अभागिनी

चित्रा धाकड

हा लेख साधारण ८०-१०० वर्षांपूर्वील सामाजिक परिस्थिती, त्या परिस्थितीशी जुळवून घेणाऱ्या अनेक स्त्रिया यांच्या जीवनावर आधारित आहे. या घटनेतील पात्र मेरीलँड स्थित लेखिका चित्रा धाकड यांच्या आत्या कै. गं. भा. कलाताई ताराचंद धाकड-वाणी (१९3१-२०१७) यांच्या जीवनातील सत्य घटनांवर आधारित आहे.

कै. गं. भा. कलाताई
ताराचंद धाकड-वाणी

जगी ज्यास कोणी नाही त्यास देव आहे!
निराधार आभाळाचा तोच भार साहे !!    

गीत म्हणायला सोपे आहे. पण अनुभवण्यासाठी ते खूप कठीण आहे. जो निराधार असतो तोच दुसऱ्याला आधार देतो. काळजी घेतो, प्रेम देतो.

अशीच एक बालिका दिसायला सुंदर होती. कर्तृत्ववान, स्वाभिमानी व हुशार होती. लहानपणापासूनच ती पेटीवर गाणे म्हणत असे. तिचा आवाज चांगला होता. भविष्यात ती मोठी गायिकाही झाली असती. सातवी पास झाली. पुढे शिकण्याची आवड होती, पण तिच्या मनासारखे घडले नाही. तिचे स्वप्न अपूर्ण राहिले. तारुण्यात प्रवेश करण्याअगोदर वयाच्या चौदाव्या वर्षी इ. स. १९४५ मध्ये ती विवाहबद्ध झाली. चूल, मूल व संसार यात रमून गेली. तेव्हाच्या नऊवार साडीतली मुलगी होती ती! एवढ्या साडीचा भार सांभाळणे, डोक्यावर पदर व मानमर्यादा ठेवून सर्व काम म्हणजे तारेवरची कसरत! सुखाचा संसार चालू होता. त्यात दोन-तीन वर्षांत घरात पाळणा हलला व तिने एका गोंडस, गोजिरवाण्या बाळाला जन्म दिला. खूप कोडकौतुक झाले त्याचे! वर्षभरात घरात त्याची पावले दुडूदुडू धावू लागली. धावताना त्याच्या वाळ्याच्या घुंगरांचा छुमछुम आवाज येई. त्याचे कुरळे केस, हसताना गालाला पडणारी खळी, निरागस हास्य, सर्वांचे लक्ष वेधून घेई. खूप दिवसांनी त्या घरात बोबडे बोल ऐकू येऊ लागले. बाळ सर्वांचा जीव की प्राण होता.

पण का कुणास ठाऊक, लवकरच त्या सुखी संसाराला कुणाची तरी दृष्ट लागली. बाळाला एके दिवशी सकाळी थोडा ताप आला होता. गावातील वैद्य आले. नाडी तपासली, मधातून चाटण दिले व 'होईल चांगला' म्हणून निघून गेले. तो अंगणात खाटेवर खेळत होता, चांदणे बघत होता. ताऱ्यांशी, चांदण्यांशी जणू गोष्टी करत होता. काय झाले व काय घडत आहे हे कळण्याआधी काळाने त्याला आपल्या मिठीत ओढून घेतले. एक-दीड वर्षाचा असतांनाच त्याच्या आयुष्याची दोरी तुटली. नियती असे क्रूर वागेल असे वाटले नव्हते. धावपळ करूनही जे व्हायचे तेच झाले. बाळ आपल्यातून निघून गेला होता. फार थोड्या दिवसांसाठी घराला आनंद देऊन गेला व त्या घरावर दुःखाची छाया आली. ते घर आता उदास व रिते वाटू लागले. काय त्या माऊलीची अवस्था झाली असेल त्या वेळी! क्षणभर तिला डोळ्यांसमोर अंधार दिसू लागला. ती शून्यात नजर लावून बसे! तिला आशा होती की बाळ उठेल, तिला हाक मारेल, ती बाळाला तीट-काजळ लावेल, अंगाई गीत गाईल. कुठे शोधणार ती बाळाला? आई म्हणून हाक आता ऐकू येणार नव्हती. स्वप्नात तिला बाळ दिसे. भास होता हा सगळा!

