अद्भुत विषाणू आणि ऑनलाइन शाळा

तुम्हाला कधी असं वाटलं का की अचानक ऑनलाइन शाळा सुरू होणार? मला तर असं कधीच वाटलं नाही आणि विचारही केला नाही!! नवीन विषाणू जगामध्ये कुठून आणि कसा आला? ही खरंच आश्चर्याची गोष्ट आहे. या प्रश्नाच्या एकाच भागाचं उत्तर माहीती आहे. हा विषाणू चीनमधून सुरू झाला. कसा सुरू झाला, ते अजुनही माहीत नाही. काही लोक म्हणतात की एका प्राण्यामुळे हा विषाणू सुरू झाला. कोरोनाचा आजार पसरू लागला. सगळ्यांच्या सुरक्षिततेसाठी सगळ्या शाळा बंद झाल्या, आणि लोक घरून काम करायला लागले. काही दुकानं बंद झाली आणि काही दुकानांची वेळ कमी झाली. शाळा बंद झाल्यानंतर, मी कधीतरी पत्त्यांचे खेळ खेळले, पुस्तकं वाचली, बोर्ड गेम्स खेळले आणि वेगवेगळे पझल्स सोडवले. वेळ मिळेल तेव्हा मी माझ्या नातेवाईक आणि मित्रमैत्रिणींबरोबर ऑनलाइन गप्पा मारल्या. टिव्हीवर महाभारत बघायला सुरू केलं आणि खूप मालिका बघितल्या.

मी परत शाळा उघडण्याची वाट पाहत होते. मला शाळेत परत जायचं होत, पण पूर्ण वर्षासाठी शाळा बंद केल्यानंतर मला वाईट वाटल पण सगळयांच्या सुरक्षिततेसाठी शाळा बंद केल्या ते बरं झालं. ऑनलाइन शाळेचे तोटे आणि फायदे जाणवले. घरी खूप वेळ बसून कधीतरी कंटाळा यायचा. जास्ती वेळ संगणक वापरायला लागले तरीही घरातून शाळा असल्यामुळे आवडीच्या गोष्टी करायला खूप वेळ मिळाला. शिक्षक आणि वर्गमित्रांना परत बघू शकले.

आता तर शाळा संपली आणि खरी उन्हाळ्याची सुट्टी सुरू झाली! आता शाळेच्या नविन वर्षामधे काय होईल? बहुतेक अर्धा वर्ग एक दिवशी मग अर्धा वर्ग दुसऱ्या दिवशी. नाहीतर मग डिसेंबर पर्यंत ऑनलाइन होणार आणि मग जानेवारीपासून परत शाळेत जायला मिळेल. आणि शाळेत कदाचित मास्क घालायला सांगतील. तुमचे काय विचार आहेत शाळेच्या नवीन वर्षाबद्दल?


रुहा महाजन:


Comments

Popular posts from this blog

गाईड

परसातले पक्षी