बहिणाबाई चौधरी

बाळकृष्ण पाडळकर

बहिणाबाईंचा जन्म जळगावजवळच्या आसोदा या गावात २४ ऑगस्ट १८८० साली एका ब्राह्मण कुटुंबात झाला.

वयाच्या तेराव्या वर्षी त्यांचे लग्न एका ब्राह्मण विधुराशी झाले. नवऱ्याच्या आणि त्यांच्या वयात पंचवीस वर्षांचे अंतर होते. नाथुजी चौधरी -बहिणाबाईंचे यजमान- हे त्यांचे लांबचे नातेवाईक होते. कौटुंबिक कलहामुळे बहिणाबाईंना सासर व माहेरच्या मंडळींना फार लहान वयात मुकावे लागले. दोन वर्षे भटकंती करून, ठिकठिकाणी पौरोहित्य करून या जोडप्याने आपला उदरनिर्वाह केला. शेवटी कोल्हापूर मुक्कामी येऊन तेथेच हे दाम्पत्य स्थिर झाले. कोल्हापुरात बहिणाबाईंना वारकरी संप्रदायाचा सहवास घडला. बहिणाबाई अशिक्षित होत्या. त्यांना संस्कृत भाषेतले काहीही समजत नव्हते. या दरम्यान संत तुकारामांच्या अभंगांची आणि तुकारामांच्या गाथेची बहिणाबाईंना गोडी लागली. अभंग व गाथा बोली भाषेत असल्यामुळे समजण्यास अडचण नव्हती. सतत तुकाराम महाराजांच्या अभंगांचे मनन आणि पठण करण्यामुळे जणू बहिणाबाईंना जीवनतत्त्वांचा साक्षात्कार झाला व पुढील जीवनाचा मार्ग सापडला. जरी बहीणबाईंचा जन्म ब्राह्मण कुळात झाला असला आणि तुकाराम हे ब्राह्मणेतर कुळातले असले तरी त्यांना तुकारामांचा अनुग्रह घेण्याची प्रबळ इच्छा निर्माण झाली. बहिणाबाई त्यांच्या थोरल्या मुलीबरोबर सनातन संस्कार व शुद्ध आचरणाद्वारे भक्ती मार्गाकडे वळल्या.

सुरुवातीची शेतकरी कुटुंबाची पार्श्वभूमी व खेड्यातील वास्तव्य यांचा पगडा बहिणाबाईंच्या कविता, ओव्या व रचनांवर असलेला आढळतो. त्यांच्या रचनांमध्ये शेती, पिके, झाडे, पाखरे, जनावरे, वेली, निसर्ग, आनंद, दुःख यांचे रूपकाने अस्तित्व आढळते.

मानवी आयुष्याचा अर्थ बहिणाबाईंनी अभंग व आपल्या वेगवेगळ्या रचनांत साध्या मराठी भाषेत, अहिरणी भाषेत बोलीभाषेचा आधार घेऊन सांगितलेला आढळतो. जरी बहिणाबाईंना अकाली वैधव्य आले तरी त्यांनी स्वतःचे आयुष्य स्वावलंबी आणि स्वतंत्र ठेवण्यात यश मिळविले. त्यांच्या खालील रचनेतून हेच भाव स्पष्ट होतात. नवऱ्याच्या निधनानंतर समोर दोन लहान मुलांचे लालन-पालन करण्याची जबाबदारी स्वीकारतांना त्या म्हणतात-

देव गेले देवाघरी, आठी ठेयीसनी देवा !
डोयापुडं दोन लाल, रडू नको माझ्या जीवा !!

नवऱ्याला देव संबोधून बहिणाबाई मनाची समजूत काढतांना म्हणतात, जरी देव (नवरा) देवाघरी गेले असले तरी मागे त्यांनी दोन लाल (दोन मुले ) ठेवले आहेत, म्हणून, हे जीवा, रडू नकोस. त्या शेजाऱ्यापाजाऱ्यांना, त्यांच्या नवऱ्याचे निधन झाल्यावर भेटायला येणाऱ्या आयाबायांनाही हेच सांगत. रडत बसून नशिबाला दोष देणे त्यांना मान्य नव्हते.

नका, नका आया बाया, नका करू माझी कीव !
झालं माझं समाधान, आता माझा मले जीव !!

