Posts

कलाकार ओळख - माझा छंद

Image
नम्रता केळकर माझ्या मोठ्या बहिणीची चित्रकला यथातथा म्हणून आईने मला अगदी पहिलीपासूनच चित्रकलेच्या शिकवणीला घातले.

इच्छा

Image
अरुंधती सरपटवारी इच्छा

भाषाविचार - शब्दकोडे

Image
वरदा वैद्य भाषाविचार - शब्दकोडे: ळ’ अक्षराने संपणारे चार वा पाच अक्षरी शब्द ओळखा. 

शहाण्याला शब्दांचा…

Image
वरदा वैद्य एकास एक संगतीची अपेक्षा करत गणित शिकावे तसा मराठी शिकण्याचा प्रयत्न (खरेतर कंटाळा) करणाऱ्या माझ्या मुलाकडून आलेले काही प्रश्न मला मराठी भाषेबद्दल नव्याने विचार करायला भाग पाडतात.

युरेका क्षण!

Image
मुग्धा मुळे सॉफ़्टवेअर डेव्हलपर आणि फ़ॅशन डिझायनर. बाल्टिमोर मराठी मंडळाने आयोजित केलेला पावनखिंड चित्रपट पहिला. जाताना मी, सासूबाई आणि आई गेलो होतो. चित्रपटाची गोष्ट आधीपासून सर्वश्रुत आहे. तरीही चित्रपटाने पकड घेतली ती शेवटपर्यंत.

भाषाविचार - शब्दकोडे (उत्तरे)

Image
वरदा वैद्य भाषाविचार - शब्दकोडे: ळ’ अक्षराने संपणारे चार वा पाच अक्षरी शब्द ओळखा (उत्तरे) 

जागतिक आरोग्य दिवस, ७ एप्रिल २०२२

Image
डॉ. जयश्री कुलकर्णी- खेरा भारतात नेत्ररोग तज्ज्ञ आणि सार्वजनिक आरोग्यतज्ज्ञ म्हणून शासनात उच्च पदावर काम केले. वेगवेगळ्या पुरस्कारांनी सन्मानित. सध्या साइक्सविल, मेरीलँड येथे वास्तव्य. भटकंती, लिखाण, वाचन, संगीत, नृत्य, हेल्दी कुकिंगची आवड. मित्र-मैत्रिणींनो, कोविडच्या जागतिक महामारीमध्ये (Pandemic) गेली दोन अडीच वर्षे आपण जागतिक आरोग्य संघटनेचे नाव सातत्याने ऐकत आहोत.

डोपामिन उपवास

Image
मिलिंद पदकी न्यू जर्सीस्थित औषध-वैज्ञानिक. आता मेडिकल लेखक. २०१७ मध्ये मराठी काव्यसंग्रह "बदकनामा " प्रसिद्ध (ग्रंथाली, मुंबई). मराठी आणि इंग्रजीतून वैज्ञानिक आणि ललित लेखन. सध्या प्रामुख्याने ‘कोव्हिड’विषयक लेखनावर भर. आपल्या मेंदूत संदेशवहन दोन प्रकारे होते: पेशींमधून निघणाऱ्या ‘धाग्यांमधून’ सरळ विद्युतप्रवाह जातो. पण दोन पेशींना जोडणाऱ्या या धाग्यांच्या मध्ये छोटीशी जागा असते, जिला सायनॅप्स असे नाव आहे. या जागेच्या एका बाजूने लहान रासायनिक संयुगे सोडली जातात, जी दुसऱ्या बाजूच्या रिसेप्टर नावाच्या खोबणीला चिकटून पुढचा विद्युतप्रवाह निर्माण करतात. या संयुगांना ‘न्यूरोट्रान्समीटर’ असे नाव दिले जाते. मेंदूत अशी किमान सत्तर संयुगे सापडली आहेत, पण त्यातले एक अत्यंत महत्वाचे संयुग म्हणजे डोपामिन.

संपादकीय

Image
जानेवारी २०२२ अंक १ मैत्र संपादक मंडळ २०२ २   वरदा वैद्य  विदुला कोल्हटकर  रोहित कोल्हटकर  कपिल धाकड  मधुर पुरोहित    बाममं कार्यकारिणी २०२ २   अध्यक्ष   मोनिका देशपांडे  उपाध्यक्ष  रुचिरा महाजन     उपाध्यक्ष- विपणन  मुग्धा मुळे   चिटणीस  स्मितेश लोकरे  खजिनदार  दीपान्विता काळेले  सह-खजिनदार  रमा गंधे नमस्कार मंडळी, गेल्या दोन कोविडग्रस्त वर्षांमध्ये आपले घरात असण्याचे प्रमाण वाढले तसा आपला स्क्रिनटाईमही खूप वाढला आहे. टीव्ही, नेटफ्लिक्स, प्राईम वगैरेंवर नवनव्या मालिका, चित्रपट वगैरे पाहण्याचे प्रमाण वाढले आहे. बसल्याबसल्या आपल्या मोबाईलशी चाळा करण्याचे, संगणकासमोर बसण्याचे प्रमाण वाढले आहे.

डेस्टिनेशन वेडिंग - जोशी मंगल कार्यालय

Image
विदुला कोल्हटकर नाट्यछटा: सध्याची सामाजिक स्थिती बघता आणखी अनेक वर्षांनी पारंपरिक लग्न ही जुनी/कालबाह्य कल्पना असेल. प्रत्यक्ष भेटी दुर्मिळ होतील आणि नेहमीच्या भेटीगाठी ई-भेटी किंवा मेटफॉर्ममधल्या/ मेटावर्समधल्या मेटाभेटी असतील. हे अजून अनेक दशकांनंतर पुण्यात राहणाऱ्या एका आईचं मनोगत .

रिकामे घरटे

Image
अरुंधती सरपटवारी नेहमी प्रमाणे मी कॅाम्प्युटरवर काम करत होते. काम करता करता मधून मधून खिडकीबाहेर डोकावण्याची सवय झाली होती.