबर ऑनलाइन गप्पा मारल्या. टिव्हीवर महाभारत बघायला सुरू केलं आणि खूप मालिका बघितल्या. मी परत शाळा उघडण्याची वाट पाहत होते. मला शाळेत परत जायचं होत, पण पूर्ण वर्षासाठी शाळा बंद केल्यानंतर मला वाईट वाटल पण सगळयांच्या सुरक्षिततेसाठी शाळा बंद केल्या ते बरं झालं. ऑनलाइन शाळेचे तोटे आणि फायदे जाणवले. घरी खूप वेळ बसून कधीतरी क

मराठी लिहा-वाचायला शिकणाऱ्या मुलांसाठी प्रश्नसंच

Image
खाली दिलेल्या शब्दांमध्ये पदार्थांच्या चवी व उन्हाळ्याच्या सुट्टीसंदर्भातील गोष्टींच्या मराठी व इंग्रजी नावांच्या जोड्या लावा गोड sour     उन्हाळ्याची सुट्टी           Shaved ice आंबट   sweet वादळ Ocean खारट spicy कडू Summer v acation बर्फाचा गोळा salty तिखट Storm समुद्र bitter   अपर्णा वाईकर:

आमचा कपडेदान उपक्रमाचा अनुभव

Image
मी जो भारतासाठी कपडेदानाचा उपक्रम केला होता त्याबद्दल आपल्यापैकी बहुतेक जणांनी ऐकलेच असेल. या दरम्यान मला आलेले अनुभव मी आपल्याला कथन करू इच्छिते. बऱ्याच जणांनी मला हा प्रकल्प राबवण्यामागच्या माझ्या प्रेरणेबद्दल विचारणा केली होती. मला आठवते तेव्हापासून माझे आई-वडील आम्हाला नेहमी सांगायचे कि दुसऱ्यांसाठी जितके काही करता येईल तितके करावे, त्यातच खरा आनंद सामावलेला असतो. मलाही हाच अनुभव नेहमी आलेला आहे. आपण दुसऱ्याला मदत करतोय ही भावनाच आपल्यासाठी खूप मोठे बक्षीस असते. मी आणि माझे पती आशिष-आम्हाला अमेरिकेत आल्यानंतर येथील गरिबी समजून घेणे बरेच कठीण गेले. येथील गरिबी बऱ्याचवेळा लपलेली असते. भारताप्रमाणे ती उघड्यावर दिसत नाही. हळूहळू आम्हांला गरिबांना मदत करण्याचे अनेक मार्ग समजू लागले. येथील गरीब कुटुंबांसाठी, शाळांसाठी, व मुलांसाठी नि:स्वार्थीपणाने काम करणाऱ्या अनेक स्फुर्तीदायी व्यक्तींशी आमचा परिचय होऊ लागला. आम्ही येथे चाईल्ड केअर सेंटरसाठी व गरीब वस्तीतील शाळांसाठी जुनी पुस्तके दान करण्यास व होमलेस शेल्टर्स साठी अन्नदान करण्यास सुरवात केली. आम्ही आपल्या बरोबर गाडीत सँडविचेस व फळे घेऊ

