"एक अगम्य लालसा आणि पाच डॉलर्स"

मिलिंद पदकी

न्यू जर्सीस्थित औषध-वैज्ञानिक. आता मेडिकल लेखक. २०१७ मध्ये मराठी काव्यसंग्रह "बदकनामा " प्रसिद्ध (ग्रंथाली, मुंबई). मराठी आणि इंग्रजीतून वैज्ञानिक आणि ललित लेखन. सध्या प्रामुख्याने ‘कोव्हिड’विषयक लेखनावर भर.

सूर्याचे ऊन्ह वाढत चालले होते. मॉल चमकत होता.

तिच्या डोळ्यातल्या प्रश्नाला मी म्हटले
"नाही बाई, (तुझ्या संमतीशिवाय)
मी ‘भलतेच काही’ करणार नाही." गर्दीच्या
कॉफी शॉपमध्ये नाहीतरी हा काय करू शकतो असा
विचार करून तिने होकार दिला. माझ्या
खिशातली लाल कवितांची डायरी तिला खुणावत असावी.
(युरोपातील श्रीमंत स्त्रिया
कवीचेही कॉफी -बिल स्वतःच देत!).
ऑफिसातून चालत चालत पलीकडच्या कॉफीशॉप कडे
आम्हा दोघांना जाताना पाहून
मोठा कुजबुजाट झाला.
मला येताना पाहून लिफ्टचे दारही उघडे न ठेवणाऱ्या
दुष्ट स्त्रियांबद्दलची माझी कविता
तिला विशेष आवडली. गाडीत बसताना तिने
रोचक कालव्ययासाठी माझे आभार मानले व
डोके खाजवीत घरी गेली.
हे पाच डॉलर्स वाया गेले किंवा कसे?
तुम्हीच सांगा!


Comments

Popular posts from this blog

गाईड