दिवसांमागून दिवस जात होते. दुःख सावरून ती मनाला आधार देत होती. भगवंताने स्त्रीला मनाने कोमल, हळवे बनविले तितकेच कठीण प्रसंगात धैर्याने संकटाला सामोरे जाण्याची ताकद दिली. दैवाच्या मनात वेगळाच डाव होता. ज्याच्या जिवावर ती हे दुःख विसरण्याचा प्रयत्न करत होती तो तिचा जिवलग सखा (प्राणनाथ) एक-दीड वर्षात हे जग सोडून निघून गेला. जो होता तोही आधार गेला आणि ती पूर्णपणे खचून गेली. जगण्यात आनंद नव्हता. त्या काळात पुनर्विवाह होत नव्हते. मनाला धीर दिला तिने, “मला जगायचे आहे. माझे दोन भाऊ नोकरी साठी दूर आहेत तर मी त्यांची जागा घेईन. म्हाताऱ्या आईवडिलांची काठी मी होईन.” पूर्वी सातवी म्हणजे फायनल परीक्षा पास झाल्यावर शिक्षिकेची नोकरी मिळत असे. ती ऑर्डर हातात पडल्यावर सासरच्यांनी नकार दिला की नवरा मेल्यावर तिने खुर्चीवर बसलेले चालणार नाही! दुसरी कामे आहेत भरपूर! पुन्हा ती अभागिनी नाराज झाली. हिंमत धरली व प्रताप मिल्स, अंमळनेर येथे कामगार म्हणून कामाला लागली.

एके काळी ती गिरणी त्या गावाचे वैभव होती. हजारो मजुरांना तिथे काम मिळत असे. दरवर्षी गणपती बसत, दहा दिवस वेगवेगळे कार्यक्रम होत. मोठमोठे कलाकार तिथे येत. अशा गिरणीमध्ये भाच्या तिला डबा द्यायला यायच्या. सुटीच्या दिवशी ती भाच्यांना संपूर्ण गिरणी दाखवायची. सकाळी सहा ते दुपारी चार - दहा तास ती काम करत असे. तेथील फिरणाऱ्या लोखंडी मशीनबरोबर तिचे हात कामाला लागत. दोऱ्याची मोठी रिळे बनवण्याचे तिचे काम होते. ती धागे जोडत असे. श्रेष्ठ कवी ग. दि. माडगूळकर यांच्या गीताप्रमाणे ती आयुष्याचे वस्त्र विणत असे.

एक धागा सुखाचा, शंभर धागे दुःखाचे! जरतारी हे वस्त्र माणसा .. तुझिया आयुष्याचे!! नंतर तिने आईवडिलांना बोलावून घेतले. भाचा-भाची याना सांभाळून त्यांची लग्नकार्ये पार पाडली. भाच्या जशा मुलीच होत्या तिच्या! दर आठवड्याला ती त्यांचे केस धुऊन, तेल लावून देत असे. गिरणीच्या कॅन्टिनमधून खाऊ आणे. आईवडिलांना तिने तीर्थयात्रेला पाठवले व नंतर स्वतःही चारधाम फिरून आली. कुठेही गिरणीची सहल निघाली की ती जाई. एकदा दिल्लीला संसदभवनात माननीय पंतप्रधान श्रीमती इंदिरा गांधी जवळून भेटल्या तेव्हाचा आनंद तिने विसरणे शक्यच नव्हते. निराधार असून तिचे घर गोकुळासारखे भरलेले असे. घरात येणाऱ्याजाणाऱ्यांची नेहमी वर्दळ असे. कोणत्याच गोष्टीची उणीव नव्हती. थकून-भागून आल्यानंतरही ती दोन मैल पायी धान्य किराणा आणायला जाई व त्या पिशव्या डोक्यावर घेऊन येई.

भाऊ नोकरीनिमित्त दूर होते, पण त्यांचा परिवार ती सांभाळे. भावांना तिने शेवट पर्यंत सहारा दिला. मोठया भावाला मुलाच्या आशेने पाठोपाठ सात मुली झाल्या तर ती सांगे, "मुलींचा कंटाळा करू नाव, तुम्हाला नको असतील तर मी सांभाळेन त्यांना! सुखदुःखाला त्याच कामाला येतील. चिमण्यांसारख्या उडून जातील." तिने भाच्यालाही मुलाप्रमाणे सांभाळले. एकत्र कुटुंबात ती स्वतःचे दुःख कधीच जाणवूं देत नसे. सर्वांची जाणीव होती तिला!

शेवटी घर रिकामे होत गेले. आई-वडील गेले. भाच्या सासरी गेल्या. जोपर्यंत हाताने कामे करता आली तोवर केली. भाऊबहीण एकमेकांचा आधार होते. तिची स्मरणशक्ती मरेपर्यंत खूप चांगली होती. संगणकचं होता तो! दात शेवटपर्यंत मजबूत होते. चष्मा कधी लागला नाही.
ती आयुष्याची ८९ वर्ष पूर्ण करून वडीलांच्याच निवासस्थानी एकेकाला रवाना करून ती पण २०१७मध्ये हे जग सोडून गेली. फक्त तीन-चार महिने अंथरूण धरले. चालताबोलता गेली. शेवटपर्यंत कडक बोल होते तिचे! सर्वाना आशीवार्द देऊन गेली. आयुष्य कसे जगावे, कसे झिजवावे त्याची शिकवण दिली. वंशाला दिवा नसतांना सुद्धा तिच्या अंत्ययात्रेला गर्दी मावत नव्हती.