व्यवसाय अभियांत्रिकी परंतु मनानं शेतकरी

Image
माझा जन्म नाशिकला झाला. माझं बालपण, शालेय, विद्यालयीन व महाविद्यालयीन शिक्षण मुंबईत २२५ स्के.फुट घरात झालं. लोकलमधून जाता-येता रेल्वे रूळालगत गटाराच्या पाण्यावर पोसलेला भाजीपाला पाहून खूप वाईट वाटायचं. हीच भाजी मुंबईत पुरवली जाते ह्याचं वैषम्य वाटायचं. काहीतरी करावं. रसायनविरहित भाज्या कशा प्रकारे मिळवता येईल याचा विचार तरळून जायचा. स्वप्न पूर्णत्वास नेणाऱ्या, घड्याळावर चालणाऱ्या मुंबईत मात्र माझी महत्त्वाकांक्षा पूर्ण झाली नाही. किंबहुना सिमेंटच्या पदपथावर माझं निसर्गप्रेम अंकुरलंच नाही. अमेरिकेत आल्यावर घरात मी छोटी रोपं तयार करून कुंड्यांमध्ये लावू लागलो. पण सूर्यप्रकाश अपुरा असल्याने ती वाढत नव्हती. मी कोलंबिया कम्युनिटी गार्डन वेबसाईटवर संपर्क साधून भाडेतत्त्वावर जागा मिळवली. तिथे भरपूर प्रयोग करून माझी हौस भागवून घेतली. आम्ही घर घ्यायचं ठरवलं. ते खरेदी करतानाही घराच्या आतील सुविधांपेक्षा बाहेरील रिकामी जागा मला खुणावू लागली. हळुहळू मी तिथे छोटे छोटे वाफे केले. विविध रोपे तयार करून भाज्यांची लागवड केली. ठिबकसिंचन पद्धतीने पाणी पुरवू लागलो. यासाठी लागणारं कंपोस्ट-गांडूळ खत घरातील

माझी बाग

Image
नमस्कार, मी अंजली नरेन्द्र पाटील. मला बागकामाची फार आवड आहे. माझी खूप इच्छा होती की अमेरिकेत माझी स्वतःची बाग असावी. ह्या वर्षी माझे ते स्वप्न पूर्ण झाले. आम्ही ह्याच वर्षी मेरीलँड राज्यात कोलंबिया शहरात घर घेतले आणि घराच्या मागे आणि पुढे मोकळी जागा असल्याने मस्त बाग करता आली. हा माझा पहिलाच अनुभव पण सांगायला अगदी आनंद होतोय की मला छान यश आले. भरपूर प्रकारच्या हिरव्या भाज्या पिकवता आल्या. भरभरून स्वाद घेता आला. ताज्या आणि रसायनमुक्त भाजीपाल्याचा मनसोक्त आनंद घेता आला. मार्च महिन्यात मी सुरवात केली ती मेथी, शेपू, कोथिंबीर आणि पुदीन्याने. आश्चर्य म्हणजे पेरलेले सगळेच भरभरून उगवले. मग मी हिरवी मिरची, ढोबळी मिरची, टोमॅटो, भेंडी, पालक, काकडी, लसूण, कांदा, गाजर आणि वाटाणे ह्यांची बियाणे वापरून आम्ही घरीच रोपे तयार केली. घरच्या स्वयंपाकघरातल्या उरलेल्या अन्नाचा खत म्हणून उपयोग केला. खारूताई, ससे, हरणी व काही पक्ष्यांपासून थोडी काळजी घ्यावी लागली पण जास्त काही नुकसान न होता बाग मस्त बहरून आली. रोपे लहान असताना थोडी जास्त काळजी घ्यावी लागते. ऊन, वारा, जोराचा पाऊस ह्यापासून थोडी जास्त काळजी घे

मोदक

Image
बघता बघता श्रावण सरला भाद्रपद येऊनी उभा ठाकला मन होई कासावीस किती जमेल ना का होईल फजिती? किती किती ते प्रयोग करावे तेल, तूप वा दूध मिसळावे प्रश्न हे पडती मला किती तांदूळ घ्यावे का घ्यावी पिठी? नव्या पिठीचा मान निराळा जुनी नेहमीच करी घोटाळा कितीही चाळा कितीही मळा सारण येई कापूनी गळा शेवटास जेव्हा जमते उकड नव्या पायरीची नवीच निकड आता पाऱ्या कराव्या किती मनी एकवीस, पण जमतील किती? लिंबाएवढा घेऊन गोळा पाऱ्या केल्या त्याला सोळा सारण भरूनी तोळा तोळा नाजूक हाती मग ते वळा चाळणीत मग ठेऊनिया सारे द्यावे त्यांना वाफेचे वारे येता सुगंध दरवळणारे समजा झाले मोदक न्यारे शुभ्रधवल अन् नितळ कांती त्याच्या अंतरी सारण रसवंती साथ तुपाची त्याला मिळती अहा! स्वर्ग दुजा कुठला या प्रांती! १२१ मोदकांचा नैवेद्य मोदक करण्यात गुंतलेले हात   रोहित कोल्हटकर:  

