दैवाधीन

बाळकृष्ण पाडळकर

सध्या वास्तव्य ट्रॉय, मिशिगन येथे.

डिसेंबर, २०२१मध्ये नाशिक येथे पार पडलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनामध्ये श्री. पाडळकरांच्या 'कथेकरी या पुस्तकाचे विमोचन श्री. पृथ्वीराज तौर यांच्या हस्ते झाले. हे पुस्तक नाशिकच्या सुप्रसिद्ध दिशोत्तमा प्रकाशन यांनी प्रकाशित केले. यापूर्वी प्रकाशित झालेल्या त्यांच्या 'कथनी' या कथा संग्रहाबरोबर 'कथेकरी' ग्रंथ विक्रीस उपलब्ध होता. वाचकांनी दोन्ही ग्रंथांना पसंती दर्शवून त्यांच्या प्रति विकत घेतल्या.

माझे मित्र विजयकुमार डेंगळे हे ज्योतिषशास्त्राचे मोठे अभ्यासक आहेत. हल्ली आम्ही या विषयावर सांगोपांग चर्चा करतो.

मला ज्योतिषशास्त्राविषयी फारसे ज्ञान नव्हते, परंतु डेंगळे यांनी चर्चेमध्ये या शास्त्राच्या अनेक पैलूंवर प्रकाश टाकल्यामुळे माझी या शास्त्राविषयीची संकल्पना बदलली. सामान्यतः ज्योतिषशास्त्र हे अंधश्रद्धेचे जुळे भावंडं असावे असा सर्व सामान्यतः समज असतो. मीही त्याला अपवाद नव्हतो. परंतु अलीकडे माझी ज्योतिषशास्त्राकडे पाहण्याची दृष्टी बदलली आहे. मूलतत्वांवर आधारित हे शास्त्र आहे याबद्दल माझी खात्री पटली.

चर्चेच्या ओघात डेंगळेंनी या शास्त्राशी निगडित अशी एक सत्य घटना विशद केली, ती जशीच्या तशी मी निवेदन करू इच्छितो.

पुण्याजवळ असलेल्या राजगुरूनगरला डेंगळे शासकीय कार्यालयात कार्यरत होते. त्यांचा एक मित्र रोज संध्याकाळी त्यांच्यासोबत चिमण्या गणपतीच्या पारावर गप्पा मारायला येत असे. त्या मित्राला ज्योतिषशास्त्रात रस होता, बऱ्याच अंशी तो या शास्त्रात पारंगत होता. वधू -वरांची लग्ने होण्याच्या योगाचा त्याने केलेला होरा सहसा चुकत नव्हता. त्यामुळे मुलीचा योग केव्हा आहे हे जाणून घेण्याकरता बरेच पालक डेंगळेच्या या मित्राकडे येत. लग्न यशस्वी होईल की नाही याचे त्याने केलेले विधानही सहसा चुकत नसे.

बोलता बोलता एक दिवस या मित्राने डेंगळेना सांगितले की त्याच्या हृदयाला छिद्र आहे, आणि घरातली मंडळी सतत त्याच्या मागे लागून त्याला ऑपरेशन करण्याचा आग्रह करीत आहेत. परंतु या मित्राला ऑपरेशन करायचे नव्हते. त्यामुळे त्याची आई, बहीण आणि पत्नी त्याच्यावर नाराज होत्या. त्याची बहीण पुण्यात के इ एम मध्ये सिनिअर नर्स होती, तिची नेमणूक आयसीयुमध्ये असल्यामुळे ती भावाची विशेष काळजी घेऊ शकणार होती, पण भाऊ ऑपरेशनला तयार नव्हता. जंग जंग पछाडूनही त्याने कोणालाही दाद दिली नाही.

बरेच दिवसांनी या मित्राने डेंगळेना गप्पा-गप्पांमध्ये सांगितले की त्याने ऑपरेशन करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याच्याकडे असलेला बँक बॅलन्स, घर, शेती, व्यवसाय त्याने मृत्युपत्र करून पत्नीच्या नावे केला आहे. यावर डेंगळे त्याला म्हणाले, “ऑपरेशन करण्याकरता जायजाद पत्नीच्या नावावर करण्याची काय गरज?” स्पष्टीकरण करताना तो डेंगळेना म्हणाला, “डेंगळे साहेब, मी माझ्या पत्रिकेचा खोलवर अभ्यास केला आहे, पत्रिकेनुसार ज्या दिवशी माझ्या शरीराला शस्त्र लागेल तो माझा शेवटचा दिवस असेल.” डेंगळे या उत्तराने गप्प झाले, ते या विषयावर अधिक भाष्य करू शकत नव्हते.

