वैदिक ज्योतिष

ऋध्दि वाडदेकर

आज आपण ज्योतिषाबद्दल थोडेसे जाणून घेणार आहोत. पहिल्या प्रथम मी सांगू इच्छिते की मी ज्योतिषी नाही. पण कोविडच्या काळात मला ज्योतिषशास्त्र शिकायची खूप आवड निर्माण झाली. त्यामुळे मी यूट्यूबवर ज्योतिष शिकायला सुरुवात केली.

वैदिक ज्योतिष फक्त साडेसाती, मंगळ ह्यापुरतेच नाही. खूप गणिते असतात. ग्रहांच्या युती, दृष्टी, अंश, कला, वगैरे बरेच काही असते. म्हणूनच प्रत्येक व्यक्तीची कुंडली वेगळी असते. शनी आपल्यापासून कितीतरी लांब आहे, मग तो आपले काय बिघडवणार आहे? हा प्रश्न स्वाभाविक आहे. पण मग सूर्य सुद्धा लांब आहे. पण सूर्याच्या किरणांमुळेच तर पृथ्वीवर जीवन आहे. चंद्राच्या कलांमुळे समुद्राची भरती ओहोटी असते. त्यामुळे बाकी ग्रहांचेसुद्धा आपल्यावर काहीतरी परिणाम होतच असणार हे माझे वैयक्तिक मत आहे. हजारो वर्षांपूर्वी आपल्या पूर्वजांनी केलेली निरीक्षणे, मांडलेली गणिते आणि सूत्रे, ग्रहांची वर्णने, पृथ्वीचा सूर्याभोवती फिरण्याचा वेग, पृथ्वीपासून सूर्याचे अंतर, इतकेच नाही तर ग्रहांचे आकार, रंग, तत्त्व, हे सर्वच शास्त्राधारित आहे. उदाहरणार्थ, गुरु हा सगळ्यात मोठा ग्रह आहे (Jupiter NASA), किंवा बुध सूर्याच्या सगळ्यात जवळ आहे (Mercury NASA), किंवा मंगळ लाल आहे (Mars NASA च्या लिंक्स अवश्य बघा). ह्या लेखात आपण खालील गोष्टींची माहिती करून घेणार आहोत. १. ग्रह, २. राशी, ३. कुंडली आणि भाव, ४. लग्न, चंद्र आणि सूर्य रास १. ग्रह : - तर आपण आता पहिल्यापासून सुरुवात करणार आहोत. वैदिक ज्योतिषशास्त्रात सात ग्रह आणि दोन ग्रहबिंदू आहेत असे मानले जाते. ते सात ग्रह आणि ग्रहबिंदू म्हणजे, ग्रह - १. सूर्य, २. चंद्र, ३. मंगळ, ४. बुध, ५. गुरु, ६. शुक्र, ७. शनी ग्रहबिंदू - १. राहू, २. केतू राहू आणि केतू हे छायाबिंदू आहेत, त्यांना भौतिक (physical) स्वरूप नाही. (लेखाच्या शेवटी ह्या संबंधित YouTube Video आहे) ह्या ग्रहांची एकमेकांशी मैत्री किंवा शत्रुता असते. गुरु हा सर्वाधिक शुभग्रह मानला जातो आणि राहू सर्वाधिक पापग्रह मानला जातो. २. राशी : - आता आपण बारा राशी बघूया. प्रत्येक राशीसाठी एक ग्रह आहे, जो त्या राशीचा स्वामी मानला जातो.

३. कुंडली आणि भाव - कुंडली अनेक प्रकारे मांडता येते इथे आपण उत्तर भारतात वापरली जाणारी कुंडली बघणार आहोत. कुंडलीमध्ये १२ घरे असतात त्यांना भाव म्हणतात.

