चित्रसाहित्य - क्रिकेट

राघव महाजन

“No matter how hot the fire burns, a protea always survives.”- A B Devilliers
जरी एखादा सामना जिंकायची आशा नसेल, तरी धाडसीपणाने तो जिंकता येऊ शकतो.

चित्रातला एक मुलगा बॅटिंग करत आहे. हा मुलगा त्याचा क्रिकेटचा सामना जिंकायला उत्सुक आहे. तो खूप धाडसी असेल. १० रन ३ बॅालमध्ये करायचे आहेत. त्याने एक चौकार मारला! आता ६ रन २ बॅालमधे हवे आहेत. पुढच्या बॅालला २ रन झाले... तो ४ रन एका बॅालमधे करू शकतो का?

आणि तो कुत्रा! काय बरं करत असेल? मिड-विकेट फील्डर असू शकतो का, जो कॅच पकडायला तयार आहे? लेग अंपायर असू शकतो का? सगळ्यांचे श्वास धरलेले आहेत. कोण जिंकणार आता? शेवटचा बॅाल.. कॅच कि षट्कार.. आणि हा झाला षट्कार !!!

ह्या चित्रात दिसतं की स्टंप्सच्या ऐवजी त्या मुलांनी काही दगड एकमेकांवर ठेवले आहेत. हे चित्र बघून मला रॉबर्टो क्लिमेंटेची आठवण झाली. रॉबर्टो क्लिमेंटे एक बेसबॅाल खेळाडू होता. त्याचा जन्म प्यूर्टो रिकोमध्ये झाला. बेसबॅाल हा खेळ प्यूर्टो रिकोमध्ये खूप प्रसिद्ध होता. लहान असताना रॉबर्टोला बेसबॅाल खेळायला आवडू लागलं. पण तो छोट्याशा गावात राहात होता आणि तिथे बेसबॅाल खेळाचे साहित्य उपलब्ध नव्हते. पेरूच्या झाडाची काठी आणि सूप कॅन वापरुन तो बेसबॅाल खेळायला लागला.

जर तुमच्याकडे काही करण्यासाठी पुरेसे साहित्य नसेल तर घरच्या गोष्टी वापरुन काम सुरू करता येतं. एका ठिकाणी मी काही चित्रं पहिली, आणि त्याच्यात स्टंप्ससाठी खुर्ची, एक गाडीच टायर, दोन डबे, दोन दगड .. असं काहीबाही वापरलेलं होतं.

मी एक चित्रपट पाहिला, ८३ नावाचा. ह्या चित्रपटात पण काही मुलं रस्त्यावर क्रिकेट खेळत होते. एक मुलगा होता, सुनील गावस्कर, तो लहान असताना तिथे रस्त्यावर खेळत होता. बॅटिंग करत असताना तो सारखा खिडक्या तोडायचा. पण त्याची मावशी त्याला क्रिकेटचा बॅाल नेहमी परत द्यायची.

एकदा मी आणि माझा मित्र घराच्या बाहेर क्रिकेट खेळलो. आम्ही एका फोमच्या बॅालने खेळलो.. कारण मग घराला कुठे लागणार नाही!!

हा आहे माझा पहिला मराठी चित्रवर्णनाचा अनुभव.

एप्रिल २०२२ च्या अंकात दिलेले चित्रसाहित्य; छायाचित्रकार- प्रदीप कुलकर्णी

Comments

Popular posts from this blog

गाईड

परसातले पक्षी