आई

अरुंधती सरपटवारी



























नुसती तुझी आठवण, डोळ्यां आणते पाझर
आई, तू का गं गेलीस ठेवून मला माघार?

नुसती तुझी आठवण, डोळ्यां आणते पाझर
आई, तू का गं गेलीस ठेवून मला माघार?

कुठे असशील, कोण करीत असेल तुझी सेवा
जीव माझा कासावीस, आई तुझ्याविना

तू मायेची खाण , तू प्रेमाचा पूर
सारवून प्रेमाचे अंथरूण, घालून आठवणींचे पांघरूण
का गेलीस तू दूर?

चिमणे-चिमणे घास भरवलेस, राखून आपले पान
जोजो करीत, अंगाई म्हणत, केलेलस जीवाचे रान!

विजेच्या कडकडाटाचा बागुलबुवा
मिठीत तुझ्या शिरताची करीत असे माझा हेवा

गाय चाटे वासरू, चिमणी भरावी पिलांना
निसर्गात दिसता प्रेम असे, उणीव तुझी खटकते मनाला

तुझाइतकी प्रेमळ, खंबीर, दूरदर्शी
आहे का गं मी थोडीतरी तुझ्यासारखी?

इच्छा करते, पुढच्या जन्मी येवो मी तुझ्याच पोटी
पुन्हा एकदा टेकीन माथा तुझ्याच चरणी आई

परतफेडीची आशा कधी दाटते मनी,
वाटते तूच ये ना पुढच्या जन्मी माझ्या पोटी
मग करीन मायेचा वर्षाव मीच तुझ्या ठायी

आहेत अशा या प्रेमाच्या गाठी



Comments

Post a Comment

Popular posts from this blog

गाईड

परसातले पक्षी