नवे सदर - चित्रसाहित्य

शाळेत असताना इयत्ता चौथी आणि सातवीच्या शिष्यवृत्ती परीक्षांना तुम्ही बसला होता का? त्यावेळी भाषा, गणित आणि बुद्धिमत्ता चाचणी अशा तीन भागांत ह्या परीक्षा होत असत.

चौथीच्या शिष्यवृत्ती परीक्षेच्या भाषा विभागात चित्रवर्णनाचा प्रश्न असे. एखादे चित्र दिले जाई आणि विद्यार्थ्यांनी त्या चित्राचे वर्णन लिहिणे अपेक्षित असे. हे वाचून तुम्ही भूतकाळात गेला असाल. त्या चित्रवर्णनाच्या धर्तीवर ‘चित्रसाहित्य’ हे नवे सदर सुरु करत आहोत. सोबत चार छायाचित्रे दिली आहेत. त्यातील एक वा जास्त चित्रांवरून सुचलेले विचारसाहित्य तुम्ही आम्हाला लिहून कळवायचे आहे. हे विचार शब्दांत उतरवताना साहित्यप्रकाराचे बंधन नाही. कविता, वैचारिक/ ललित/माहितीपर लेख, अनुभव, स्थलवर्णन, स्फुट विचार, दीर्घ/लघु/भय/रूपक कथा वगैरे कोणत्याही साहित्य प्रकाराचे स्वागत आहे. ह्या नव्या उपक्रमाला तुम्ही भरभरून प्रतिसाद द्याल

छायाचित्रकार- चित्तरंजन भट


छायाचित्रकार- विदुला कोल्हटकर
चित्रकार - देवेंद्र धाकड
छायाचित्रकार- चित्तरंजन भट


Comments

Popular posts from this blog

गृहलक्ष्मी

संपादकीय