जिथे तुम्हाला एक आकडा दिसतो आहे ते प्रथम स्थान किंवा लग्नस्थान. आता ह्या घराच्या वामावर्त (अँटीक्लॉकवाईज) सुरुवात केल्यास दोन, तीन, चार, याप्रमाणे बारा भाव असतात. प्रत्येक भाव / स्थान खालीलप्रमाणे गोष्टी दर्शवतो- 

भाव

जबाबदारी/कारकत्व 

१. लग्न/ प्रथम 

व्यक्तिमत्त्व   

२. द्वितीय 

धन/ वाणी

३. तृतीय 

पराक्रम / धाकटी भावंडे

४. चतुर्थ 

आई/ घर/ वाहने 

५. पंचम 

मुले बाळे  / शिक्षण

६. षष्ठ 

शत्रू/ रोग/ कर्ज

७. सप्तम 

नवरा/ बायको / व्यवसायातील सहकारी वा भागीदार 

८. अष्टम 

आयुष्य/ मृत्यू

९. नवम 

भाग्य

१०. दशम 

कार्यक्षेत्र (Career)/ वडील

११. एकादश 

लाभ / मोठी भावंडे / मित्र

१२. द्वादश

विदेश/ कारागृह जेल/ दवाखानेhospitals/ मोक्ष


४. चंद्र, जन्म लग्न, आणि सूर्य रास
चंद्ररास : आपण जे रोजचे भविष्य बघतो ते आपल्या चंद्र राशीप्रमाणे असते. म्हणजेच या १२ घरांपैकी चंद्र ज्या राशीत आहे ती आपली चंद्ररास. उदाहरणार्थ जर एखाद्या कुंडलीमध्ये चंद्र पाचव्या घरात असेल तर वर सांगितल्याप्रमाणे सिंह रास पाचवी असते म्हणून त्या व्यक्तीची झाली सिंह रास. जर कुंडलीमध्ये चंद्र आठव्या घरात असेल तर ती झाली वृश्चिक रास.

लग्नरास : आता आपण लग्नराशीविषयी जाणून घेऊ. खालील कुंडली मध्ये लग्नस्थानी एक आकडा आहे म्हणजेच ती आहे मेष लग्नाची कुंडली आणि चंद्ररास आहे सिंह. आता दुसरी कुंडली बघा. या कुंडलीमध्ये पहिल्या किंवा लग्न घरात आहे चार हा आकडा म्हणजेच ही आहे कर्क लग्नाची कुंडली आणि चंद्र आहे अकराव्या घरात म्हणजेच ही आहे कुंभ रास. (लेखाच्या शेवटी ह्या संबंधित YouTube Videoआहे.)

सूर्यरास: सूर्यरास म्हणजे तुमच्या पत्रिकेत सूर्य ज्या घरात आहे किंवा ज्या राशीत आहे ती रास. सर्वसाधारणपणे पाश्चिमात्य ज्योतिषशास्त्रानुसार (western astrology) जी रास असते ती सूर्यरास असते. म्हणजे तुमचा वाढदिवस ज्या महिन्यात असतो त्या महिन्यात सूर्य ज्या राशीमध्ये असतो ती सूर्यरास. उदाहरणार्थ ऑगस्ट मध्ये ज्यांचा वाढदिवस असतो त्यांची Leo म्हणजेच सिंह ही सूर्यरास असते. वैदिक ज्योतिषामध्ये थोडा वेळेचा फरक असल्याने सूर्य रास आणि western sun sign एकच असतील असे नाही, थोडे पुढे मागे होऊ शकेल.

————

वैदिक ज्योतिष चाचणी ह्या चाचणी वर क्लिक करा :- चाचणी (Clicking on this link opens a Google Form. This quiz is optional but highly recommended to test your knowledge. सोप्पी आहे , जरूर द्या ही चाचणी!.) ————

अधिक माहितीसाठी पुढील व्हिडीओ पाहा - लग्नरास, राहू आणि केतू संदर्भ : Pandit Narmadeshwar Shastri- Miracle of Astrology (Hindi): Daily predictions based on Chandra Rashi astrology lessons. This channel has a lot of good information if you want to learn astrology. Monthly Predictions based on Lagna Rashi (Hindi) Astrology lessons in English style="clear: right; float:left; margin-right: 1em;" style="clear: left; float:right; margin-left: 1em;" >

Comments

  1. Super informative going to give the test what you have asked for

    ReplyDelete
  2. उत्तम विवेचन 👌🏽👌🏽
    Nilesh Malvankar

    ReplyDelete
  3. सोप्या शब्दात छान प्राथमिक माहिती दिलीस.

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

गृहलक्ष्मी

संपादकीय