संध्या का सकाळ?

अरुंधती सरपटवारी

संध्या का सकाळ?

पिवळी तांबडी क्षितिजावरून डोकावणारी किरणं
माझ्याकडे पाहून त्याचे हसणे
ओल्या मातीचा हा पसरलेला सुगंध
गार गार वाऱ्याचा मोहक सुगंध
दूरवर दिसणाऱ्या पक्ष्यांच्या उडत्या रांगा
जणू पर्वतांबरोबर करींत आहेत दंगा
भिरभिरता प्रश्न उठतो, म्हणतो कलकलून
ही कोण आहे, संध्या का सकाळ?

रंगले होते जीवनाच्या सारीपाटी
कळलेच नाही कधी सकाळ, दुपार पालटली?
प्रश्न म्हणे उत्तर सोपे, ही तर तुझी मावळती "संध्या...."
एका नंतर एक डाव मांडिला
मातृत्व, जबाबदारी आणि कर्तव्याचा
दान देता देता एका मागोमाग एक जिंकिला
मग मांडिला डाव शेवटचा
कलाकृती, गायन आदि छंदांचा
प्रश्नालाच प्रश्न पडला?

कां मी पडलो या संध्या आणि सकाळच्या फंदी?
हळूच कानात म्हणतो कसा, “आहे ही उगवती सकाळच तुझी साधून संधी"


Comments

Popular posts from this blog

गृहलक्ष्मी

संपादकीय