कलाकार ओळख - माझा छंद

नम्रता केळकर

माझ्या मोठ्या बहिणीची चित्रकला यथातथा म्हणून आईने मला अगदी पहिलीपासूनच चित्रकलेच्या शिकवणीला घातले.

लहानपणापासून चित्रकला विषय माझ्याही आवडीचा झाला. जे जे स्कूल ऑफ आर्टच्या चित्रकला स्पर्धेत भाग घेणारी माझ्या वयोगटात मी तेव्हा एकटीच होते, हे सांगताना मला नक्कीच अभिमान वाटतो. शालेय आणि आंतरशालेय स्तरावरील विविध स्पर्धा, 'सकाळ' वृत्तपत्रामधील 'बालकुमार चित्रकला स्पर्धा’ अशा स्पर्धांमध्ये मी बक्षिसं मिळवून माझा छंद आवडीने आठवीपर्यंत जोपासला. एलिमेंटरी आणि इंटरमीडिएट परीक्षाही दिल्या. पण नंतर अभ्यासामुळे जवळजवळ ४-५ वर्षं मी रंग हातातच घेतले नाहीत. अभियांत्रिकीच्या दुसऱ्या वर्षाला असताना एका मित्राने प्रोत्साहन दिल्यामुळे परत छंद जोपासायचं ठरवलं. कॉलेजनंतर कलात्मक भेटवस्तू तयार करून विकण्याचा अर्धवेळ व्यवसाय करून पाहिला. त्याला प्रतिसादही उत्तम मिळाला. नोकरीबरोबर हे करणं अर्थातच सोप्प नव्हतं, पण आवड माणसाला सगळं विसरायला लावते याचा अनुभव येत होता. कधी कधी एका आठवड्यात तीन ऑर्डर्स पूर्ण करताना तारांबळ उडायची. पण मनाला मिळणारं समाधान जास्त महत्त्वाचं होतं.

२०२०मध्ये माझं लग्न झालं आणि अमेरिकेत आले. इथे येताना माझी एक बॅग फक्त कॅनवास, रंग आणि कुंचल्यांनी भरलेली होती. इथे मार्चमध्ये आले आणि मास्टर्सचे वर्ग ऑगस्टमध्ये सुरु होणार होते. असा मोकळा वेळ मला कधी मिळालाच नव्हता. मीपण या संधीच सोनं करायचं ठरवलं आणि मग परत एका पाठोपाठ एक चित्र काढायला मी सुरुवात केली. इंस्टाग्रामवर @brushtalesbynamrata नावाने खातं सुरु केलं, रील्स बनवायला लागले आणि एक दिवस न्यूयॉर्कहून एका मुलीने मला माझ्या चित्रांसाठी विचारणा केली. इतका आनंद झाला त्या दिवशी! तिने एक-दोन नव्हे तर चक्क सहा चित्रं माझ्याकडून विकत घेतली. कला ही तुम्हाला निर्व्याज आनंद देते हे मला त्यादिवशी पुरेपूर पटलं.

खरं तर मार्चमध्ये इथे आल्यावर ऑगस्ट पर्यंतचा काळ सोप्पा नव्हता, कारण नुसतं घरी बसून राहण्याची सवय नव्हती. शिवाय कोविडमुळे बाहेर फिरायला जायची मनाई होती. अभ्यास करून करून तरी किती करणार? त्यामुळे मी चित्रकलेचे वेगवेगळे प्रयोग केले, माझ्या चुकांकडे लक्ष देऊन त्या सुधारण्याचा प्रयत्न केला आणि वेळेचा सदुपयोग केला.

मी सल्ले देण्याएवढी फार मोठी नाही, पण आलेल्या अनुभवांवरून इतकंच सांगायला आवडेल की आपला जो छंद आहे तो कायमच आपण जोपासला पाहिजे. छंदाकडे केवळ विरंगुळा म्हणून बघितलं तर छंदही आपल्याला गांभीर्याने घेणार नाही पण आपण छंदाकडे कलात्मकदृष्ट्या पाहिलं आणि त्याला आपल्या व्यग्र जीवनशैलीतही जोपासला तर निश्चितच आपल्या मनाला मिळणारं समाधान अवर्णनीय असेल.


Comments

  1. Heartiest congratulations first of all Namrata. Arts teaches us why to leave and you probably have shown way to many girls came on dependent visa by exploring their hobbies and arts. Wish you All The Best with your journey. Teach some good students to enlighten their lives and give them a good medium to express

    ReplyDelete
  2. नम्रता केळकर यांचा लेख खूपच छान आहे. शेवटचा परिच्छेदात लेखाचं सर्व मर्म आहे.

    ReplyDelete
  3. Khup chan namu tai.tuzi kala abadhit raho hich devakde prarthana

    ReplyDelete
  4. Tu pahilya pasunach apratim chitra kadhtes asech continue kar, tuze drawing painting baghun maze hi thodefar ka hoina sudharle

    ReplyDelete
  5. नम्रता फारच छान लिहिले आहेस !
    तुझा कलेचा छंद असाच जोपास.
    All The Best 👍

    ReplyDelete
  6. नम्रता खरंच सुंदर लेख तुझ्या चित्रा सारखा,
    अभिमान आहे आम्हाला तुझा आणि तुझ्या कलेचा

    ReplyDelete
  7. Very Good ,Namu!!
    तुझा छंद जोपास आणि त्यातून आनंद घे.All the best!!!

    ReplyDelete
  8. लिहिले छान . खुप खुप शुभेच्छा

    ReplyDelete
  9. फारच छान लिहिले आहेस
    चित्रे पण छान आहेत.
    प्रवाहाच्या विरूद्ध पोहून पैलतीर गाठण्याचे तू एक उत्तम उदाहरण आहेस
    तु तुझ्या नातेवाईक, व मित्र मंडळींना एक आदर्श घालून दिला आहेस
    ऊत्तरोत्तर तुझी अशीच प्रगती होत राहो

    ReplyDelete
  10. खूप छान लिहिलं आहेस👌👌👌 आम्हाला तुझा अभिमान आहे....💐

    ReplyDelete
  11. Yogini DahiwadkarJune 3, 2022 at 5:47 AM

    Very nicely written about your journey. I am seeing your work recently on insta and really happy to see you are enjoying the process.

    ReplyDelete
  12. Thank you everyone :)

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

गाईड

पौराणिक कथा - भाग २ - अष्टवसूंची कथा