१४ मार्चपासून सुरु झालेली देशभरातील टाळेबंदी २० मार्चनंतर अधिक कडक झाली होती. प्रत्येकजण घरकैदी झाला होता. आयुष्यात नंदकिशोरने असले जगणे कधी अनुभवले नव्हते वा कुणी जगल्याचे ऐकलेदेखील नव्हते. घरकोंडी सुरु व्हायच्याआधीचा भरलेला किराणा आता २७ एप्रिलपर्यंत पुरला होता. दूध वगैरे नाशिवंत जिन्नस तर कधीच संपले होते पण आता डाळी-साळीदेखील संपायला आल्या होत्या. पुण्यातल्या मध्यमवर्गीय, ३ वा ४ खोल्यांच्या फ्लॅट संस्कृतीत रहाणारा नंदकिशोर किती सामान गोळा करुन ठेवू शकणार होता? तेही उंदीर आणि घुशींपासून वाचवायचे कसे? डब्यांमधील धान्य सुरक्षित पण पोती कशी सांभाळणार? पौड रस्त्यावरील स्वामी रेसिडेन्सीमधील सातव्या मजल्यावर पूर्वेकडील ४ खोल्यांच्या फ्लॅटमध्ये नंदकिशोर, त्याची पत्नी मालती, अकरा वर्षांचा मुलगा वेदान्त आणि आठ वर्षांची रेणुका राहात होते. अत्यावश्यक सेवेशी निगडित दुकाने आजकाल फक्त दुपारी बारा ते सायंकाळी आठपर्यंत उघडी असत. त्यातही मोजक्याच लोकांना एकावेळी आत सोडत होते; बाकीच्यांनी बाहेर रांग लावा! खूप गर्दीत अडकू नये म्हणून नंदकिशोर साडेअकरालाच बाहेर पडला होता. सोमवार असूनदेखील रस्त्यावर काहीच...
Neil is showing his creativity through pictures. Great work Neil.
ReplyDelete