शुभदा जोशी-पारखी शुभदा जोशी मूळच्या सांगलीच्या. व्यवसायाने आर्किटेक्ट असून सांगलीला प्रॅक्टिस होती. सध्या कोलंबिया, मेरीलँडमध्ये वास्तव्य. गायनाची आवड आहे. सांगलीत असताना शास्त्रीय संगीताचे शिक्षण घेतले आहे. युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका, ज्याला आपण “अमेरिका”या संक्षिप्त नावाने संबोधित करतो, तिथे प्रत्यक्ष जाण्याचा योग हा असा जुळून येईल, असं कधीच वाटलं नव्हतं.