हवा

योगेश सावंत

राहणार डोंबिवली.

अर्थशास्त्रात पदवीधर, सध्या खासगी कंपनीमध्ये काम करतात, कविता वाचण्याचा आणि लिहिण्याचा छंद.

हवा

श्वास घेताना मी घेतो इथली हवा, तिथली हवा, पृथ्वीची हवा, झाडांची हवा
हक्काने घेतो आईने पहिला श्वास घेताना आपल्या लेकरांसाठी उत्सर्जित केलेली हवा
जी हवा अमृत होऊन पसरलीय सगळीकडे
झाडावर, डोंगरावर, पाण्यावर आणि पाण्याच्या आतसुद्धा
ती हवा फक्त शरीरभर भिरभिरत राहते पण खोल उतरत नाही
माझ्या आत्म्याला जागृत करण्याचा तिच्यात ध्यास नाही
स्वप्नांच्या फुटक्या प्रतिबिंबात अस्तित्व शोधत हरवलेला माझा आत्मा
आतमध्येच मरत चाललाय
सुख-दुःख, आपले-परके, गरिबी- श्रीमंतीच्या अनाकलनीय मखमली घावांनी बद्ध झालेल्या
माझ्या आत्म्याने मनाशी कधीच फारकत घेतलीय
हे हवे, तू तरी जा तिथे आणि जिवंत कर मला
नाहीतर सोडून देऊन साथ माझी आणि मुक्त कर त्याला


Comments

Popular posts from this blog

गाईड

पौराणिक कथा - भाग २ - अष्टवसूंची कथा