बिनासाखरेचे व्हीगन तीळलाडू

सुनंदा काकडे

व्हीगन, नैसर्गिक शर्करायुक्त, पौष्टिक तीळलाडू. संक्रांतीला उपयुक्त.

साहित्य -

१ १/२ कप गहू पीठ,
१ कप स्पेल्ट पीठ,
३/४ कप बदाम पीठ,
३/४ कप सालासकट तीळ,
१/२ कप भाजलेल्या तिळाचे तेल,
१/२ कप शुद्ध, खाण्याचे खोबरेल तेल
१ कप खारीक पूड,
६-७ खजूर तुकडे,
२ चमचे मध
१ १/२ चमचा वेलदोडे पूड,
१/२ चमचा जायफळ पूड

 

सर्व पिठे व दोन्ही तेले मिसळून खमंग भाजणे. त्यात भाजलेले तीळ मिसळणे. ओव्हन किंवा एअर फ्रायरमध्ये भाजू शकता. त्यात बाकी सर्व पदार्थ मिसळणे. फूड प्रोसेसर अथवा मिक्सर मध्ये बारीक दळणे. तेल सुटून पिठाचा मऊ गोळा होऊ देणे. मिश्रणाचे लहान लाडू वळणे. साधारण २० लाडू होतात.

ह्यात तूप नाही, कोलेस्टेरॉल नाही, प्रक्रिया केलेली; पांढरीशुभ्र ब्लीच केलेली साखर नाही, दूध अगर खवा नाही, त्यामुळे टिकाऊ.



Comments

Popular posts from this blog

गाईड

परसातले पक्षी