क्षणभर (शतशब्द कथा)

विदुला कोल्हटकर

दुकानात येताच त्यांची उत्साहाने हातांत हात घालून खरेदी चालू झाली.

पेरू दिसल्यावर त्याला आवडतात म्हणून घ्यायला ती पुढे झाली आणि लक्षात आलं हातातला त्याचा हात सुटला होता. ती घाबरून इकडे तिकडे बघू लागली. तो दिसेना. लक्षात येताच कावरीबावरी होऊन शोधू लागली. कुठे गेला हा? इतक्या गर्दीत आता कुठे शोधायचं? असं कसं आपण हात सोडून पुढे आलो? कुणा भलत्याचाच हात धरला काय? चुकून एकटाच दुकानाबाहेर गेला तर? हल्ली माथेफिरूही फार झाले आहेत. नेमकं आत्ताच इथे काही झालं तर? डोळे भरून आले. इतक्यात दोन्ही हात पुढे करून "आई" म्हणून हसत तो तिच्याकडेच येताना दिसला. क्षणभरात आलेली काजळी त्याच्या एका शब्दाने साफ झाली.

Comments

  1. कथा आवडली. Nilesh Malvankar

    ReplyDelete
  2. Kalpana changali aahe.

    ReplyDelete
  3. Lihit Raha.Chhan hotay!!!

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

संपादकीय

आकाश पांघरुनी जग शांत झोपले हे