भाषाविचार – शाब्दिक कोडे

'ण' ह्या अक्षराने संपणारे तीन अक्षरी शब्द ओळखा

१. अंशु, रश्मी
२. भातावर वाढतात ते तुरीच्या डाळीचे कालवण
३. सोपा नसलेला, अवघड
४. घराभोवती घालतात ते
५. करंजीत, पराठ्यात भरतात ते
६. स्थळ, जागा
७. कर्ज काढताना हमीबद्दल, विश्वासादाखल ठेवण्याची वस्तू
८. भोजन, खाणे
९. कार्योत्पादक, निमित्त
१०. पाय, पद
११. स्मृति, आठवण
१२. गुरांच्या चरण्याचे ठिकाण
१३. होळीसाठीच्या पक्वांनात पोळीत भारतात ते
१४. एका भारतीय महिन्याचे नाव
१५. एक भाजीचा कंद
१६. सखी
१७. तीन कोन असलेली आकृती
१८. कडधान्याचा कट, कडधान्य शिजवलेलें पाणी
१९. एक चावणारा कीटक
२०. एक बिनविषारी साप
२१. प्रत्येक सजीवांचा शेवट
२२. कमरेंत किंवा पाठींत उठणारी कळ
२३. सजावटीसाठी दारावर लावण्याची वस्तू
२४. समुद्र हटून मिळालेली खारी जमीन
२५. (अक्षर, अवयव इत्यादींच्या) आकारभेदाचे प्रकार, तऱ्हा, वागण्याची रीत
२६. डब्याचे आच्छादन
२७. पेनाचे आच्छादन, खोटे/घेतलेले नाव
२८. धाटणी, बांधा, ढब
२९. रत्ने बनवण्यासाठी केलेले घर, बैठक
३०. भटकणे, फिरणे, भ्रांती पडणे
३१. पाणी/धान्य भरण्याचे मोठे माती/धातूचे भांडे
३२. मीठ, क्षार
३३. जबरदतीने लुटणे, निवारण, दूर करणे
३४. झीज/आवाज कमी करण्यासाठी घातलेले तेल
३५. गुरांसाठीचा चारा
३६. पायांतील चाळ, छुमछुम

(उत्तरे - १. किरण २. वरण ३. कठीण ४. कुंपण ५. सारण ६. ठिकाण ७. तारण ८. जेवण ९. कारण १०. चरण ११. स्मरण १२. कुरण १३. पुरण १४. श्रावण १५. सुरण १६. मैत्रीण १७. त्रिकोण १८. कढण/कळण १९. ढेकूण २०. धामण २१. मरण २२. उसण २३. तोरण २४. खाजण २५. वळण २६. झाकण २७. टोपण २८. ठेवण २९. कोंदण ३०. भ्रमण ३१. रांजण ३२. लवण ३४. वंगण ३५. वैरण ३६. पैंजण )

Comments

Popular posts from this blog

संपादकीय

आकाश पांघरुनी जग शांत झोपले हे