सूर्य जवाहिऱ्या

मिलिंद पदकी

न्यू जर्सीस्थित औषध-वैज्ञानिक. आता मेडिकल लेखक. २०१७ मध्ये मराठी काव्यसंग्रह "बदकनामा " प्रसिद्ध (ग्रंथाली, मुंबई). मराठी आणि इंग्रजीतून वैज्ञानिक आणि ललित लेखन.








 सूर्य जवाहिऱ्या

सुंदरींच्या केशी / लावी मोती-हिरे
आकाशात फिरे / बारा तास
पुरुषांच्या माथी / प्रकाश-वलय
बरेच ते वय / झाले तरी
पालवीमधून / किरणे फांकती
नक्षी ती काढती / काचेवर
आणिक उघडे / हरिणांचे डोळे
प्रकाशात लोळे / शुभ्र ससा
असा जादूगार / सूर्य जवाहिऱ्या
करीतो किमया / जर्सीवरी

Comments

Popular posts from this blog

गाईड

परसातले पक्षी