भाषाविचार - शब्दकोडे

वरदा वैद्य

भाषाविचार - शब्दकोडे: ळ’ अक्षराने संपणारे चार वा पाच अक्षरी शब्द ओळखा. 

(उत्तरे अंकात इतरत्र दिलेली आहेत.)

१. वेणी वा आंबाडा घालताना केसांच्या टोकाला बांधायचा लोकरीचा तुकडा वा दोरी
२. बारीक-सारीक
३. काळजी, आस्था
४. नापीक, उंचसखल, ओबडधोबड जमीन
५. मोठा गोंधळ, गहजब
६. अडाणी, शहरी रीतीरिवाजाबाबतीत अनभिज्ञ मनुष्य
७. सर्वत्र गवत वाढलेली जमीन/प्रदेश
८. हिरवा साप, हरवेल
९. विंचरताना बाहेर निघालेले केस
१०. हालचाल, समाजात उत्पन्न केलेली जागृती
११. दंगल वा हल्ल्यामध्ये गोष्टी/जमीन जाळणे
१२. उग्र वास
१३. थकवा, आळस
१४. सूर्यकिरणांच्या परावर्तनाने होणारा जलाचा भास
१५. तापट, भडकलेल्या डोक्याचा मनुष्य
१६. भोपळावर्गीय वेलीवर उगवणारी लांबट आकाराची हिरवी फळभाजी
१७. भिंतीतील कपाट
१८. झाडांची पाने झडण्याचा काळ
१९. विमानात चढण्या-उतरण्याचे, विमाने उतरवणे वा उड्डाण करण्याचे ठिकाण
२०. दुपारनंतर रात्रीपूर्वीचा काळ
२१. अस्वस्थता, काळजी, हुरहूर
२२. बाजारी संप, पिवळे विषारी द्रव्य लावणे/खोदणी/फासणे
२३. सततची हालचाल
२४. वेगवेगळ्या गोष्टी/वस्तू एकत्र होणे
२५. भांडण्यास उत्सुक व्यक्ती
२६. कटकट, आढेवेढे
२७. साहाय्य, मदत, पाठिंबा
२८. पारखी, चिकित्सेखोर
२९. पित्ताने वा तिखटाने होणारा दाह
३०. क्रूर, तापट, भयंकर शिक्षा करणारा
३१. अपचनाने पोटात होणारी अस्वस्थता
३२. सोन्याच्या मण्यांचा गळ्यात घालण्याचा तिपदरी दागिना
३३. वेडसर, अर्धवट मनुष्य
३४. बारीक, सडसडीत बांध्याचा
३५. पाणी साचलेली जमीन
३६. निरुपयोगी सामान, पसारा

शब्दार्थांसाठी संदर्भ - बृहद्कोश.ऑर्ग

Comments

Popular posts from this blog