कविता - धुक्यातले पैसे

शांता शेळकेंच्या ‘धुक्याची माणसे’ ह्या कवितेवर आधारित विडंबन "धुक्यातले पैसे" (शांता शेळके यांची मूळ कविता खाली दिलेली आहे)

धुक्यातले पैसे

Stocksमध्ये मिळालेले पैसे बॅंकेतच दिसतात
दिसतात न दिसतात बॅंकेतच मिटतात

पैसेच पैसे खालीवर
दरम्यान हेलकावत असतात शेअर बाजाराचे कल
गुंतवणूकदार नजर ठेऊन असतात रात्रंदिवस
असा आलेख तसा आलेख, विश्लेषणांत लागतो बुद्धीचा कस

पैसे हलतात, पैसे उसळत राहतात
बँकेतील खात्यांचे आकडे, खात्यांतील व्यवहार वाढतात
गुंतवणुकदार अपेक्षा फुगवत जातात
नफ्याचे फक्त आभास खात्यात वाढवतात
बचतीची रक्कमही शेवटी आभासात विरते
खाते राहते पूर्ण रिते

तात्पर्यः Stocksमध्ये झालेला नफा वेळच्यावेळी काढून घ्या

***************************
शांता शेळके यांची मूळ कविता

धुक्याची माणसे
धुक्याची माणसे धुक्यात भेटतात
दिसतात न दिसतात धुक्यातच मिटतात

धुकेच धुके मागेपुढे, खालीवर,
दरम्यान हेलकावत असतात धुक्याचे दाट थर,
धुक्याची माणसे बोलतात जिवाच्या आकांताने,
करतात हातवारे कासावीस होऊन, थरथरतात भयाने.

धुके हलते, धुके उसळत राहते,
धुक्याच्या लाटा, धुक्याचेच वारे वाहते,
धुक्याची माणसे हात पुढे करतात
बोटांच्या फटीत फक्त धुकेच धरतात
शब्दांचेही बनते धुके
मनातले उत्कट आशय राहतात मुके

रोहित कोल्हटकर

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

गृहलक्ष्मी

संपादकीय