संपादकीय




Mukhaprushtha

ऑक्टोबर २०२१
अंक ४


मैत्र संपादक मंडळ २०२१ 

वरदा वैद्य 

विदुला कोल्हटकर 

रोहित कोल्हटकर 

कपिल धाकड 

मधुर पुरोहित 

 

बाममं कार्यकारिणी २०२१ 

अध्यक्ष 

रोहित कोल्हटकर 

उपाध्यक्ष 

ऋद्धी आठवले वाडदेकर 

 उपाध्यक्ष- विपणन 

समीर अहिरराव पाटील 

चिटणीस 

मधुर पुरोहित 

खजिनदार 

केतन बर्डे 

सह-खजिनदार 

रवी महाजन

नमस्कार मंडळी,
आली दिवाळी मंगलदायी, आनंद झाला घरोघरी!

गणपती, नवरात्र संपले आणि दिवाळी काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. दिवाळीच्या काही दिवस आधीच मैत्रचा २०२१ वर्षातला शेवटचा अंक रसिक वाचकांच्या हातात ठेवताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे. मागील वर्षाच्या खंडानंतर ह्यावर्षी बाल्टिमोर मराठी मंडळाने मर्यादित स्वरूपात गणपती उत्सव साजरा केला, तेव्हा तुम्ही उपस्थिती लावली असेल. गणपती उत्सवाचे निवडक फोटो संपादकीयाच्या शेवटी जोडले आहेत. दिवाळीनिमित्त होणाऱ्या कार्यक्रमाची तिकीटे तुम्ही खरेदी केली असतीलच. सर्वांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा!

ह्या अंकासाठी लेखन पाठवलेल्या सर्वांचे अनेक आभार. ह्यापुढील अंकासाठीही तुम्ही लेखन पाठवत राहाल अशी आशा करतो. ह्या अंकामध्ये अनेक स्थानिकांनी पहिल्यांदाच मैत्रासाठी लेखन पाठवले आहे. त्यातून इतरांना प्रेरणा मिळून अधिकाधिक लोक लेखन करण्यासाठी उद्युक्त व्हावेत अशी आशा बाळगतो.

लेख, अनुभव, कथा, कविता अशी साहित्यिक रेलचेल ह्या अंकात आहे. पाककृतीच्या सदरांतर्गत गणपती-नवरात्रात नैवेद्यासाठी केलेल्या पाककृतींच्या आवाहनाला प्रतिसाद देणारे ‘मनातला गणपती’ आणि ‘उकडीचे मोदक’ हे लेखही ह्या अंकात वाचा. मराठी कला मंडळाचे ‘हितगुज’ आणि आपल्या ‘मैत्र’दरम्यान साहित्यिक देवाणघेवाणीची परंपरा आहे. मैत्रच्या ह्या अंकामध्ये सुनील खाडिलकर ह्यांनी हितगुज मासिकाच्या होळी अंकातला एक विनोदी लेख पुनर्प्रकाशित करत आहोत.

भारतीय सणांसोबत आपण इथले सणही साजरे करत असतो. थॅन्कगिव्हिंग, ख्रिसमस आणि नवीन वर्षाचे स्वागत तुम्ही कसे करता? त्यावेळी भारतीय पद्धतीचे पदार्थ करता की अमेरिकी/पाश्चात्य पदार्थ करता? थॅन्कगिव्हिंग आणि ख्रिसमससाठी तुम्ही करत असलेलया पदार्थांच्या अनोख्या पाककृती, त्या करतानाच्या आठवणी आणि अर्थातच त्यांचे फोटो आम्हाला जरूर पाठवा. पदार्थ खास होण्यासाठीचे तुमचे नुस्खेही लिहायला विसरू नका. तुम्ही एखादी कला जोपासत असाल तर कलाकार ओळख सदारांतर्गत तुमची माहिती आम्हाला पाठवा. येत्या हिवाळी सुट्ट्यांमध्ये प्रवासाचे बेत तुम्ही आखले असतील तर तुमचे प्रवासवर्णन आम्हाला लिहून पाठवा. शिवाय नेहमीप्रमाणे कथा, कविता, अनुभव, लेख आणि चित्रांचेही स्वागत आहेच. पुढील अंकासाठीचे साहित्य १५ जानेवारीपर्यंत editor@baltimoremarathimandal.org ह्या पत्त्यावर पाठवा.

ऑगस्टमध्ये शाळा सुरू झाल्या आणि त्या अजूनही चालू आहेत. अनेक मुले सुमारे दीड वर्षांच्या ऑनलाईन शिक्षणाच्या अनुभवानंतर शाळेत प्रत्यक्ष जाऊ लागली आहेत, मित्र-मैत्रिणींना, शिक्षक-शिक्षिकांना प्रत्यक्ष भेटत आहेत. आपल्यापैकी अनेक पुन्हा ऑफिसात जाऊ लागले असतील, कार्यालयीन सहकाऱ्यांना प्रत्यक्ष भेटले असतील. मुलांचा, तुमचा शाळा-ऑफिसच्या पुनर्भेटीचा अनुभव कसा होता ते आम्हाला नक्की लिहून कळवा.

येणारी दिवाळी आणि नवे वर्ष सर्वांना आरोग्यपूर्ण, सुखसमृद्धीचे आणि समाधानाचे जावो ह्या सदिच्छा !

कळावे,
संपादक मंडळ

मुखपृष्ठ:
विठ्ठल मंदिर

फोटो: शर्मिली सिन्नरकर-कुलकर्णी



गणपती उत्सवाचे फोटो पाहण्यासाठीची लिंक 

२०२१ बाममं गणपती उत्सव फोटो 


गणपती उत्सवाचे निवडक फोटो


Comments

Popular posts from this blog

गाईड

कोविड विषाणू : नवा ‘ओमायक्रॉन’ व्हेरियंट