मुंबैची आठवण आली !

मिलिंद पदकी

न्यू जर्सीस्थित औषध-वैज्ञानिक. आता मेडिकल लेखक. २०१७ मध्ये मराठी काव्यसंग्रह "बदकनामा " प्रसिद्ध (ग्रंथाली, मुंबई). मराठी आणि इंग्रजीतून वैज्ञानिक आणि ललित लेखन.








 मुंबैची आठवण आली !

टाईम्स स्क्वेअर स्टेशनवरती
गर्दी फार ती झाली
मुंबैची आठवण आली!

प्रमत्त ललना शेजारी ती
यौवन-लाली गाली
मुंबैची आठवण आली !

नीटस नेसण, कानी बुगडी
आणिक टिकली भाली
मुंबैची आठवण आली!

तप्त घामट शहरामध्ये
चिल्ड बियर ती प्याली
मुंबैची आठवण आली!

बिनचेहऱ्याच्या शहरामध्ये
बिनचेहऱ्याचा मीही माणूस
आयुष्याच्या "त्या" टप्प्यावर
चक्कर परतुन झाली
मुंबैची आठवण आली (साली!)
मुंबैची आठवण आली!

Comments

Popular posts from this blog

मला आवडलेली मिरासदारी