हरवला
शशांक चिटणीस |
विद्यारण्य स्वामींचा ‘पंचदशी’ हा वेदान्त सिद्धांत स्पष्ट करणारा एक विलक्षण ग्रंथ आहे हे आपल्याला माहीतच आहे. प्रत्येक प्रकरण अत्यंत प्रभावी आहे. त्यातील नाटकदीप प्रकरण वेदान्तातील विचारदर्शन खूप सुंदर प्रकारे घडवते. प. पू. गुळवणी महाराजांनी अश्याच संदर्भात चित्रपट पडद्याची भूमिका सांगितली होती. ही कविताही अश्याच काही विचारांनी प्रेरित आहे
|
हरवला
जिज्ञासु होता पुत्र एक लहान वयातला
चित्रपटाचे होते भारी कौतुक हो त्याला
पित्याने होते सांगितले पडद्याचे महात्म्य
चित्रपट दिसणे नाही त्याच्याविण शक्य
बापासंगे गेला मुलगा चित्रपट पहायला
मोठ्या उत्साहाचा होता रसरंग मांडला
जाता क्षणी होता सुरु होता तो झालेला
मुलास नाही मिळाला पडदा बघायला
चित्रपटात वाहे वारा अन् पाऊस जोरात
नाना होते भिजले कलाकार हो त्यात
आता विचारी भाबडा प्रश्न तो पित्याला
नक्की बरं इथे आहे पडदा तो कुठला ?
पाऊस पडताना दिसतो तो आहे पडदा ?
की वाऱ्यात झुलणाऱ्या फांद्या हा पडदा ?
की सैरवैर पळणारी माणसे हा पडदा ?
सगळ्यांच्या अलीकडे का बरे हा पडदा ?
बापास नाही जमले चालू ह्या चित्रपटात
मुलास दाखवायला मागचा तो पडदा
सगळ्या गदारोळात समोर असून हरवला
मागचा पडदा आयुष्याच्या चित्रपटातला
Comments
Post a Comment