अमेरिकेतील अरण्य-मृत्यू
मिलिंद पदकी |
न्यू जर्सीस्थित औषध-वैज्ञानिक. आता मेडिकल लेखक. २०१७ मध्ये मराठी काव्यसंग्रह "बदकनामा " प्रसिद्ध (ग्रंथाली, मुंबई). मराठी आणि इंग्रजीतून वैज्ञानिक आणि ललित लेखन. सध्या प्रामुख्याने ‘कोव्हिड’विषयक लेखनावर भर. |
तऱ्हेतऱ्हेचे मृत्यू शोधायचे झाले तर
बर्फाळ वारा शांतपणे झोपलेल्या खडकांवर
पसरताना दिसतो, काही झाडांना वाकवीत
चिरनिद्रेत मग्न कवट्यांमधले स्वप्न जागवीत.
तिथेच उन्हाळ्यात उठतात शिकारी कुत्र्यांची काळी पावले
अंधाऱ्या दरीत लटकणारी उलटी झाडे, वेगाने
वाहणारा प्रवाह करतो वृक्षांना उध्वस्त आणि जातो
दूर, दूर ओढत घेऊन.
माणसांचेही तसेच होत असे बघा:
गौरकाय देह सोलीव लाकडांसारखे शुभ्र, त्या दऱ्यात कोसळत,
तळाच्या ओढ्यात त्यांचे केस विस्तारून तरंगत
आंधळेपणें समुद्राकडे ओढले जात.
गव्हावर चालणारे कोयते ऐकून
सूर्यासारखे तेजस्वी नाग आपली शरीरे वेटाळून आक्रसत.
स्थानिकांना विचारल्यावर ते सांगतात की
पूर्वीच्या एका यादवी युद्धात इथे अनेक तरुण मारले गेले होते.
टेकड्यांच्या उतारावर चढत-पडत
उत्तर-दक्षिण दोन्ही बाजूंनी लढलेले.
त्यांच्या टाचांचा चिखल प्रवाहांचे पाणी गढूळ करत असे.
त्यांच्या मर्दानी मिशांवर चांदण्यात चमकणारे रक्त आठवते,
पण ते कशासाठी लढले हे सांगणे आम्हाला अशक्य आहे:
फार वर्षे झाली साहेब.
त्या अरण्यात आता रात्री
एखादे सफरचंद पडते, इतकेच.
xxx
३१ मार्च २०२१
(This is a translation. original; History among the Rocks: by Robert Penn Warren)
There are many ways to die
Here among the rocks in any weather:
Wind, down the eastern gap, will lie
Level along the snow, beating the cedar,
And lull the drowsy head that it blows over
To startle a cold and crystalline dream forever.
The hound's black paw will print the grass in May,
And sycamores rise down a dark ravine,
Where a creek in flood, sucking the rock and clay,
Will tumble the laurel, the sycamore away.
Think how a body, naked and lean
And white as the splintered sycamore, would go
Tumbling and turning, hushed in the end,
With hair afloat in waters that gently bend
To ocean where the blind tides flow.
Under the shadow of ripe wheat,
By flat limestone, will coil the copperhead,
Fanged as the sunlight, hearing the reaper's feet.
But there are other ways, the lean men said:
In these autumn orchards once young men lay dead—
Gray coats, blue coats. Young men on the mountainside
Clambered, fought. Heels muddied the rocky spring.
Their reason is hard to guess, remembering
Blood on their black mustaches in moonlight.
Their reason is hard to guess and a long time past:
The apple falls, falling in the quiet night.
Comments
Post a Comment