हार्ट अटॅकची कविता

मिलिंद पदकी

न्यू जर्सीस्थित औषध-वैज्ञानिक. आता मेडिकल लेखक. २०१७ मध्ये मराठी काव्यसंग्रह "बदकनामा " प्रसिद्ध (ग्रंथाली, मुंबई). मराठी आणि इंग्रजीतून वैज्ञानिक आणि ललित लेखन.








 हार्ट अटॅकची कविता

माझ्या हृदय-स्नायूंना/ पडे रक्त जरा कमी

करे जोरात तक्रार / नाही आयुष्याची हमी

आला अटॅक अटॅक / छातीमध्ये दुखतसे

मर्त्य देह गाडीमध्ये / पत्नी वेगाने जातसे

आला अटॅक अटॅक/ घाला रोहिणीत फुगा

अडलेल्या प्रवाहाची / करा मोकळी ती जागा

पुढे पंचवीस वर्षे / म्हाताऱ्याला जगविण्या

नळी धातूचीही लावा/ नवा स्टेण्ट तो देखणा

अकराच मिनिटांत / नवे आयुष्य लाभले

बोट घालिती तोंडात/ विशारद भले-भले

झाली सर्जरी ती पुरी / डॉक्टर मारीतसे डोळा

काम त्याचे बघण्यास / नवे डॉक्टरही गोळा

भरा पिशवी आणिक/ चला सुटा घराकडे

होता प्रॉब्लेम छोटासा / स्तोम नको ते एव्हढे.

Comments

Popular posts from this blog

गृहलक्ष्मी

संपादकीय