मी पाहिलेला हिमालय
श्रीमती चित्रा धाकड “हिमालयावरूनी वाहत असे ती धन्या, म्हणे ही आल्यावरती पुरती हिमाद्री कन्या || बाजूला खडक असोनी उंच भारी, वाहे त्यामधुनी ती देवी शुद्ध नारी ||” इ.स.१९७० च्या दशकात माझे आजोबा या पंक्ती गुणगुणत असत व मला ते खूप आवडायचे. आजोबा मुख्याध्यापक असल्याचा आम्हाला अभिमान होता. मी तेव्हा ८-९ वर्षांची असेन, माझा हात धरून शाळेत नेणे व ऊन लागू नये म्हणून डोक्यावर छत्री धरणे अशी खूप काळजी ते घ्यायचे. अशा आजोबांची नात आजोबांचा वारसा का म्हणून नाही पुढे नेणार? त्यांच्यामुळेच ही प्रेरणा मला मिळत आहे. लेखणी जरी माझ्या हातात असली तरी विचार त्यांचे आहेत. त्यांच्या विचारांशिवाय माझे लेखन निरस वाटेल, लेखनाला ओलावाच राहणार नाही. त्यांच्या विचाराने मला स्फूर्ती येते. माझ्या नकळत जे विचार डोक्यात येतात, ते या लेखणीद्वारे प्रकट होतात अशा आजोबांना मी नमस्कार करते व असेच प्रेमळ आजी-आजोबा सगळ्यांना लाभो हीच प्रार्थना देवाला करते. ममी भाग्यवान आहे कारण सानेगुरूजींची कर्मभूमी असलेल्या अंमळनेर तालुक्यात मी जन्मले व लहानाची मोठी झाले, शिक्षण घेतले. तिथल्या प्रत्येक गोष्टींना ...
Comments
Post a Comment