चित्रसाहित्य - माझे पहिले दुकान

राघव महाजन

नमस्कार, मी वेदांश पटेल. मार्च १२, २०१३ च्या दिवशी मी माझं पहिलं दुकान चालू केलं. माझ्या दुकानाचं नाव ‘पटेल बाजार’ ठरवलं. त्या दिवशी मला खूप चांगलं वाटलं, कारण आता माझं एक दुकान आहे आणि मी पैसे कमवू शकतो.

पहिल्या दिवशी काहीच ग्राहक नाही आले. पण दुसऱ्या दिवशी काही ग्राहक आले आणि ते बघून मला खूप आनंदी वाटलं. माझं हे पहिले दुकान कोकणामध्ये होतं. हळूहळू दुकान वाढत गेलं आणि ते बघून किराणा गोष्टींबरोबर कपडे आणि भांडी पण ठेवायला सुरुवात केली.

किराणा सामान सगळे ३० रुपये /पौंड होते. कुर्त्यांची किंमत ३०० रुपये होती आणि साडीची किंमत ४३० रुपये होती. दुकानातला प्रत्येक कामगार महिन्याला ५०० रुपये मिळवतो. माझं दुकान वाढत गेल्यानंतर मी दुकान पुणे शहरात सुरू केलं. पुणे शहरात माझं दुकान सरकवल्याने मी अजून खूप पैसे कमावले.

मार्च १२, २०१४च्या वाढदिवसाच्या दिवशी पारनेरन बागेत एक पार्टी ठरवली होती. माझा विश्वास बसत नव्हता की माझं दुकान उघडून ऑलरेडी एक वर्ष झालंय. माझ्या दुकानाचा पहिल्या वाढदिवसाच्या आधी एक कामगारने मला सांगितलं की तो त्याच्या मित्रांबरोबर एका आठवड्यासाठी एका सहलीवर जातो आहे. मला त्याने जायला नको होतं कारण बागेत एक पार्टी ठरवली आहे.

एकदा मी पुण्याच्या रस्त्यावर चालत होतो. एक माणूस माझ्या जवळ आला आणि विचारलं, “तू पटेल बाजाराचा मालक आहेस का?”

“हो, मी तुमच्यासाठी काय करू शकतो?”

“माझं नाव आदित्य जोशी आणि मी तुझं खूप कौतुक करतो. मला एका पार्टीसाठी ५ तारखेपर्यंत १० कुर्ते, १० साड्या, एक झाडू आणि १० पौंड प्रत्येक भाज्यांची ऑर्डर द्यायची आहे.”

आश्चर्य वाटून मी म्हणालो, “ हो, चालेल. पण मला तुझा फोन नंबर पाहिजे.”

“खूप खूप धन्यवाद!”

५ तारखेला आदित्य जोशी माझ्या दुकानाला आला आणि त्यांची ऑर्डर घेऊन जायला निघाला. तो दारापाशी पोचल्यावर मी म्हणालो, “आदित्य थांब! मला तुला काही विचारायचे आहे. पुढच्या रविवारी माझ्या दुकानाचा पाहिला वाढदिवस आहे. आणि ३ वाजता पायनेरन बागेत आहे. तू येणार?”

“अवश्य येईन!”, आदित्य उत्साहाने म्हणाला.

Comments