तिच्यासाठी अभगिनी, निराधार हे शब्दप्रयोग योग्य वाटत नाहीत. पूर्वी विधवा स्त्रीच्या नावाआधी गं. भा. लावत, म्हणजे गंगा भागीरथी. नदीप्रमाणे तिचे आयुष्य खळखळ वाहणारे, निर्मल, शुद्ध व स्वच्छ होते. सुखदुःखाशी सामना करत ती पुढे पुढे जात होती. “जीवन हे अनमोल आहे. चौऱ्यांशीलाख योनी फिरतो तेव्हा हा मनुष्य जन्म मिळतो. त्याचे सार्थक करा,” ही शिकवण होती तिची! खूप शिकायला मिळाले तिच्याकडून! म्हणून ती एक आदर्श गुरु होती. काय काय उपमा द्याव्यात तेच कळत नाही. अशा गुरुरूपी आत्याच्या आत्म्याला शतशः प्रणाम!

टीप: लेखातील दोन्ही डिजिटल चित्रे देवेंद्र धाकड यांनी काढली आहेत. अधिक माहितीसाठी पाहा: https://devendra.blog

Comments

  1. Replies
    1. Very nice and real drafting of life. This inspires us how to behave, how to bold and how to face real problems of life. Bhavpurna shradhanjali to Kalavti Aaji.

      🏏 LSG vs RCB, 43RD MATCH
      Starts at 7:30 pm

      Download Hi Hello today and find your 'Perfect Match' based on your interests! bit.ly/HiHelloDatingApp

      Delete
  2. चित्रा ताई 🙏
    खूप छान आठवणी जागृत केल्यात. आम्ही आत्याच्या प्रेमा पोटी दर दोन - तीन दिवसाला भेटायला यायचो.मला ही खूप आठवणी येतात.खूप मिस करतो.आपल्या सगळ्यांना. आज या निमित्ताने का होईना भेट झाली.
    आपला....महेश बी.धाकड.पुणे

    ReplyDelete
  3. Junya aathvni part aathun dilyat khup chan tai

    ReplyDelete
  4. खुप सुंदर आठवणी आहेत या!
    आजी ने सगळ्यांनाच खूप प्रेम लावले होते.
    छान लिहिले मावशी तू 👌

    ReplyDelete
  5. Far chan lihalay kaku 👏

    ReplyDelete
  6. मावशी आजीचा जीवनप्रवास खुप छान शब्दात मांडला आहेस.

    ReplyDelete
  7. ताई जय योगेश्वर!
    अतिशय छान आठवणी लिहिल्या आहेत.
    मला सुध्दा आठवते की मी एकदा कपील भाऊ सोबत अमलनेर येथे गेलो होतो तेव्हा आजीनां भेटायला योग आला होता, आजी म्हणजे अतिशय मन मिळाऊ स्वभावाच्या, आपुलकीने विचार-पूस करणा-या अश्या त्या आपल्या आजी .

    ReplyDelete
  8. 🙏 Very Nice Story. OLD IS GOLD #vichardhan

    ReplyDelete
  9. जुन्या आठवणींना उजाळा दिल्याबद्दल धन्यवाद.
    आम्ही लहानपणी अंमळनेर येथे वडिलांच्या आजोळी (म्हणजेच गोकुळ आजीचे माहेर) येऊन खुप धमाल मस्ती करायचो यानिमित्त आण्णा बाबा- आजी , नाना बाबा, गोकुळ आजी , प्रभा आजी, बबन आजी ह्या सर्वांच्या आठवणी जागृत झाल्या.🙏

    ReplyDelete
  10. जुन्या आठवणींना उजाळा दिल्याबद्दल धन्यवाद.
    आम्ही लहानपणी अंमळनेर येथे वडिलांच्या आजोळी (म्हणजेच गोकुळ आजीचे माहेर) येऊन खुप धमाल मस्ती करायचो यानिमित्त आण्णा बाबा- आजी , नाना बाबा, गोकुळ आजी , प्रभा आजी, बबन आजी ह्या सर्वांच्या आठवणी जागृत झाल्या. 🙏

    ReplyDelete
  11. Very nice and drafting of real life. It inspires us hoe to behave, how to be bold and how to face problems of real life. Bhavpurn shradhanjali.

    ReplyDelete
  12. Khup Chaan Vastav

    ReplyDelete
  13. Chitra Tai tu ha lekh kup chan lihila. Tya nimityani junya athavani jagya zalya.

    ReplyDelete
  14. मामी खूप छान शब्दात तुम्ही आत्यांचा जीवन पट मांडला आहे अतिशय कठीण परिस्थितीत पण शेवट पर्यंत त्यांनी सगळ्यांना प़ेम दिले

    ReplyDelete
  15. मावशी तुम्ही खूपच छान लिखाण करता

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

गृहलक्ष्मी

संपादकीय