त्यांच्या ओव्यांना मराठी भाषेत अनन्यसाधारण महत्त्व आहे. प्रत्येक रचनेमधून माणसाला येणाऱ्या अडचणींचा उल्लेख तर आहेच, पण त्यावर साध्या साध्या ओळींमधून, सरळ भाषेमधून त्यांनी उपाय सुचवित जीवनाचे फार मोठे तत्त्वज्ञान सोपे करून जगासमोर ठेवले आहे. कविता व रचना फार सोप्या व सहज लक्षात येतील अशा भाषेत आहेत, परंतु त्याचा गर्भितार्थ फार असामान्य आहे.

उदाहरणार्थ,

नाही सरल सरल, जीवा तुझं येणं जाणं !
जसा घडला मुक्काम, त्याला म्हणती रे जिणं !!

किंवा,

आला सास, गेला सास, जीवा तुझं रे तंतर !
अरे! जगणं -मरणं, एका सासाचं अंतर !!

सूक्ष्म निरीक्षण, प्रबळ स्मरणशक्ती, जन्मजात अर्थपूर्ण विनोदबुद्धी, सुखदुःख एकाच पारड्यात मोजण्याची अलौकिक समज, जीवनात येणाऱ्या कठीणातील कठीण प्रसंगांना सहज सामोरे जाण्याची क्षमता आणि वृत्ती ही त्यांची आणि त्यांच्या रचनांची वैशिष्ट्ये आहेत. त्यांच्या रचनांमधून त्यांनी भल्याभल्यांनाही न उमजणारे तत्त्वज्ञान सांगितले आहे. हे करीत असतांना त्यांनी जगापुढे आपली दुःखे कधी उघडी केली नाहीत. त्या पुढील ओळीत म्हणतात,

माझं दुःख, माझं दुःख, तय घरात कोंडलं!
माझ सुख, माझं सुख, हंड्या, झुंबरं टांगलं !!

जेव्हा मुस्कटदाबी त्यांना अस्वस्थ करीत होती तेव्हा त्या स्थितीला उद्देशून त्या म्हणतात,

माणसा, माणसा, कधी व्हशील रे माणुस !
कधी होईल कमी, पैश्यांचा तुझा सोस !!

केवळ अध्यात्म आणि भक्तीलाच त्यांनी महत्त्व दिले नाही. त्यांची वृत्ती सामाजिक होती हे खालील रचनेवरून दिसून येते.

दे रे दे रे योग्या ध्यान, आईक मी काय सांगते !
लेकीच्या माहेरासाठी, माय सासरी नांदते !!

अथवा,

माझी माय सरसोती, माले शिकविते बोली !
लेक बहिणींच्या मनी, किती गुपितं पेरली !!

बहिणाबाईंचे चिरंजीव सोपानदेव चौधरी १९५० च्या सुमाराला बहिणाबाईंचे स्वतःच्या हस्ताक्षरात लिहिलेले साहित्य घेऊन आचार्य अत्रेंकडे गेले. आचार्य अत्रेंनी जेव्हा हे साहित्य वाचले तेव्हा त्यांचा तोंडून आश्चर्योद्गार निघाले, “सोनाराच्या हाती अचानक हिरा सापडावा तसे बहिणाबाईंचे साहित्य आहे, हे शंभर नंबरी सोने आहे.” यथावकाश आचार्य अत्र्यांनी हे सर्व साहित्य प्रकाशित करवून घेतले.

अनाकलनीय तत्त्वज्ञानाची लहान लहान ओव्यांच्या माध्यमातून उकल करणाऱ्या रचना बहिणाबाईंनी जगापुढे ठेवल्या.

अरे संसार, संसार
जसा तवा चुल्ह्यावर !!
आधी हाताला चटके
तवा मिलते भाकर !!

किंवा,

मन वढाय वढाय, उभ्या पिकातलं ढोर
किती हाकला हाकला, फिरी येतं पिकावर !!

अथवा,

मन जहरी, जहरी, त्याच न्यारं रे तंतर
आरे! इच्चू, साप बरा, त्याले उतारे मंतर !!

किंवा,

देव कुठे, देव कुठे, आभायाच्या आरपार
देव कुठे देव कुठे, तुझ्या बुबुयामाघार !!

अशा अडाणी माणसालाही सहज समजेलशा रूपकांद्वारे जीवनाचे मर्म सांगणाऱ्या बहिणाबाईंनी प्रकांड तत्त्वज्ञानाची शिकवण मराठी माणसाला दिली, परंतु बहिणाबाईंचा शासनासकट आज सगळ्यांना विसर पडला आहे, हे महाराष्ट्राचे दुर्दैव नाही का? ३ डिसेंबर १९५१ या दिवशी या महान अध्यात्मिक कवयित्रीचे निधन झाले.

Comments

Popular posts from this blog

गृहलक्ष्मी

संपादकीय