प्रतिबिंब

अरुंधती सरपटवारी

प्रतिबिंब

मी माझ्याकडे पाहून हसले
आयुष्याच्या अनेक वळणात कुठेतरी मी हरवले
मुलगी होते, पत्नी झाले, देशांतरही घडले
"अग”, "आई" या नादांनी सुखावले
सुखदु:खाच्या लाटांनी पायाला भिजवले
पाहता पाहता वळण संपले
जीवनातल्या आठवणींचे मोठे भांडारचं गवसले
काय किती मी घेवू, काय किती मी घेवू
या विचारातच मी गुंगले
माझ्या तिन्ही मुलांत मला माझेच प्रतिबिंब दिसले
मी माझ्याकडे पाहून हसले, आज असे अचानक घडले
मी माझ्याकडे पाहून हसले


Comments

Popular posts from this blog

गाईड

परसातले पक्षी