निसर्ग…!

शुभदा जोशी-पारखी

पूर्वप्रकाशन - बृहन्महाराष्ट्र मंडळाचे वृत्त, एप्रिल २०२४

निसर्ग…!

ननिसर्गाची किमया, न्यारीच भासे,
तेच दृश्य, उलगडती भाव निराळे.
कधी निसर्ग करतो रंगांची उधळण,
कधी मनात उरते फक्त आठवण…!

अवनी नेसून शालू गर्द हिरवा,
हाती भरते रंगीत फुलांचा चुडा.
कधी पांघरून शुभ्र बर्फाची चादर,
नितांतरम्य रूप तिचे करते सादर…!

निसर्गाची रूपे ही वेगवेगळी जरी,
त्यातून शिकण्याजोगे असे बरेच काही.
एकसमान नसते कधी आयुष्य जरी,
हसत सामोरे जावे आयुष्यास तरी…!

Comments

Popular posts from this blog

||श्रीमद्भागवत पुराण||

गुढीपाडवा