जिममध्ये जावेच लागेल!

मिलिंद पदकी

न्यू जर्सीस्थित औषध-वैज्ञानिक. आता मेडिकल लेखक. २०१७ मध्ये मराठी काव्यसंग्रह "बदकनामा " प्रसिद्ध (ग्रंथाली, मुंबई). मराठी आणि इंग्रजीतून वैज्ञानिक आणि ललित लेखन. सध्या प्रामुख्याने ‘कोव्हिड’विषयक लेखनावर भर.







 जिममध्ये जावेच लागेल!

संध्याकाळ, पाऊस पडतो
पश्चिमेला सूर्य रडतो
"आज नको, दुखतात पाय!"
नाटके नाहीत चालणार, काय?
कपाटातले ‘नायकी’ बूट
आणि चढव जॉगिंग सूट
- जिममध्ये जावेच लागेल!

एक काळी, एक गोरी
शिग्रेट पितात लठ्ठ पोरी
त्यांना नकोस मारू डोळा
करतील तुझा चोळामोळा
मान खाली, हलकेच "हाय!"
म्हणत म्हणत खसकुन जाय,
- जिममध्ये जावेच लागेल!

प्रकाशमान हे टॉर्चर चेंबर
निष्ठेने ते कण्हती मेम्बर
टेस्टोस्टेरॉन-कोटेड नळ्या
सपाट पोटे, नाहीत वळ्या
निसर्गाने दिलेत स्नायू
रगड त्यांना, वाढेल आयु
(कामेच्छाही तुझी जागेल!)
- जिममध्ये जावेच लागेल!


Comments

Popular posts from this blog

संपादकीय

आकाश पांघरुनी जग शांत झोपले हे