वस्तूंचे बंड

मिलिंद पदकी

न्यू जर्सीस्थित औषध-वैज्ञानिक. आता मेडिकल लेखक. २०१७ मध्ये मराठी काव्यसंग्रह "बदकनामा " प्रसिद्ध (ग्रंथाली, मुंबई). मराठी आणि इंग्रजीतून वैज्ञानिक आणि ललित लेखन.








 वस्तूंचे बंड

विचित्र भुतेरी हट्टाने
शेल्फातल्या वस्तू
टेबलावर उतरतात
सरकत सरकत
गादीवर चढतात
सोफ्यावर सफरचंद
खुर्चीवर जुने अंक
टीव्हीवर केळे
कसे काय?

माझ्या घरात आता (म्हणे)
तीस हजार वस्तू आहेत.
टाकायला गेले तर
दिलेले तीन डॉलर्स
खुणावतात, म्हणतात
आमच्यासाठी केलेले कष्ट
विसरू नकोस.

टुमदार घरात
टापटिपीने राहण्याचे
हात घातला की
चष्मा मिळण्याचे
माझे जुने स्वप्न
वेगाने विरत चालले आहे !


Comments