इच्छा
अरुंधती सरपटवारी |
|
इच्छा
गर्भातल्या गर्मीने मुका जीव झाला होता सुका
दिवसेंदिवस इच्छा करी कधी होईल सुटका?
बाहेर येता जीव म्हणे मी तर इतका छोटा
परत इच्छा करी, कधी होईन मी मोठा?
बालपणी परावलंबनाने कुढला
स्वावलंबनाच्या इच्छेने शांतीला मुकला
इच्छेप्रमाणे मोठा झाला
पण काळजी जबाबदाऱ्यांत बुडला, शांतीला मुकला
होते जीवनात सर्वं कांही
पण इच्छांची होत नव्हती गर्दी कमी
इच्छेने तर घेतला होता पेट
अहंकाराचे इंधन चालू ठेवीत होता खेळ
सुख शांतीचा कुठेच बसत नव्हता मेळ
इच्छेच्या ओझ्याने जीव म्हणे थकलो रे आता
मनांत म्हणे मिळेल का रे दोन क्षणांची शांतता?
बालपणी होतो सुखी किती
मग का केली मोठे होण्याची इच्छा मनी?
एके दिनीं उमगले जीवाला,
"इच्छा अहंकाराची जोडी, सुख शांती मोडी"
जीव म्हणे का मी फिरू इच्छा अहंकाराच्या मागे?
जेव्हा इच्छा अहंकाराविना शांतीच फिरे माझ्या मागे
जिवाने इच्छा अहंकाराला घातला बांध
आणि लावला सुखशांतीचा शीतल गंध
मिटली भ्रांती, लाभली शांती
ओम शांती शांती शांती
Comments
Post a Comment