संपादकीय


डिसेंबर २०२४
अंक १

मैत्र संपादक मंडळ २०२४ 

वरदा वैद्य 

विदुला कोल्हटकर 

रोहित कोल्हटकर 

दीप्ती जोशी 

 

बाममं कार्यकारिणी २०२४ 

अध्यक्ष 

पंकज शिवपुजे  

उपाध्यक्ष 

सोनाली अहिरराव  

 उपाध्यक्ष- विपणन 

पंकज शिवपुजे  

चिटणीस 

अश्विनी नागलकर  

खजिनदार 

संदीप बडे  

सह-खजिनदार 

योगेश खैरनार

सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन-
प्रियांका बापट

मुलांच्या कार्यक्रमांचे आयोजन-
मनीषा कन्नन

ज्येष्ठ नागरिकांच्या कार्यक्रमांचे आयोजन-
गोविंद मोदी

बृहन्महाराष्ट्र मंडळ प्रतिनिधी -
राजेंद्र मोडक



नमस्कार मंडळी,

गेल्या वर्षीपर्यंत दर तीन महिन्यांनी प्रकाशित होणारे मैत्र ह्या वर्षीपासून बंदच पडते की काय अशी भीती वाटत असतानाच, संपादक मंडळाने दिलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत काहींनी त्यांचे लेखन मैत्रासाठी पाठवले. त्यामुळे ह्या वर्षी मैत्राचा एकच का होईना, पण अंक प्रकाशित होत आहे ह्याचा आम्हाला आनंद आहे. प्रतिसादाअभावी मैत्र बंद पडू नये अशी आमची मनापासून इच्छा आहे. त्यामुळे पुढच्या वर्षातही आमच्या आवाहनाला प्रतिसाद देत तुम्ही तुमचे लेखन पाठवत राहाल अशी आशा करतो. प्रवासवर्णन, अध्यात्म, तत्त्वज्ञान, अनुभव, माहिती अशा विविध विषयांवरील लेखनाची आणि कथा, कविता, लेख, अश्या विविध लेखन प्रकारांची वर्णी ह्या अंकामध्ये लागली आहे. अंक नेहमीप्रमाणे PDF स्वरूपात आणि ब्लॉगवर प्रकाशित करत आहोत. अंक वाचून तुमच्या प्रतिक्रिया ब्लॉगवर जरूर लिहा. पुढच्या वर्षांमध्ये एक ते दोन अंक प्रकाशित करण्याचा मनसुबा आहे, आणि त्यासाठीचे आवाहन मंडळाच्या व्हॉट्सअप ग्रुपवर पाठवूच. किमान पाच ते सहा लेख मिळाले तरच पुढचे अंक प्रकाशित होतील. येत्या नवीन वर्षाच्या सर्वांना शुभेच्छा. येणारे नवीन वर्ष तुम्हा सर्वांना सुखसमृद्धीचे आणि आरोग्यपूर्ण जावो ही सदिच्छा!

कळावे,
संपादक मंडळ

मुखपृष्ठ छायाचित्रकार - शुभदा जोशी-पारखी

Comments