उद्यान विहार

Image
श्रावणमासी हर्ष मानसी हिरवळ दाटे चोहीकडे । क्षणात येते सरसर शिरवे क्षणात फिरुनी ऊन पडे ।। बालकवींच्या या ओळी आठवल्या की श्रावणाचं चित्र डोळ्यांपुढे तरळून जातं. मेरीलँडचं वातावरणही काहीसं असंच. ह्या इथल्या वातावरणाचं वर्णन करायला बालकवींच्या वरील ओळी अगदी समर्पक ठरतात. निसर्ग हा नेहमीच माणसाला प्रसन्न आणि आल्हाददायक वाटतो. थोर शास्त्रज्ञ न्यूटन म्हणतात की "Nature is pleased with simplicity. And nature is no dummy." झाडे, फळे, फुले, पाने,नद्या, डोंगर असाच निखळ आनंद देत राहतात. रेमरॅंडच्या म्हणण्यानुसार "Choose only one master - Nature." म्हणजेच निसर्ग हा माणसाला शिकवतो. तोच माणसाचा गुरु असतो. मी मूळची तळेगाव दाभाडेची. (मुंबई - पुणे हायवेवरील तळेगाव) आणि केदार नाशिकचा. त्यामुळे निसर्गरम्य ठिकाणांहून आलेल्या आम्हा दोघांना निसर्गाच्या कुशीची मनात ओढ होतीच. मुळातच तळेगाव दाभाडे आणि नाशिक, दोन्हीही थंड हवामान आणि निरोगी वातावरणासाठी प्रसिद्ध. तळेगाव तर मुंबईच्या लोकांसाठी सेकंड होम. हिरवळ आणि भरपूर झाडे, डोंगर, नद्या, यांनी नटलेलं असं तळेगाव. लहानपणापासूनच घरी मोठी बाग- त

आप्पाची गोष्ट

Image
वसंत ऋतूची चाहूल लागली की अंगणात ट्युलिप्स आणि डॅफोडिल्स फुलतात, हयासिन्थस जमिनीबाहेर येऊ पाहतात. हळूहळू इतर कोंबही डोकी वर काढतात. काही कोंब ओळखीचे असतात, हवेसे असतात. काही ओळखीचे असले तरी नकोसे असतात. मात्र इतर अनेक कोंबांची, झुडपांची, रोपांची पुरेशी ओळख नसते आणि मग ते ठेवावेत की उपटावेत असा प्रश्न पडतो. उपटावेत तर एखाद्या चांगल्या फुलझाडाचा बळी जाईल की काय आणि ठेवावेत तर ते फोफावणारे तण निघेल की काय, असे वाटत राहते. शिवाय हे अनोळखी रोप एखाद्या वृक्षाचे बाळ असेल तर ही “वृक्षी रोपे” त्यांची मुळे लगेच घट्ट करतात आणि मग नंतर ती उपटायला जास्तीचे श्रम खर्चावे लागतात. काही दिवसांपूर्वी कोणतातरी खेळ फोनवर खेळत असताना 'पिक्चर धिस' नावाच्या ऍपची जाहिरात मी पाहिली आणि तत्काळ त्या आप्पाला माझ्या फोनवर उतरवून घेतले. हा आप्पा झुडपा-रोपांचे फोटो काढले की त्यांचे नाव-गाव-फळ-फूल वगैरे सगळी माहिती आपल्याला पुरवतो. हा आप्पा मला पूर्वीच का भेटला नाही बरे? मग वेळ न दवडता मी आप्पाला बाहेर अंगणात नेले आणि त्याला 'अखिल अमेरिकी माझ्या अंगणातील झाडे ओळखा' संघटनेचा प्रमुख करून टाकले. माझ्या

बाल विभाग

Image
नील नगरसेकर