ऑपरेशनचा दिवस उगवला. या मित्रांसोबत त्याची आई, बहीण, पत्नी आणि स्वतः डेंगळे राजगुरूनगरहून पुण्यात पोहोचले. ऑपरेशनपूर्व चाचण्या झाल्या. चाचण्यांत कुठलीही अडचण दिसत नव्हती. दुसरे दिवशी सकाळी सात वाजता ऑपरेशन करायचे ठरले. सकाळी सात वाजता डेंगळेच्या मित्राला ऑपरेशन थियेटरमध्ये नेण्यात आले, बरोबर त्याची नर्स बहीण होती. डॉक्टरांनी ऑपरेशनला पाच तास लागतील असे सांगितले. बाहेर व्हरांड्यात त्या मित्राची आई, पत्नी आणि डेंगळे थांबले होते.

मित्राची बहीण दुपारी एकच्या सुमाराला बाहेर आली आणि तिने ऑपरेशन यशस्वी झाल्याचे सांगितले आणि थोड्या वेळाने ती परत ऑपरेशन वॉर्डमध्ये गेली. अर्ध्या तासाने मित्राची बहीण ओंजळीत तोंड लपवीत बाहेर आली, बाहेर येताच तिचे स्वतःवरील नियंत्रण संपले आणि ती मोठ्याने रडू लागली. कोणाला काय झाले हे कळेना. ती कशीबशी म्हणाली “भाऊ गेला.“ सगळे शोकसागरात बुडून गेले. आईला, पत्नीला वाटले आपण त्याला सक्ती करून जीवाला मुकायला भाग पाडले.

संध्याकाळी पार्थिव राजगुरूनगरला आणण्यात आले, क्रियाकर्म दुसरे दिवशी सकाळी करण्यात आले.

या सत्यघटनेमुळे मी ज्योतिषाविषयी पुन्हा नव्याने विचार करू लागलो. त्याची सत्यता मला पटली.

अधिक माहिती - श्री विजयकुमार डेंगळे सध्या अमेरिकेत आले आहेत . ते मूळचे दौंडचे रहिवाशी असून पुण्यातील बृहन्महाराष्ट्र ज्योतिष मंडळ, पुणे या मान्यताप्राप्त संस्थेचे ज्योतिष केंद्राचे संचालक आहेत. त्यांचा या शास्त्राचा छत्तीस वर्षांचा अभ्यास आहे. त्यांनी महाराष्ट्र आणि महाराष्ट्राबाहेरील ज्योतिषशास्त्राशी संबंधित अनेक अधिवेशनाचे नेपथ्य केले आहे. ते रेकी पंडित आहेत, त्यांनी कित्येक गरजूंना रेकीचे मोफत प्रशिक्षण दिले आहे.

अमेरिकेत असेपर्यंत त्यांना आपली सेवा येथील भारतीयांना देण्याची इच्छा आहे . त्यांच्या सेवेअंतर्गत ते इथे जन्मलेल्या बालकांच्या पत्रिका, कुंडल्या बनवून देऊ शकतात. श्री विजयकुमार हे दोन प्रकारच्या पत्रिका बनवू शकतात - एक प्रदीर्घ पत्रिका आणि दुसरी एक/ दोन पानांची संक्षिप्त पत्रिका.

येथील गरजू पालकांनी खालील पत्यावर त्यांचेशी संपर्क साधल्यास त्यांना हवी असलेली अधिक माहिती ते जातकाकडून घेऊ शकतील. आपल्या "मैत्र "च्या वाचकांनी या संधीचा फायदा घ्यावा या, असे मला वाटते .

संपर्कासाठी माहिती :-Sri . Vijaykumar Dengale is available on Whatsapp .

श्री विजयकुमार डेंगळे ,
ई-मेल vbdengale797@gmail.com
91 9730650797 91 9049120641

श्री विजयकुमार यांचेशी संपर्क केल्यास अधिक माहिती मिळू शकेल.


Comments

Popular posts from this blog

गाईड

परसातले पक्षी